आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्विटरवरील ब्ल्यू टिक वाचवण्यासाठी 8 दिवसांची मुदत:मस्क यांनी केले ट्विट; सबस्क्रिप्शन घेतले नाही तर टिक होईल गायब

2 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक

ट्विटर युझर्सना ब्ल्यू टिकचे सबस्क्रिप्शन घेण्यासाठी आता केवळ 8 दिवसांची मुदत उरली आहे. येत्या 20 तारखेपर्यंत ब्ल्यू टिकचे सबस्क्रिप्शन घेतले नाही तर अकाऊंटवरून ब्ल्यू टिक गायब होईल. त्यामुळे ज्यांच्याकडे सध्या ब्ल्यू टिक व्हेरिफाइड अकाऊंट आहे त्यांना येत्या 20 एप्रिलपर्यंत ब्ल्यू टिक सबस्क्रिप्शन विकत घ्यावे लागेल.

ट्विटर प्रमुख एलॉन मस्क यांनी बुधवारी याविषयीचे ट्विट केले आहे. त्यांनी लिहिले आहे की, 'लीगसी ब्ल्यू चेकमार्क हटवण्याची शेवटची तारीख आहे 20 एप्रिल.'​​​​​​ याआधी हा चेकमार्क हटवण्याची तारीख 1 एप्रिल ठेवण्यात आली होती. ट्विटरने म्हटले होते की, 'एक एप्रिलपासून आम्ही लीगसी व्हेरिफाइड प्रोग्राम संपवणे आणि लीगसी व्हेरिफाइड चेकमार्क परत घ्यायला सुरूवात करू. '

ब्ल्यू सबस्क्रिप्शनमध्ये जोडला बल्यू चेकमार्क

ब्ल्यू चेकमार्क आधी राजकीय नेते, प्रसिद्ध व्यक्तीमत्वे, पत्रकार आणि दुसऱ्या सार्वजनिक व्यक्तीमत्वांच्या व्हेरिफाइड अकाऊंटसाठी राखीव होता. मस्क यांनी ट्विटर टेकओव्हर केल्यानंतर ते ब्ल्यू सबस्क्रिप्शन सेवेत जोडण्यात आले होते.

आता चेकमार्कसाठीचे निकष

 • तुमच्या अकाऊंटला एक डिस्प्ले नेम आणि प्रोफाइल फोटो असावा
 • ब्ल्यू सर्व्हिससाठी अकाऊंट गेल्या 30 दिवसांपासून अॅक्टिव्ह असावे
 • अकाऊंट 90 दिवसांपेक्षा जास्त जूने आणि कन्फर्म्ड फोन नंबर असायला हवा
 • प्रोफाइल फोटो, डिस्प्ले नेममध्ये अलिकडेच कोणताही बदल केलेला नसावा
 • अकाऊंट मिसलीडिंग असल्याचे कोणतेही संकेत नसावे
 • अकाऊंट स्पॅम असल्याचे कोणतेही संकेत नसावे

ट्विटर टीमने रिव्ह्यू केल्यानंतरच अकाऊंटवर ब्ल्यू चेकमार्क दिसेल. सर्व निकष पूर्ण केल्याची खात्री ट्विटर टीमला पटल्यानंतरच हा चेकमार्क दिला जाईळ. ट्विटरच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अकाऊंटचे चेकमार्कही हटवले जाऊ शकतात.

वेबसाठी वर्षभराच्या सबस्क्रिप्शनवर 2000 रुपये सूट

2023 च्या अखेरपर्यंत ट्विटरला आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्याची मस्क यांची योजना आहे. त्यांनी महसूल गोळा करण्यासाठी ब्ल्यू सबस्क्रिप्शनसारख्या काही सेवा मॉडिफाय केल्या आहेत. भारतात अँड्रॉइड आणि आयओएस युझर्सना ब्ल्यू सबस्क्रिप्शनसाठी 900 दरमहा मोजावे लागतील. तर वेब युझर्सना 650 रुपये मोजावे लागतील. युझरने वार्षिक सबस्क्रिप्शन घेतले तर त्यांना सूट मिळेल. 7800 रुपयांऐवजी 6800 रुपये द्यावे लागतील.

