आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Business
 • UAN Aadhaar Linking Deadline Extended For EPFO Subscribers, Will Now Be Able To Link Till December 31

महत्त्वाची बातमी:UAN-आधार लिंक करण्याच्या मुदतीत वाढ, आता 31 सप्टेंबरपर्यंत करता येणार लिंक

मुंबईएका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक

ईपीएफओने एक दिलासादायक बातमी दिली आहे. ईपीएफओने कर्मचाऱ्यांच्या ईपीएफ खात्याशी आधार लिंक करण्याच्या मुदतीत वाढ केली आहे. या निर्णयानुसार, ईपीएफओ कर्मचाऱ्यांना 31 डिसेंबरपर्यंत लिंक करता येणार आहे. यापूर्वी 31 आॅगस्ट ही शेवटची तारीख होती.

अशी आहे प्रक्रिया?

 • सर्वात आधी EPFO ​​पोर्टल epfindia.gov.in वर जा
 • UAN आणि पासवर्ड वापरुन आपल्या खात्याला लॉग इन करा
 • "Manage” विभागात KYC पर्यायावर क्लिक करा.
 • यानंतर उघडलेल्या पेजवर आपण आपल्या EPF खात्याशी जोडलेले अनेक कागदपत्रे पाहू शकता.
 • यानंतर आधारचा पर्याय निवडा आणि आधार कार्डवर असलेले तुमचे नाव टाईप करून save वर क्लिक करा.
 • तुम्ही दिलेली माहिती सुरक्षित होईल. तुमचे आधार UIDAI च्या डेटासोबत व्हेरिफाईड केले जाईल.
 • तुमचे KYC दस्तऐवज बरोबर असल्यास तुमचे आधार कार्ड लिंक होऊन जाईल. त्यानंतर तुमच्या आधार तपशीलांसमोर “Verify” लिहून येईल.

लिंक न केल्यास थांबू शकतात पैसे
जर तुम्ही 1 सप्टेंबरपूर्वी EPFO ​​आणि आधार क्रमांक लिंक केले नाही, तर तुमच्या खात्यात कंपनीकडून येणारे योगदान थांबवले जाईल. या व्यतिरिक्त तुम्हाला ईपीएफ खात्यातून पैसे काढण्यातही अडचणी येऊ शकतात. जर EPF खातेधारकाचे खाते आधारशी जोडलेले नसेल तर ते EPFO ​​च्या सेवा वापरू शकता येणार नाही.

बातम्या आणखी आहेत...