आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Twitter Layoffs, Twitter Chief Elon Musk Plans, Fire More Employees At Twitter,  Second Round Of Layoffs From Sales, Latest News 

सोमवारी पुन्हा ट्विटरमध्ये होऊ शकते कर्मचारी कपात:एलन मस्क यांचे आता विक्री आणि भागीदारी विभागातील कर्मचाऱ्यांवर लक्ष्य

15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ट्विटरचे नवीन मालक एलन मस्क सद्या ट्विटर कंपनीतून आणखी कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा विचार करित आहेत. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, 2 दिवसांपूर्वी अनेक ट्विटर अभियंत्यांच्या सामूहिक राजीनाम्यानंतर, मस्क यांनी आता विक्री आणि भागीदारी विभागातील कर्मचाऱ्यांना कंपनीतून काढून टाकण्यासाठी लक्ष्य केंद्रीत केले आहे.

ट्विटरमध्ये सोमवारी कर्मचारी कपातीचा सेकंड राऊंड
रिपोर्टनुसार, एलन मस्क सोमवारी कर्मचारी कपातीच्या ट्विटरमध्ये दुसऱ्या फेरीतून बाहेर पडू शकतात. मस्क यांनी ट्विटरच्या 7,500 कर्मचार्‍यांपैकी 50% पेक्षा जास्त कर्मचारी आधीच काढून टाकले आहेत. 18 नोव्हेंबर रोजी 1,200 हून अधिक ट्विटर कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला. अहवालानुसार, विक्री, भागीदारी आणि इतर तत्सम भूमिकांच्या तुलनेत तांत्रिक भूमिकेतील अधिक कर्मचाऱ्यांनी कंपनीतून काम सोडणे पसंत केले. हे सर्व राजीनामे एलन मस्क यांच्या अल्टिमेटमनंतर आले आहेत. ज्यात त्यांनी इशारा दिला होता की जास्त तास काम करण्यास तयार राहा अन्यथा कंपनी सोडा. ट्विटरचे नवे बॉस एलोन मस्क यांनी या राजीनाम्यांवर सांगितले की, मला पर्वा नाही. बेस्ट काम करणारे कर्मचारी अजूनही माझ्यासोबत आहेत.

44 अब्ज डॉलर्समध्ये ट्विटर कंपनी मस्क यांनी खरेदी केली होती. त्यानंतर त्यांनी कंपनीत अतिशय झपाट्याने बदल करण्यास सुरूवात केली.
44 अब्ज डॉलर्समध्ये ट्विटर कंपनी मस्क यांनी खरेदी केली होती. त्यानंतर त्यांनी कंपनीत अतिशय झपाट्याने बदल करण्यास सुरूवात केली.

विक्री आणि भागीदारी विभागातील प्रमुखांना काढून टाकले

अमेरिकेतील काही माध्यमांच्या अहवालानुसार, एलन मस्क यांनी विक्री आणि भागीदारी विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांना त्यांच्या विभागातील कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. प्रत्युत्तरात, मार्केटिंग-सेल्सवर देखरेख करणारे रॉबिन व्हीलर आणि भागीदारी व्यवस्थापित करणाऱ्या मॅगी सुनीविक यांनी तसे करण्यास नकार दिला. यामुळे रॉबिन आणि मॅगी दोघांनाही त्यांच्या नोकरीतून काढून टाकले होते.

अहवालात सूत्रांच्या हवाल्याने असे म्हटले आहे की, व्हीलर यांनी या महिन्याच्या सुरुवातीला ट्विटर सोडण्याचा विचार केला होता, परंतु नंतर कंपनीत राहण्यासाठी त्यांना राजी करण्यात आले. त्यांनी प्रायोजकांपर्यंत पोहोचण्याच्या त्यांच्या प्रयत्नांमध्ये मस्कला सहाय्य केले आहे. जे ट्विटरच्या बदलत्या प्राधान्यक्रम आणि उद्दिष्टांसाठी आवश्यक होते. मोठ्या कंपन्यांनी जाहीर केले आहे की, ते त्यांचे ट्विटर खर्च थांबवू लागले आहेत.

ट्विटर मोठ्या बदलांमधून जात आहेत
एलन मस्क यांनी ऑक्टोबरमध्ये 44 अब्ज डॉलर म्हणजेच 3.58 लाख कोटी रुपयांना ट्विटर विकत घेतले. ट्विटरचा पदभार स्विकारल्यापासून एलन मस्क यांनी कंपनीत मोठे बदल करण्यात व्यस्त आहेत. काही दिवसांपूर्वी, त्यांनी पहिल्या फेरीत सुमारे 3,700 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते. त्याचवेळी, भारतातील कंपनीच्या 90% कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले.

कंपनीचे दररोज 32 कोटींचे नुकसान
टाळेबंदीवर, मस्क म्हणाले होते, "जेव्हा कंपनीला दररोज 4 दशलक्ष डॉलर (32.77 कोटी रुपये) नुकसान होत आहे, तेव्हा आमच्याकडे कर्मचार्‍यांना काढून टाकण्याशिवाय पर्याय नाही." ज्यांना बेदखल करण्यात आले आहे त्यांना 3 महिन्यांचा विच्छेद देण्यात आला आहे, जो वैधानिक रकमेपेक्षा 50% जास्त आहे.

ब्लू सबस्क्रिप्शन सेवा

मस्क यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, आता यूजरला ब्लू टिक्ससाठी म्हणजेच ट्विटरवरील व्हेरिफाईड अकाउंटसाठी प्रत्येक महिन्याला $8 (सुमारे 660 रुपये) द्यावे लागतील. हे शुल्क देशानुसार वेगवेगळे असेल. इलॉन मस्क यांनी 27 ऑक्टोबर रोजी ट्विटर खरेदी केल्यानंतर पाच दिवसांनी मंगळवारी रात्री ही घोषणा केली. मात्र, बनावट खात्यांच्या वाढत्या संख्येमुळे ही सेवा थांबवण्यात आली आहे. 29 नोव्हेंबर रोजी ते पुन्हा लाँच केले जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...