आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरने ऑनलाइन पब्लिशिंग प्लॅटफॉर्म सबस्टॅकद्वारे पोस्टमध्ये ट्विट एम्बेड करण्यावर बंदी घातली आहे. त्यामुळे लेखक त्यांच्या न्यूजलेटर्समध्ये ट्विट एम्बेड करू शकत नाहीयेत.
रिपोर्ट्सनुसार, ट्विटरने आधी सबस्टॅकच्या पोस्टमधील लिंक्स एम्बेड करणे ब्लॉक केले आणि नंतर ट्विटरवरील पोस्टमधील लिंक्सवर रिट्विट्स आणि लाइक्स ब्लॉक केले.
यावर सबस्टॅकचे संस्थापक ख्रिस बेस्ट, हमिश मॅकेन्झी आणि जयराज सेठ यांनी एक निवेदन जारी केले की, "ट्विटरने लेखकांचे काम शेअरिंग करणे ब्लॉक केल्याने आम्ही निराश आहोत. लेखकांना सबस्टॅकवर किंवा इतरत्र लिंक शेअर करण्याचे स्वातंत्र्य आहे." ट्विटरद्वारे हा बदल Substackच्या अशा लेखकांसाठी एक मोठी समस्या बनला आहे, जे त्यांचे न्यूजलेटर्स अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी Twitter वापरतात.
मस्क आर्थिक हितसंबंधांवर आधारित निर्णय घेत आहेत: ज्यूड लेगम
खासगी वाहिनीशी बोलताना पॉलिटिक्स फोकस वृत्तपत्र 'पॉप्युलर इन्फॉर्मेशन'चे लेखक ज्यूड लेगम म्हणाले की "असे दिसते की मस्क त्यांच्या आर्थिक हितसंबंध आणि काही किरकोळ तक्रारींवर आधारित निर्णय घेत आहेत."
सबस्टॅकचे सह-संस्थापक हमीश मॅकेन्झी यांनी ट्विट केले की, "ट्विटरने सबस्टॅकच्या लिंक ब्लॉक करण्यास सुरुवात केली आहे. आम्हाला आशा आहे की हे चुकून झाले असेल आणि ते केवळ तात्पुरते असेल. तथापि, जरी हा बदल तात्पुरता नसला तरी यामुळे ही गोष्ट लक्षात येते की, इंटरनेटच्या लेगसी बिझनेस मॉडेलमध्ये भेगा का दिसायला सुरुवात झाली आहे."
सबस्टॅक म्हणजे काय?
सबस्टॅक हे ऑनलाइन वृत्तपत्र प्रकाशन व्यासपीठ आहे जे लेखकांसाठी विनामूल्य आहे. तथापि, पेड सबस्क्रिप्शनद्वारे कमाई करणार्या लेखकांच्या कमाईच्या 10% सबस्टॅक घेते. सबस्टॅकच्या लेखकांमध्ये इतिहासकार, पत्रकार, अर्थशास्त्रज्ञ आणि सर्व स्तरांतील लोकांचा समावेश आहे ज्यांना वाचन आणि लिहायला आवडते.
सबस्टॅक त्यांच्या प्लॅटफॉर्मवर लिहीत असलेल्या कंटेंटला "न्यूजलेटर" म्हणते, परंतु प्रत्यक्षात ते ईमेल वृत्तपत्र वैशिष्ट्यासह ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म आहे. जे ईमेलद्वारे ब्लॉग पोस्ट वाचकांना पाठवते. मार्च 2023च्या पहिल्या आठवड्यात सबस्टॅकने जाहीर केले आहे की, त्यांनी 2 मिलियन पेड सबस्क्रिप्शनचा आकडा पार केला आहे.
वाचक मोफत सबस्टॅक वापरू शकतात का?
होय, वाचक विनामूल्य आणि मेंबरशिप प्लॅनसह सबस्टॅक वापरू शकतात. मात्र, वाचकांना एका महिन्यात केवळ 3 वृत्तपत्रे मोफत वाचता येतात. कुणाला यापेक्षा जास्त वाचायचे असेल तर मासिक व वार्षिक वर्गणी घ्यावी लागेल. सध्या, सबस्टॅकची मासिक सदस्यता योजना 5 डॉलर (सुमारे 409 रुपये) आणि वार्षिक सदस्यता 50 डॉलर (सुमारे 4093 रुपये) मध्ये घेतली जाऊ शकते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.