आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • 5G Services Will Initially Be Limited To Premium Customers, With The Process Of Getting 5G Spectrum In 15 Days

5G येण्यापूर्वीच 4G सेवा महागणार:5G सेवा प्रीमियम ग्राहकांपुरती मर्यादित असेल, 15 दिवसांत 5G स्पेक्ट्रम मिळण्याच्या प्रक्रियेला गती

नवी दिल्ली9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात 5G टेलिकॉम सेवा सुरु होण्यापूर्वी 4Gची सेवांचे दर वाढण्याची शक्यता आहे. क्रिसिल रेटिंग्ज, नोमुरा आणि गोल्डमन सॅक्स या एजन्सींनी सांगितल्यानुसार, विविध कंपन्या 2022 मध्ये 30 टक्के दर वाढवण्याची शक्यता आहे. त्यानंतर 5G साठी प्रीमियम दर आकारले जातील.

सात दिवस चाललेल्या 5G स्पेक्ट्रम लिलाव सोमवारी संपला. लिलावात 1.5 लाख कोटी रुपयांच्या बोली लावण्यात आल्या. 5G स्पेक्ट्रममधील प्रचंड गुंतवणूक पाहता CRISIL रेटिंग्जच्या अंदाजानुसार कंपन्याकडून 5G सेवांसाठी वेगवेगळे दर आकारले जातील.

क्रिसिलच्या मते, 5G सेवांचा वापर 4G टॅरिफच्या वर आणि त्याहून अधिक प्रीमियमवर अवलंबून असणार आहे. म्हणूनच लोक मोठ्या प्रमाणावर 5G स्वीकारतील याची खात्री करण्यासाठी कंपन्या 4G सेवांसाठी दर वाढवू शकतात. नोमुरा ग्लोबल मार्केट रिसर्चच्या अंदाजानुसार, कंपन्या दररोज 1.5 GB च्या 4G प्लॅनवर 30 टक्के पर्यंत प्रीमियम आकारू शकतात.

दूरसंचार कंपन्या 5G वर प्रीमियम दर आकारतील

नोमुराने एका अहवालात म्हटले आहे की, सुरुवातीला प्रीमियम ग्राहक (ज्यांच्याकडे 15,000 रुपयांपेक्षा जास्त किंमतीचा स्मार्टफोन आहे) 5G सेवांचे सदस्यत्व घेतील. असे होत गेले तर आमचा अंदाज आहे की, टेलिकॉम कंपन्या 5G वर प्रीमियम दर आकारतील. दुसरीकडे गोल्डमन सॅक्सने एका नोटमध्ये म्हटले आहे की, 2022 च्या अखेरीस टेलिकॉम कंपन्या एकदाच 4Gचे दर वाढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे टेलिकॉम क्षेत्रातील कमाईत वाढ होण्याची ही पुढची पायरी ठरणार आहे.

5G साठी जिओ सर्वात मजबूत

प्रीमियम 700 MHz बँडमध्ये 5G स्पेक्ट्रम विकत घेणारा Jio सर्व 22 दूरसंचार मंडळांमध्ये एकमेव ऑपरेटर आहे. त्यामुळे जिओने 5G शर्यतीत लवकर आघाडी घेतली आहे. टेलिकॉम तज्ज्ञांच्या मते, कमी फ्रिक्वेन्सी बँडमुळे त्याचे सिग्नल इमारतींच्या आत पोहोचू शकतात. त्यामुळे ते इनडोअर कव्हरेजसाठी योग्य ठरणार आहेत. त्याचे बाह्य कव्हरेज देखील उत्तम असणार आहे. 700 मेगाहर्ट्झ बॅंडमधील टॉवर 10 किमीपर्यंत कव्हरेज देऊ शकतो.

भास्कर तज्ज्ञ महेश उप्पल यांनी 5G सेवाबद्दल मांडलेले मत

कंपन्यांना 5G स्पेक्ट्रम मिळण्यासाठी किती वेळ लागेल?

उप्पल - 5G स्पेक्ट्रम मिळण्याची प्रक्रिया येत्या 10 ते 15 दिवसांत पुर्ण होणार आहे.

देशात 5G सेवा कधी सुरू होणार?
उप्पल- 5G सेवा ऑक्टोंबर नोव्हेंबर किंवा वर्षाच्या अखेरीस कॉर्पोरेट्स आणि व्यावसायिकांसारख्या निवडक वापरकर्त्यांसाठी सुरू होण्याची शक्यता आहे. या सेवा सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी 2-3 वर्षे लागू शकतात.

दीर्घकाळासाठी काही विशेष कारण?
उप्पल - 5G पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी कंपन्यांना खूप गुंतवणूक करावी लागेल. त्यासाठी वेळही लागेल. याशिवाय ज्या वेगाने मागणी वाढत आहे. ती लक्षात घेऊन कंपन्या 5G ची व्याप्ती वाढवतील.

कंपन्या 5G साठी 700 MHz स्पेक्ट्रमचा आग्रह का धरत आहेत ?
उप्पल - कारण या स्पेक्ट्रमची श्रेणी उच्च-फ्रिक्वेंसी स्पेक्ट्रमपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. त्यामुळे कंपन्यांना कमी टॉवर बसवावे लागत आहेत.

5G सेवा 4G पेक्षा महाग होईल का?
उप्पल - होय, कंपन्या 5G सेवांसाठी सुरूवातीला प्रीमियम किंमत आकारतील. पण जसजसा त्याचा आवाका वाढत जाईल. तसतशा किंमती खाली येत राहतील.

बातम्या आणखी आहेत...