आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रँडच्या यशाची कहाणी - रॉयल एनफील्ड:एकेकाळी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर, आज रॉयल एनफील्डची 60+ देशांमध्ये बाजारपेठ

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रॉयल एनफील्ड {स्थापना ः १९०१ {महसूल (वर्ष २०२२) ः १०,२९८ कोटी रु. (आयशर ग्रुप) डुग डुग डुग...६० वर्षांहून अधिक काळ बुलेटचा हा विशिष्ट आवाज मोटरसायकलप्रेमींच्या रोमारोमात भिनला आहे. बुलेट आणि रॉयल एनफील्ड कंपनीच्या कथांपेक्षा त्यांचा वापर करणाऱ्यांच्या कथा जास्त आहेत. भारतातही ७० वर्षे एनफील्ड चालवणाऱ्यांच्या असंख्य आठवणी आहेत. भारतीय लष्कर १९५५ पासून गस्तीसाठी बुलेट वाहनांचा वापर करत आहे. एकेकाळी ब्रिटिश ब्रँड असलेला बुलेट आता स्वदेशी झाला आहे आणि भारतातून जगभरात निर्यात केला जात आहे. आपल्या १२० वर्षांच्या इतिहासात चढ-उतारांमधून गेलेली ही कंपनी अजूनही जगातील सर्वात लोकप्रिय मोटरसायकलपैकी एक आहे. रॉयल एनफील्ड बनवणाऱ्या मूळ आयशर कंपनीच्या रेकॉर्डनुसार, जुलैमध्ये ५५,५५५ रॉयल एनफील्डची विक्री झाली. कंपनीच्या व्यवसायातही ४५ टक्के वाढ झाली आहे. कंपनीच्या इतिहासातील ही सर्वात मोठी वाढ आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षात ५,९५,४७४ बाईक विकल्या गेल्या. २०१८ मध्ये रॉयल एनफील्डला मोटरसायकल ऑफ द इयर म्हणून निवडण्यात आले. राॅयल एनफील्ड हा जागतिक ब्रँड कसा झाला, जाणून घेऊया त्याची कहाणी...

इंग्लंडची रॉयल एनफील्ड २८ वर्षांपूर्वी झाली स्वदेशी जगातील पहिली बुलेट इंग्लंडने बनवली होती. त्यानंतर मद्रास मोटर्सच्या सहकार्याने भारतात त्याचे उत्पादन सुरू झाले, पण मालकी ब्रिटिश कंपनीकडेच राहिली. त्यानंतर १९९४ मध्ये आयशर मोटर्सने एनफील्ड इंडिया कंपनी विकत घेतली आणि नाव बदलून रॉयल एनफील्ड मोटर्स लिमिटेड करण्यात आले. ब्रिटनमध्ये उत्पादन थांबल्यावर आयशरने युरोपीय देशांमध्येही त्याची निर्यात सुरू केली. नंतर ब्रिटनमध्ये आयशरच्या सहकार्याने उत्पादन पुन्हा सुरू झाले, तरीही मालकी आयशरकडेच राहिली. आज, राॅयल एनफील्ड जगातील ६० देशांमध्ये विकल्या जातात, यासाठी कंपनीने विशेष स्टोअर्स आणि डीलरशिपशी करार केला आहे.

रॉयल एनफील्डचे नव्याने ब्रँडिंग करणारी व्यक्ती रॉयल एनफील्ड एकेकाळी दिवाळखोरीच्या अवस्थेत होती. सिद्धार्थ लाल जानेवारी २००४ मध्ये आयशर मोटर्सचे सीईओ झाले. त्या वेळी आयशर १५ इतर व्यवसाय करत होता, परंतु सिद्धार्थ यांची धोरणे स्पष्ट होती, त्यांनी १३ व्यवसाय बंद केले आणि आपले सर्व लक्ष रॉयल एनफील्डवर केंद्रित केले. सिद्धार्थ यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले. हार्ले डेव्हिडसनच्या माजी व्यवस्थापकाला उत्तर अमेरिकेचे प्रेसिडेंट केले. दुकातीमधील एकाला आपल्या टीममध्ये घेतले.

