आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Twitter Rolls Out $8 Blue Tick Verification Service On IOS, IOS Users Have To Pay, Co founder Of Twitter Apologized To The Public, Latest News

ट्विटरची ब्लू टिक सेवा 5 देशांमध्ये सुरू:आता iOS वापरकर्त्यांना पैसे लागतील; ट्विटरच्या संस्थापकांनी मागितली कर्मचाऱ्यांची माफी

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ट्विटरवर ब्लू टिकसाठी 8 डॉलरच्या प्लॅनची सुरूवात झाली आहे. माध्यमांच्या अहवालानुसार हा प्लॅन फक्त iOS यूजर्ससाठी सुरु करण्यात आला आहे. यूएस, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि यूकेमध्ये ही योजना सुरू करण्यात आली आहे.

दुसरीकडे, ट्विटरचे सह-संस्थापक जॅक डोर्सी यांनी कर्मचाऱ्यांची माफी मागितली आहे. ते म्हणाले की मी कंपनीला फार कमी वेळात मोठे केले ही माझी चूक आहे. मला मान्य आहे की बरेच लोक माझ्यावर रागावले आहेत, माझ्यामुळे तुमच्यावर अशी अवस्था आलेली आहे.

जॅक डोर्सी यांनी लिहिले की, Twitter वर काम करणारे लोक भूतकाळातील आणि वर्तमानकाळातील, मजबूत आणि प्रतिभावान आहेत. वेळ कितीही कठीण असली तरी ते नेहमीच त्यांचा मार्ग शोधतील. जॅक म्हणाले की, ट्विटरसाठी काम करणाऱ्या प्रत्येकाचा मी आभारी आहे.

एलन मस्क यांनी ट्विटर विकत घेतले आणि सुमारे 7500 कर्मचाऱ्यांपैकी 3500 कर्मचाऱ्यांना काढून टाकले. तर ब्ल्यू टिकसाठी मस्क यांनी पैसे घेतले जातील, असा इशारा दिला. एव्हाना पाच देशात ही योजना सुरू देखील करण्यात आली. वेगवेगळ्या देशांमध्ये त्याचे शुल्क वेगवेगळे असेल. भारतात याच्या किंमतीबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. आता कोणीही पैसे देऊन ब्लू टिक घेऊ शकतो, असे ट्विट करून त्यांनी स्पष्ट केले आहे.

ब्लू टिक मिळवून वापरकर्त्यांना काय फायदे आहेत?
पेड सबस्क्रिप्शन घेणाऱ्यांना 5 प्रकारच्या सुविधा मिळणार आहेत.

  • उत्तर
  • उल्लेख
  • शोधकार्यात प्राधान्य दिले जाईल
  • मोठे व्हिडिओ आणि ऑडिओ पोस्ट करू शकता
  • सामान्य वापरकर्त्यांच्या तुलनेत निम्म्या जाहिराती पाहिल्या जातील
  • याशिवाय स्पॅमला आळा घालण्यासाठी हे फिचर मदत करेल. जर प्रकाशकांचा Twitter सोबत करार असेल तर ब्लू टिक सदस्य सशुल्क लेख देखील विनामूल्य वाचू शकतात.

चला हा मुद्दा 4 प्रश्नांसह समजून घेऊया...

1. आता ब्लू टिक कसे मिळवायचे?
आता कोणतेही शुल्क आकारले जात नाही. कंपनीच्या विहित प्रक्रियेनंतर वापरकर्त्यांना ब्लू टिक दिली जाते. कोणत्याही वापरकर्त्याच्या प्रोफाइलवर टिक आहे याचा अर्थ ते खाते सत्यापित केले आहे.

2. आता काय बदल होणार आहे?
ट्विटरवर ब्लू टिकसाठी वापरकर्त्याला सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल. आता तुम्हाला दरमहा 660 रुपये (8 डॉलर) द्यावे लागतील. मात्र, सशुल्क सेवा कधी लागू होणार याची तारीख अद्याप ठरलेली नाही.

3. फी सर्व देशांमध्ये समान असेल का?
इलॉन मस्क म्हणाले की, प्रत्येक देशानुसार शुल्क बदलू शकते. फी त्या देशाची क्रयशक्ती आणि क्षमता यावर अवलंबून असेल. भारतात ते किती असेल, याबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही.

4. सेलिब्रिटींच्या प्रोफाइलवर एक विशेष दुय्यम टॅग असेल
जे सार्वजनिक व्यक्ती आहेत, म्हणजे राजकारणी आणि अभिनेते यासारख्या सेलिब्रिटींना प्रोफाइलवर दुय्यम टॅग मिळेल. हा दुय्यम टॅग सद्या फक्त काही देशांमध्ये उपलब्ध आहे. हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्या ट्विटर अकाऊंटवर पाहिले जाऊ शकते. युनायटेड स्टेट्स सरकारी अधिकारी त्याच्या नावाखाली दुय्यम टॅग म्हणून लिहिलेले आहे. सध्या हा टॅग भारतात उपलब्ध नाही.

सद्या हे ब्लू टिक सेवा या देशांमध्ये उपलब्ध
सध्या, लेबल चीन, फ्रान्स, रशिया, युनायटेड किंगडम, युनायटेड स्टेट्स, बेलारूस, कॅनडा, जर्मनी, इटली, जपान, क्युबा, इक्वेडोर, इजिप्त, होंडुरास, इंडोनेशिया, इराण, सौदी अरेबिया, सर्बिया, स्पेन, थायलंड, तुर्की, युक्रेन आणि संयुक्त अरब अमिराती यांना दिले आहे.

नवीन वैशिष्ट्यांसाठी नोव्हेंबर 7 अंतिम मुदत
ट्विटर सद्या पडताळणी प्रक्रियेत सुधारणा करण्यावर काम करत आहे. ट्विटरच्या या प्रकल्पावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हे फीचर सुरू करण्यासाठी 7 नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. तसे न केल्यास त्यांना कंपनीतून काढून टाकले जाईल. सद्या, कंपनीचा बहुतेक महसूल जाहिरातींमधून येतो. परंतू मस्कला कंपनीच्या एकूण कमाईपैकी अर्धा हिस्सा सबस्क्रिप्शनमधून हवा आहे.

बातम्या आणखी आहेत...