आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • Business
 • Tourism : After All The Tax Waiver, 25 Per Cent Of Business Worth Rs 20 Lac Crore Will Be Saved Faith

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना संकट:पर्यटन : सर्व करमाफीनंतर 20 लाख कोटींच्या व्यवसायाचा 25 टक्के हिस्सा वाचेल - फॅथ

नवी दिल्लीएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
 • कॉपी लिंक
 • टाळेबंदीत पर्यटन, वाहतूक आणि आदरातिथ्य क्षेत्रातील ४ कोटी नोकऱ्या जातील
 • ५.५ कोटी लोक कार्यरत आहेत, केवळ दीड कोटी नोकऱ्या वाचतील

प्रमोद कुमार

कोरोना महारोगराईमुळे सर्व प्रकारच्या व्यवसायावर संकट उभे राहिले आहे. मात्र, यापेक्षा जास्त नुकसान पर्यटन, प्रवास आणि आदरातिथ्य (हॉस्पिटॅलिटी) क्षेत्रात झाले आहे. देशात ५.५ कोटी लोकांना रोजगार देणाऱ्या या व्यवसायातील एक कोटी कर्मचारी बेरोजगार झाले आहेत आणि ३ कोटी लोक होण्याच्या मार्गावर आहेत. फेडरेशन ऑफ असोसिएशन इन इंडियन टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी(फॅथ)नुसार कोरोना संकटामुळे सर्व कंपन्यांची वित्तीय स्थिती वाईट झाली आहे. जगात सर्वात जास्त नुकसान भारतात झाले आहे. कारण, जगातील उर्वरित देशांत सरकारकडून मदत पॅकेज दिले आहे. तिथे रोजगार योजनेअंतर्गत सरकार वेतन देत आहे. 

इंडियन असोसिएशन ऑफ टूर आॅपरेटरचे कोषाध्यक्ष रवी गुसैन म्हणाले, सरकारकडून कर माफी, मोठे मदत पॅकेज आणि येत्या वर्षांत बँक कर्ज स्थगित करण्यासारखे पाऊल न उचलल्यास ७५ टक्क्यांहून जास्त कंपन्या दिवाळखोरीत निघतील. मॅरियट इंटरनॅशनलचे सीईओ अर्ने सोरेनसन यांच्यानुसार, व्यवसायावर मोठे संकट कधी आले नाही. एका महिन्यात कधीही सुरू होणार नाहीत, अशा हजारो कंपन्या बंद झाल्या आहेत.

 • २०२०-२१ मध्ये विदेशी पर्यटकांकडून मिळणारा २ लाख कोटीचा व्यवसाय होणार नाही

४ कोटींपेक्षा जास्त रोजगार देतो पर्यटन 

वर्ल्ड टुरिझम अँड ट्रॅव्हल काैन्सिलनुसार, २०१८-१९ मध्ये भारतात पर्यटन क्षेत्रात ४.२ कोटी नोकऱ्या निर्माण झाल्या. ह्या देशातील एकूण रोजगाराच्या ८.१% होत्या. २०१८ मध्ये जीडीपीमध्ये प्रवास आणि पर्यटनाच्या एकूण योगदानात भारत १८५ देशांत तिसऱ्या क्रमांकावर राहिले. देशात ५३,००० आतिथ्य प्रतिष्ठान आणि ५ लाखांपेक्षा जास्त रेस्तराँ आहेत. सर्व मिळून ५.५ कोटी भारतीयांना रेाजगार देतात.

