आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Two Out Of Every Three Customers Plan To Shop For Diwali, Preferring Ready made Clothes

दिव्य मराठी विशेष:दर तीनपैकी दोन ग्राहक दिवाळीत खरेदीचे नियोजन करताहेत, तयार कपड्यास प्राधान्य

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सणात ग्राहकांचा खरेदीचा मूड, मंदी जाण्याची आशा

जवळपास चार महिन्यांच्या निराशाजनक कालखंडानंतर या सणात बाजारांत उत्साह वाढण्याची शक्यता आहे. लोक खरेदी करण्यासाठी तयार आहेत. यामुळे दिवाळीच्या आसपास सामान्य आवश्यकतेच्या श्रेणीतील अनेक उत्पादनांच्या विक्रीत वाढ होऊ शकते.

दिवाळी २०२०: खरेदीचा कल या संदर्भातील अहवालानुसार, दर तीनपैकी दोन ग्राहकांनी मान्य केले की, या वेळी दिवाळीत खरेदीची योजना आखत आहेत. हा अहवाल एक खासगी मंच टीआरए रिसर्चने तयार केला आहे. सध्याच्या तुलनेत सणात खरेदीबाबत सकारात्मक कल बाळगणाऱ्या अशा लोकांची संख्या सुमारे ६५ टक्के आहे. २८ टक्के लोकांच्या मानसिकतेत कोणताही फरक पडला नाही. अहवालात नमूद केले की, दिवाळी पारंपरिक दृष्ट्या असा सण आहे जो बाजारात मागणी निर्माण करण्याच्या दृष्टीने ओळखला जातो आणि ग्राहकही जास्तीत जास्त खर्च करण्याच्या मूडमध्ये असतात. मोठमोठ्या ब्रँड्सनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तयारी केली आहे. या वेळी दिवाळी अनेक प्रमुख ब्रँड्स‌साठी निर्णायक होऊ शकते. कोरोनाच्या परिणामावर अहवालात प्रकाश टाकण्यात आला आहे.

मोबाइल फोन, दुचाकी, इलेक्ट्रॉनिक्स आणि अॅपरल बाजारात तेजी राहील
अहवालानुसार, सणासुदीत मोबाइल फोन, ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, टीव्ही, दुचाकी वाहन, तयार कपडे-अॅपरल, होम फर्निचर, सराफा बाजारात मागणी वाढेल. या श्रेणीतील उत्पादनांना ग्राहकांचे उच्च प्राधान्य अाहे. यानंतर कार, किचन अॅसेसरीज, लॅपटॉपसारख्या वस्तू मध्यम स्तराच्या प्राधान्य आहेत. प्रवास आणि आपल्या घराची सजावट करण्यास सर्वात खालचे प्राधान्य राहील.

बातम्या आणखी आहेत...