आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एलन मस्क यांनी ट्विटर ऑफिसचे भाडे थकवले:सॅन फ्रान्सिस्कोतील इमारत मालकाने खटला दाखल केला; पंधरा दिवसांपूर्वी दिली होती चेतावणी

सॅन फ्रान्सिस्कोएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोमध्ये बांधलेल्या ट्विटर कार्यालयाचे भाडे न दिल्याने ट्विटरवर कंपनीवर जागेच्या मालकाने खटला दाखल केला आहे. जगातील श्रीमंताच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या मस्क यांच्या कंपनीवर ही नामुष्की ओढावली आहे.

स्टेट कोर्टात याचिका; ट्विटरकडून नो रिस्पॉन्स

विविध माध्यमांच्या अहवालानुसार, इमारत मालकाने सांगितले की, त्याने 16 डिसेंबर रोजी एलन मस्क यांना व त्यांच्या कंपनीला इशारा दिला होता की, हार्टफोर्ड इमारतीच्या 30 व्या मजल्यावरील भाडेपट्टी पाच दिवसांच्या आत भरली जावी. ठरलेला करार संपुष्टात येत आहे. जर त्वरीत भाडे भरले गेले नाही तर त्याला डिफॉल्ट घोषित केले जाईल. परंतु या इशाऱ्याची एलन मस्क यांच्याकडून गांभीर्याने दखल घेण्यात आली नाही. त्यांनी गुरूवारी सॅन फ्रान्सिस्कोमधील स्टेट कोर्टात याचिका दाखल केली. मात्र, अद्याप या प्रकरणी ट्विटरकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

इमारतीच्या मालकाने जागा खाली करण्याची मागणी केली
जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांच्या ट्विटर या कंपनीने जगभरातील इतर कार्यालयांचे भाडेही भरलेले नाही. मस्कने ट्विटरचा ताबा घेतल्यापासून मालमत्तेच्या मालकांना भाडे मिळालेले नाही. इमारत मालक ट्विटरला मालमत्ता रिकामी करण्यास सांगत आहेत, परंतु कंपनीकडून कोणताही प्रतिसाद दिला जात नाही. काही प्रकरणांमध्ये, भाडेतत्त्वावरील करारानुसार इमारतींचे मालक ट्विटर कंपनीला जागा खाली करण्यास सांगत आहेत, तर असे काही मालक आहेत, जे ट्विटरकडे फक्त जागा खाली करण्याची मागणी करित आहेत. त्यांना थकबाकी देखील नको आहे.

बातम्या आणखी आहेत...