आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विम्याविषयी...:इलेक्ट्रिक वाहनासाठी विमा घेताना या गोष्टींची काळजी घ्या...

मुंबई9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्टँडर्ड मोटार विमा पॉलिसी अनेक दशकांपूर्वी बनवण्यात आली होती. इलेक्ट्रिक व्हेइकल (ईव्ही) किंवा हायब्रिड वाहनांची संकल्पना नव्हती. त्यावेळी विशेष करून ईव्हीसाठी मोटार विम्याची गरज नव्हती. इलेक्ट्रिक वाहनांची किंमत सामान्य वाहनांपेक्षा जास्त असल्याने त्यांचा विमा काढण्यापूर्वी तितके संशोधन करणे आणि समाधानी असणे गरजेचे. ईव्हीसाठी विमा खरेदी करताना, इकडे लक्ष द्या. -पॉलिसीमध्ये बॅटरी स्वतंत्रपणे कव्हर केली आहे का? -पॉलिसी चार्जिंग दरम्यान पूर किंवा आगीमुळे बॅटरीचे एकूण नुकसान कव्हर करते? कारण बॅटरी ही ईव्हीचा सर्वात महाग भाग असतो, त्यामुळे ते महत्त्वाचे असते. -ईव्हीमुळे एखाद्या तिसऱ्या व्यक्तीचे नुकसान आणि वैयक्तिक जोखमीची जबाबदारी कव्हर होईल का? -नुकसान झाल्यामुळे ईव्हीच्या मालकाविरुद्ध खटला दाखल केला गेला आहे का, ते तपासा, पॉलिसीमध्ये वेगळे दायित्व कवच आहे का? -पॉलिसीमधील सर्व भागांसाठी शून्य झीरो डिप्रिसिएशन आहे का? मग ते प्लास्टिक, धातू, काच किंवा फायबर, कोणत्याही धातूचे असोत. - विम्यात वाल माउंट चार्जर आणि चार्जिंग केबलसाठी वेगळे कव्हरेज आहे का ? कारण हे पार्ट वाहनाला जोडलेले नसतात, याचा वेगळा उल्लेख करत त्याला मोटार विम्यात कव्हर केले पाहिजे. -पॉलिसीमध्ये मूळ कंपनीने बसवलेल्या गॅजेटशिवाय इतर कोणतेही गॅजेट समाविष्ट आहेत का?

बातम्या आणखी आहेत...