पर्यटन उद्योगाला मोठ्या देशांनी दिले मदत पॅकेज

 • ब्रिटनमध्ये पर्यटन, प्रवास आणि सेवा क्षेत्रातील व्हॅटसह सर्व प्रकारचे कर एक वर्षासाठी पूर्णपणे समाप्त केले पाहिजे. अमर्याद बँक हमी आणि कोविड-१९ बिझनेस कन्टिन्यूटी स्कीमअंतर्गत १२ महिन्यांसाठी बिनव्याजी कर्ज दिले आहे.
 • ऑस्ट्रेलिया सरकारने पर्यटन उद्योगासाठी दोन मदत व सुरक्षा पॅकेज सुरू केले .त्यांच्यासाठी कर्जमाफीसारख्या बँकिंग सुविधेसोबत सर्व कर माफ केले पाहिजेत. कर्मचाऱ्यांच्या अतिरिक्त मदत सरकार देत आहे.
 • इंडोनेशियाने हॉटेल आणि रेस्तराँवर आकारलेले सर्व प्रकारचे कर रद्द केले आहेत. एअरलाइन्सला व्हॅट करात सवलत दिली आहे. पर्यटन उद्योगासाठी सुरुवातीचे पॅकेज ७५०० कोटी रु. आहे.

मागणी : उद्योग वाचवण्यासाठी सरकारने कोष स्थापन करावा, बँक व्याजासाठी एका वर्षाचा वेळ मिळावा - फॅथ

फॅथनुसार, भारतीय पर्यटन वाचवणे व कायम ठेवण्यासाठी सरकारने त्वरित पुढे आले पाहिजे. सरकारला या उद्योगाला वाचवण्यासाठी निधी स्थापन केला पाहिजे. वेगवेगळ्या क्षेत्राासाठी वेगवेगळी पावले उचलली पाहिजेत.

 • मुदत कर्ज - बँकांद्वारे पर्यटन उद्योगाला नवे कर्ज आणि त्याच्या व्याज वसुलीस वर्षभरासाठी स्थगित केले जावे. एका वर्षानंतर आढावा घेतला जावा, यानंतर कर्ज वसुलीबाबत निर्णय घेतला जावा. व्याजदर कमी केले जावे.
 • चालू भांडवल- पर्यटन, वाहतूक व हॉस्पिटॅलिटी कंपन्यांचे चालू भांडवल मर्यादा त्वरित दुप्पट केले जाईल. यादरम्यान हमीवर सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी नवीन चालू भांडवल मर्यादा त्वरित मंजूर केले जावे.
 • विविध नियमांत सूट दिली जावी- जीएसटी देयक, प्रॉव्हिडंट फंड, ईएसआय, अॅडव्हान्स टॅक्सचे समायोजन, संपत्ती कर, उत्पादन शुल्क आणि व्हॅट, वीज आदी बिलांतून हॉस्पिटॅलिटी, पर्यटन, पर्यटन उद्योगास मुक्त केले जावे.
 • स्टॉक होल्डर्स - क्रेडिट कार्ड कंपनी बिना हमीच्या ५० लाख मर्यादेचे कॉर्पाेरेट क्रेडिट कार्ड जारी करावे, जे सर्व एअरलाइन्स कंपन्यांनी विनाशुल्क स्वीकार करावे. यात हप्ता भरण्याची मर्यादाही ३५ दिवसांनंतर ३० % अतिरिक्त मर्यादा दिली जावी.

बँक कर्जात पर्यटनाचा हिस्सा ९ टक्के

 • जागतिक व्यवसाय सामान्यापेक्षा सुमारे ७५ टक्के कमी सुरू आहे. शेकडो हॉटेल बंद झाले आहेत आणि पुन्हा कधी सुरु होतील माहित नाही. असे संकट याआधी पाहिले नाही. - अर्ने सोरेन्सन, सीईओ, मॅरियट इंटरनॅशनल
 • आमच्या क्षेत्रावर बँकांचे कर्ज केवळ २.२ टक्के आहे. गेल्या एका वर्षात बँकांच्या कर्जात १४% वाढ झाली. पर्यटनावर ९ % आहे. - रवी गुसैन, कोषाध्यक्ष, इंडियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटर
 • उद्योग आत्मघाताच्या पातळीवर आहे. आरबीआयच्या आदेशानंतरही बँक दिलासा देत नाही. - प्रवीण शर्मा, बोर्ड मेंबर, हॉटेल अँड रेस्तराँ असो., उत्तर भारत
बातम्या आणखी आहेत...