एनफील्डचा रॉयल प्रवास १९०१ पहिल्या राॅयल एनफील्डची निर्मिती. आर. डब्ल्यू. स्मिथ व ज्युल्स गोटिएट यांनी तिची रचना केली. १९३२ बुलेट मोटारसायकल अस्तित्वात आली. लंडन मोटारसायकल शोमध्ये पहिल्यांदाच प्रदर्शित. १९५२ भारतीय लष्कराद्वारे मद्रास मोटर्सला बुलेटची ऑर्डर. रेडडिचद्वारे मद्रास मोटर्ससोबत एनफील्ड इंडियाची स्थापना. १९९४मध्ये आयशर ग्रुपकडून एनफील्ड इंडियाचे अधिग्रहण. पूर्ण उत्पादन भारतातून सुरू. २००० एनफील्डला कंपनी बंद करण्याचा सल्ला मिळाला. उत्पादन थांबण्याच्या उंबरठ्यावर पोहोचले. २०१४ आयशर ग्रुपच्या कमाईत रॉयल एनफिल्डचा वाटा ९०% पेक्षा अधिक. ती २५०-७५० सीसीमध्ये आघाडीवर आहे.

तरुण हे लक्ष्य समोर ठेवून वाहनांमध्ये केले बदल रॉयल एनफील्डच्या मेकओव्हरसाठी कंपनीचे एमडी सिद्धार्थ लाल यांनी २१ ते ३५ वयोगटातील तरुण, बाइकर्स आणि साहसप्रेमींना लक्ष्य करणे सुरू केले. मोटारसायकलमध्ये क्लासिक ३५०, बुलेट, हिमालयन, इंटरसेटर ६५०, काँटिनेंटल जीटी ६५०, मेटोर ३५०, स्क्रन ४११ व्हेरिएंट सादर करण्यात आले. यामध्येही रंगांवर खूप काम करण्यात आले. २०१५ मध्ये रॉयल एनफील्डने जागतिक स्तरावर हार्ले डेव्हिडसनलाही मागे टाकले. २५० ते ७५० सीसी मोटारसायकल विभागातील रॉयल एनफील्ड वाहनांचा वाटा ९० टक्क्यांपर्यंत आहे. याशिवाय स्टायलिश हेल्मेट आणि इतर अॅक्सेसरीजचाही कंपनीच्या कमाईत मोठा वाटा आहे.

ब्रिटिश क्राउनपासून रॉयल नाव घेऊन रॉयल एनफील्ड १८९० मध्ये एनफील्ड ब्रिटिश कंपनीचे बॉब वॉकर आणि अल्बर्ट एडी यांनी रेडडिच विकत घेतली. त्यानंतर रॉयल नावाच्या वापरास ब्रिटिश क्राउनकडून परवानगी देण्यात आली आणि १८९३ मध्ये रॉयल एनफील्ड असे नाव देण्यात आले, दोघांचे नाव बदलून एनफील्ड मॅन्युफॅक्चरिंग ठेवण्यात आले. वॉकर यांनी नंतर कंपनीचे पहिले मोटराइज्ड व्हेइकल डिझाइन केले. वर्ष १९०१ मध्ये वाहनाच्या पुढील बाजूस ११/२ एचपी इंजिन बसवण्यात आले होते. १९०९ मध्ये रॉयल एनफील्डने स्विस इंजिनपासून बनवलेली अडीच अश्वशक्तीची मिनी मोटारसायकल लाँच करून आश्चर्यचकित केले. यानंतर रॉयल एनफील्डने ५ हॉर्सपॉवर/७७० सीसीची बाइक बनवली. यामुळे एनफील्ड घरोघरी पोहोचली.

बातम्या आणखी आहेत...