आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • To Get Prepaid SIM Postpaid, KYC Will Not Have To Be Done Again And Again, The Government Has Eased The Rules Related To It; News And Live Updates

कामाची गोष्ट:​​​​​​​प्रीपेडला पोस्टपेड करण्यासाठी दुसऱ्यांदा करावे लागणार नाही KYC, सरकारने यासंबंधीचे नियमात केले बदल

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पोस्टपेडला प्रीपेड करण्यासाठी प्रत्येकवेळी करावी लागते केवायसी

केंद्र सरकारने टेलिकॉम क्षेत्रात काही बदल केले आहे. या बदलानुसार, आता टेलिकॉमचे नवीन कनेक्शन घेण्यासाठी, प्रीपेड सिमला पोस्टमध्ये किंवा पोस्टपेडला प्रीपेडमध्ये करण्यासाठी पुन्हा पुन्हा केवायसी करण्याची गरज नाही. यासोबतच हे करण्यासाठी कोणतेही फिजिकल फॉर्म भरण्याची गरज नाही. सर्व टेलिकॉम कंपन्या डिजिटल माध्यमातून हे फार्म भरु शकतील. नुकतेच झालेल्या कॅबिनेट बैठकीत हा निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे.

डिजिटल केवायसीमुळे होईल काम
या निर्णयानुसार, जर तुम्हाला कोणतेही टेलिकॉम कनेक्शन घ्यायचे असेल किंवा प्रीप्रेडला पोस्टपेडमध्ये किंवा पोस्टपेडला प्रीप्रेडमध्ये करायचे असेल तर त्यासाठी कोणतेही कागदपत्रे जमा करायची गरज भासणार नाही. ही सेवा आता पुर्णपणे डिजिटल राहणार आहे. केंद्र सरकारने या कामासाठी डिजिटल केवायसी मान्य केली आहे.

1 रुपयामध्ये स्वत: करु शकता केवायसी
नवीन नियमांनुसार, तुम्ही सिमकार्ड प्रदान करणाऱ्या कंपनीच्या अॅपव्दारे सेल्फ-केवायसी करू शकता. यासाठी तुम्हाला केवळ 1 रुपये भरावे लागणार आहे. सरकारने यामधील त्रुटी दूर करत काही नवीन बदल केले आहे.

पोस्टपेडला प्रीपेड करण्यासाठी प्रत्येकवेळी करावी लागते केवायसी
सध्याच्या नियमांनुसार, जर एखाद्या ग्राहकाला आपला प्रीपेड नंबर पोस्टपेड किंवा पोस्टपेडला प्रीपेडमध्ये बदलायचा असेल तर त्याला प्रत्येकवेळी केवायसी करावी लागते. परंतु, या नवीन नियमांनुसार त्याला केवळ 1 रुपयात केवायसी करता येणार आहे.

सेल्फ केवायसी म्हणजे काय?
केवायसीसाठी ग्राहकांकडून काही कागदपत्रे मागितली जातात. तुम्ही ज्या ठिकाणाहून सिम घेत आहात त्या ठिकाणी हे कागदपत्रे जमा करावी लागतात. परंतु, तुम्ही जर स्वत: केवायसी करत असाल तर तुम्हाला हे कागदपत्रे त्या साईटवर अपलोड करावी लागतात या प्रक्रियेला सेल्फ केवायसी म्हणतात. हे ऑनलाइन किंवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीने करता येऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...