आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

TVS अपाचेच्या किंमतीत वाढ:कंपनीने किंमत 2100 रुपयांनी वाढवली, नवीन किंमतीची यादी वाचा सविस्तर

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

TVS ने Apache बाईकच्या 10 मॉडेल्सच्या किमती वाढवल्या आहेत. आता ही बाईक घेण्यासाठी ग्राहकांना 2100 रुपयांपर्यंत अधिक खर्च करावा लागणार आहे. नवीन किमती TVS Apache RTR 160, Apache RTR 160 4V, Apache RTR 180, Apache RTR 200 आणि Apache RR 310 सह इतर मॉडेल्सवर लागू होतील.

2100 रुपयांपर्यंत वाढ

TVS वाहन उत्पादक कंपनीने मे 2022 मध्ये आपल्या Apache मालिकेच्या मोटरसायकलच्या किंमतीत 2100 रुपयांपर्यंत वाढ केली आहे. Apache RR 310 या Apache मालिकेतील सर्वात दमदार बाईकच्या किमतीत फक्त 90 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. इतर सर्व मॉडेल्सच्या किमतीत 2100 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

मॉडेल ​​​​नवीन किंमतजुनी किंमतफरक
अपाचे RTR 160 2V (ड्रम)रु. 1,11,740रु. 1,09,640रु. 2,100
अपाचे RTR 160 2V (डिस्क)रु. 1,14,740रु. 1,12,640रु. 2,100
अपाचे RTR 160 4V (ड्रम)रु. 1,19,378रु. 1,17,278रु. 2,100
अपाचे RTR 160 4V (डिस्क)रु. 1,21,485रु. 1,19,385रु. 2,100
अपाचे RTR 160 4V (ब्लूटूथ)रु. 1,24,201रु. 1,22,101रु. 2,100
अपाचे RTR 160 4V स्पेशल अ‍ॅडिशनरु 1,25,575रु 1,23,475रु 2,100
अपाचे RTR 180रु. 1,18,690रु. 1,16,590रु. 2,100
अपाचे RTR 200 4V सिंगल ABSरु 1,38,190रु 1,36,090रु. 2,100
अपाचे RTR 200 4V ड्युअल ABSरु 1,43,240रु 1,41,140रु. 2,100
अपाचे 310रु. 2,59,990रु. 2,59,900रु. 90