आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Sensex Falls 568 Points To 58,968, Nifty Down 158 Points, Shares Of Kotak, Axis Bank Tumble

शेअर बाजारात मोठी घसरण:सेन्सेक्स 568 अंकांनी घसरून 58,968 वर, निफ्टी 158 अंकांनी खाली, बॅंकिंग शेअर्स गडगडले

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय शेअर बाजारात व्यवहाराच्या चौथ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी मोठी घसरण झाल्याची पाहायला मिळाली. सेन्सेक्स 568 अंकांनी घसरून 58,968 अंकांच्या आसपास व्यवहार करत आहे. निफ्टी 158 अंकांनी घसरून 17,601 पातळीवर आहे. सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 21 समभागांमध्ये घसरण होत आहे. तर 9 शेअर्समध्ये चढाव आहे. ​​​​​​
कोटक आणि अॅक्सिस बँक टॉप लूजर्स
बजाज फिनसर्व्ह, टाटा कंझ्युमर, एशियन पेंट, भारती एअरटेल, आयशर मोटर्स, एसबीआयएन हे निफ्टी-50 चे सर्वाधिक लाभधारक आहेत. कोटक बँक, अ‌ॅक्सिस बॅंक, एचडीएफसी लाइफ, डिव्हिस लॅब आणि अपोलो हॉस्पिटल्सचे शेअर्स सर्वाधिक तोट्यात आहेत.

NSE चे 7 क्षेत्रीय निर्देशांक घसरले
NSE च्या 11 क्षेत्रीय निर्देशांकांपैकी फक्त 4 निर्देशांक वाढताना दिसत आहेत. रिअल्टी क्षेत्रातील सर्वात वेगवान वाढ 1.33% आहे. त्यापाठोपाठ किरकोळ नफ्यासह ऑटो, पीएसयू बँक आणि मीडियाचा क्रमांक लागतो. दुसरीकडे, बँका, खाजगी बँका, वित्तीय सेवा, एफएमसीजी, आयटी, फार्मा आणि धातू क्षेत्रामध्ये घसरण दिसून येत आहे.

बातम्या आणखी आहेत...