ब्ल्यू सबस्क्रिप्शनच्या युझर्सना मिळणार टू-फॅक्टर ऑथेन्टिकेशनची सुविधा

20 मार्चपासून सुरक्षा फीचर टू-फॅक्टर ऑथेन्टिकेशन बंद करण्यात आले आहे. आता हे केवळ ब्ल्यू टिक सबस्क्रायबर्सनाच दिले जात आहे. टू-फॅक्टर ऑथेन्टिकेशनच्या माध्यमातून अकाऊंट जास्त सुरक्षित बनवण्यासाठी अकाऊंट होल्डरला पासवर्डशिवाय सेकंड ऑथेन्टिकेशन मेथडचा वापर करता येतो. जर तुमच्याकडे आधीच 2FA फीचर असेल तर ते कायम ठेवण्यासाठी ब्ल्यू टिक सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल.

2FA सेटिंग कशी बदलावी?

 • ही अगदी सोपी आणि वेगवान प्रक्रिया आहे. यासाठी काही मिनिटेच लागतात.
 • युझर्सना आपल्या अकाऊंटच्या सेटिंग पेजवर जावे लागेल.
 • तिथे security and account access हा पर्याय निवडावा.
 • त्यानंतर सिक्युरिटी ऑप्शनवर जाऊन 2FA पेजवर जाण्यासाठी स्टेप्स फॉलो करा.
 • डुओ मोबाईल आणि ऑटीसारखे इतर थर्ड पार्टी अॅपही उपयोगात येऊ शकतात. युझर्सनी ते डाऊनलोड आणि आपल्या अकाऊंटशी लिंक करण्यासाठी निर्देशांचे पालन करण्याची गरज आहे.

ट्विटर ब्ल्यू सबस्क्रिप्शनमध्ये युझर्सना काय मिळेल?

सबस्क्रिप्शनमध्ये युझर्सना ट्विट एडिट करणे, 1080p म्हणजेच एचडी क्वॉलिटीत व्हिडिओ अपलोड करणे, रिडर मोड आणि ब्ल्यू चेकमार्क मिळेल. ब्ल्यू चेकमार्क नंबरसोबतही व्हेरिफाय केले जाईल. अजून हे स्पष्ट झालेले नाही की अकाऊंट रिव्हू करण्याची प्रोसेस काय असेल. याशिवाय रिप्लाय, मेन्शन आणि सर्चमध्ये प्रायोरिटी मिळेल. सामान्य युझर्सपेक्षा 50% कमी अॅड दिसतील आणि नव्या फिचर्समध्येही प्रायोरिटी मिळेल.

सबस्क्रायबर त्यांचे हँडल, डिस्प्ले नेम किंवा प्रोफाइल फोटोही बदलू शकतील. जर त्यांनी असे केल तर त्यांचे अकाऊंट पुन्हा रिव्ह्यू होईपर्यंत अस्थायीपणे ब्ल्यू चेकमार्क गायब होईल. याशिवाय बिझनेस अकाऊंटचे ऑफिशियल लेबल गोल्ड चेकमार्कने तर सरकारी व मल्टिलॅटरल अकाऊंटसाठी ग्रे चेकमार्क असेल.

सबस्क्रिप्शन मोडवर नेण्याची 3 कारणे

 • कंपनीला रोज 32 कोटींचे नुकसान होत आहे. नव्या मॉडेलने महसूल वाढवायचा आहे.
 • मस्क 44 अब्ज डॉलरमध्ये यांनी ट्विटर खरेदी केले आहे. त्यांना लवकरात लवकर ही रक्कम भरून काढायची आहे.
 • ट्विटरवर मोठे कर्ज आहे. त्यांना हे कर्ज फेडण्यासाठी जाहिरातदारांवर अवलंबून राहण्याची इच्छा नाही.