आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Twitter Subscription Update | Elon Musk Will Introduce New Subscription Plan | Zero Ads | Elon Musk

मस्क आणणार शून्य जाहिरात सबस्क्रिप्शन:ट्विटर ब्लूच्या 8 डॉलर प्लॅनपेक्षा महागडे राहील, कंपनीची 90% कमाई होते जाहिरातीमधून

वॉशिंग्टन7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मायक्रोब्लॉगिंग फ्लॅटफॉर्म ट्विटर चे मालक एलन मस्क यांनी नुकतीच आणखी एक घोषणा केली आहे. ज्यामध्ये ते म्हणाले की, शून्य (ZERO) झीरो जाहिरातींसह हायर प्राईज्ड सदस्यता मॉडेलचा प्लॅन आणणार आहे. मस्क म्हणाले, ट्विटरवरील जाहिराती खूप वारंवार आणि खूप मोठ्या असतात. येत्या आठवडाभरात या दोन्हीसाठी पावले उचलली जातील. तथापि, सबस्क्रिप्शन मॉडेलची किंमत कशी असेल आणि ते कोणत्या तारखेपर्यंत आणले जाईल हे त्यांनी स्पष्ट केले नाही.

ट्विटरची 90% कमाई जाहिरातीतून
ट्विटर त्याच्या कमाईपैकी 90% जाहिरातींमधून कमावते. ऑक्टोबरमध्ये मस्कच्या ट्विटर अधिग्रहणानंतर कंपनीच्या जाहिरात महसूलात झपाट्याने घट झाली आहे. द इन्फॉर्मेशनने प्रकाशित केलेल्या अलीकडील अहवालानुसार, गेल्या मंगळवारी दैनंदिन महसूल एका वर्षापूर्वीच्या याच दिवसाच्या तुलनेत 40% कमी होता. मस्क यांनी महसुलातील घट बाबत अधिकार संस्थांवर दोष दिला, ज्यांनी ब्रँडवर जाहिराती थांबवण्यासाठी दबाव आणला.

ब्लू ची परवडणारी वार्षिक योजना सादर
यापूर्वी ट्विटरने ब्लू सबस्क्रिप्शनसाठी नवीन वार्षिक योजना सादर केली होती. मासिक योजनेच्या तुलनेत ही योजना फायदेशीर आहे. ट्विटर ब्लूच्या मासिक योजनेची किंमत $8 आहे. परंतू वार्षिक योजना $84 मध्ये खरेदी केली जाऊ शकते. म्हणजेच वार्षिक योजनेवर सुमारे 22 डॉलरची बचत होईल. यामध्ये युनायटेड स्टेट्स, युनायटेड किंगडम, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि जपान यांचा समावेश आहे.

अॅपल स्टोअरवर वार्षिक योजना उपलब्ध नाही
Apple च्या iOS द्वारे Twitter ब्लू सदस्यता खरेदी करणार्‍या वापरकर्त्यांसाठी दरमहा 11 डॉलरची किंमत आहे. वार्षिक योजना iOS वर उपलब्ध होणार नाही. ब्लू सबस्क्रिप्शनसह, ब्लू चेकमार्कसह इतर काही वैशिष्ट्ये दिली आहेत. त्यामुले प्रोफाईलवर निळा चेकमार्क दिसण्यासाठी वेळ लागू शकतो. कारण तो पुनरावलोकनानंतरच दिला जातो. त्याचवेळी, नवीन तयार केलेल्या ट्विटर खात्यावर 90 दिवसांसाठी ब्लू सबस्क्रिप्शन घेता येणार नाही.

बातम्या आणखी आहेत...