आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Twitter India Banned Accounts Monthly Report | Child Sexual Abuse, Nudity I Latest News And Update  

ट्विटरने भारतात 52 हजार खाती बंद केली:व्हॉट्सअ‌ॅपनेही 26 लाख क्रमांकावर घातली होती बंदी, मासिक अहवाल जाहीर

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ट्विटर कंपनीने आपला मासिक अहवाल नुकताच जाहीर केला आहे. यात भारतातील 52 हजार 141 खात्यावर बंदी घालण्यात आल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. यामध्ये मुलांचे लैगिंक शोषण, नग्नता यासह अन् संबंधित पोस्ट केल्या जात असल्याने ही खाती बंद करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.

26 ऑगस्ट ते 25 सप्टेंबर दरम्यान ही खाती बंद करण्यात आल्याचे अहवालात सांगण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, ट्विटरने दहशतवादाचे समर्थन करणाऱ्या 1982 खात्यांवरही कारवाई केली. दुसरीकडे, मेटाने देशातील 26 लाख व्हॉट्सअ‌ॅप नंबर ब्लॉक केलेले आहेत. कंपनीने आयटी नियम 2021 अंतर्गत ही कारवाई केलेली आहे.

भारतीय यूजर्सकडून 157 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या
ट्विटरने जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे की, त्यांना वापरकर्त्यांकडून 157 तक्रारी आल्या होत्या. यामध्ये ट्विटर अकाउंट निलंबित करण्याची मागणी करण्यात आली होती. या सर्वांचे निराकरण झाल्याचे कंपनीने म्हटले आहे. याशिवाय, आवश्यक प्रतिसाद वापरकर्त्यांना कंपनीकडून पाठविण्यात आलेला आहे.

सप्टेंबरमध्ये व्हॉट्सअ‌ॅपवर 666 तक्रारी

दुसरीकडे, मेटाने मेसेजिंग अ‌ॅप WhatsApp साठी सप्टेंबर 2022 चा अहवाल जारी केला आहे. अहवालात की, भारतात 26 लाख व्हॉट्सअ‌ॅप नंबर बंद करण्यात आले आहेत. सप्टेंबरमध्ये क्रमांक बंद असल्याच्या 666 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. हे मेसेजिंग अ‌ॅप सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अधिक जबाबदारीने बदलले जात आहे. देशभरात सुमारे 500 दशलक्ष वापरकर्ते आहेत.

आयटी नियम 2021 काय सांगतो
गेल्या वर्षी आयटी नियमांमध्ये बदल करण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली होती. नवीन नियमानुसार सोशल मीडियाशी संबंधित प्रकरणांची चौकशी करण्यासाठी आणखी एक केंद्रीय स्थान तयार करण्यात आले. ज्याला तक्रार अपील समिती म्हणजेच GAC असे नाव देण्यात आले.

GAC ही मध्यवर्ती संस्था आहे. ज्यांचे काम सोशल मीडिया सामग्रीवर नियंत्रण करणे आहे. ज्या सोशल मीडिया पोस्टविरोधात तक्रार करण्यात आली आहे. त्या पोस्ट हटवण्यात आल्या आहेत की नाही, याची चौकशी ही संस्था करण्यात आली आहे.

आयटी नियम 2021 मध्ये काय फायदा आहे
IT नियम 2021 लागू झाल्यानंतर जे सोशल मीडिया हिंसक स्वरूपाचे होते. ते काढून टाकण्यात आले. तसेच बलात्कार आणि इतर गुन्ह्यांसारख्या संवेदनशील प्रकरणांचे फोटो आणि व्हिडिओ अस्पष्ट होते. याशिवाय धोकादायक सामग्री काढून टाकण्यास मदत झाली.

ट्विटर संबंधित आणखी वाचा

टि्वटरच्या ब्लू टिकसाठी दरमहा 8 डॉलर (सुमारे 650 रु.) शुल्क आकारण्याची घोषणा कंपनीचे नवे मालक एलन मस्क यांनी केली आहे. अर्थात प्रत्येक देशात हे शुल्क वेगळे असेल असेही मस्क यांनी स्पष्ट केले. सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

बातम्या आणखी आहेत...