आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Two Thousand Personal Loan App Block I Imposing Exorbitant Interest Rates I Processing Fees And Abusive Terms I Play Store Policy Not Followed

दोन हजार पर्सनल लोन अ‌ॅप ब्लॉक:​व्याज दर मोठे, प्रक्रिया शुल्क व अपमानजनक अटी लादणे; प्ले स्टोअर धोरणाचे पालन केले नाही

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्ही ज्या अ‌ॅपवरून वैयक्तिक कर्ज घेतले आहे. किेंवा घेण्याचा विचार करत आहात. ते अ‌ॅप कदाचित प्ले स्टोअरवर दिसणार नाही. गुगलने भारतातील ‌अ‌ॅप मार्केट प्लेसवर जवळपास दोन हजार पर्सनल लोन अ‌ॅप ब्लॉक केले आहेत. गुगलच्या म्हणण्यानुसार हे अ‌ॅप त्याच्या धोरणांचे पालन करत नाहीत.

गुगल एशिया-पॅसिफिकचे वरिष्ठ संचालक आणि ट्रस्ट व सेफ्टी प्रमुख, सैकत मित्रा म्हणाले की, प्ले स्टोअरवरून मोठ्या प्रमाणावर अ‌ॅप्स काढून टाकण्यात आले आहेत. निम्माहून अधिक पर्सनल लोन देणारे अ‌ॅप आता प्ले स्टोअरवर उपलब्ध नाहीत. सैकत मित्रा म्हणाले की, गुगल काही भागधारकांसोबत बऱ्याच काळापासून काम करत आहे. यामध्ये सरकारी एजन्सी, मीडिया आणि यूजर रेफरल्स यांचा समावेश आहे.

पाळत ठेवण्यासाठी एआय यंत्रणा गरजेची

याशिवाय प्ले स्टोअरवर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोकांवर नजर ठेवण्यासाठी कंपनीने आपली कृत्रिम बुद्धिमत्ता यंत्रणा ठेवली आहे. त्यातून समोर आलेल्या गोष्टींच्या आधारे ही अ‌ॅप प्ले स्टोअरवरून काढून टाकण्यात आली. मित्रा म्हणाले की, चुकीच्या व्यवसाय पद्धतींचे पालन करणारे अ‌ॅप ब्लॉक करणे. भारतापेक्षा इंडोनेशियासारख्या देशांमध्ये सोपे आहे. तेथे फक्त सरकार मान्यताप्राप्त अ‌ॅप कर्ज दिले जाऊ शकते.

जास्त व्याजदर व प्रक्रिया शुल्क मोठ्या प्रमाणात

गुगलने स्पष्ट केले आहे की, प्ले स्टोअरवर ब्लॉक केलेल्या अ‌ॅप जास्त व्याजदर, उच्च प्रक्रिया शुल्क आणि अपमानजनक अटींसह कर्ज प्रदान करणे आवश्यक आहे, असे म्हणता येणार नाही. हे काढण्यासाठी कंपनीचे स्वतःचे निकष आहेत.

ऑनलाइन कर्ज देण्याबाबत अनेक तक्रारी प्राप्त
ऑनलाइन कर्ज देण्यामध्ये अशा अनेक समस्या समोर आल्या आहेत. ज्यामुळे सरकारी संस्था आणि आरबीआयला नियम कडक करावे लागले आहेत. कंपनीने असेही म्हटले आहे की, ब्लॉक केलेल्या अ‌ॅपचे विकसन चीनशी संबंधित आहेत. की नाही हे शोधण्याचा प्रयत्न केला नाही.

बातम्या आणखी आहेत...