आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउबेर टेक्नॉलॉजीज इंक भारतीय कॅब-राइड व्यवसाय विकण्याची शक्यता शोधत आहे. मात्र योग्य मूल्य न मिळाल्यामुळे सध्या या विषयावरील विचारविनिमय लांबणीवर टाकला आहे. सूत्रांनुसार, भारतात लाभदायक विस्ताराची क्षमता मर्यादित आहे असे कंपनीला वाटते. यानंतर अमेरिकी कंपनीने भारतीय कॅब-राइड व्यवसायापासून विविध पर्यायांवर विचार सुरू केला होता. त्यांनी याबाबत विविध इच्छुकांशी चर्चा सुरू केली होती. स्थानिक कंपन्यांशी स्टॉक स्वॅप डील किंवा उबेर पूर्णपणे बाहेर पडण्यावर चर्चा करत होती. एका कंपनीशी अशीही चर्चा झाली, ज्याअंतर्गत व्यवहार झाल्यास उबेरला भारतात पाय पसरण्यास मदत मिळाली असती. मात्र जगभरातील शेअर बाजारांतील घसरण पाहता ही योजना रखडली. उबेर आणि तिची स्थानिक स्पर्धक ओलाची भारतात वेगाने वाढ झाली असती.
मात्र भाड्याबाबतच्या संवेदनशील बाजारातून नफा कमावण्यासाठी कंपन्या झगडत आहेत. एकीकडे, चालकांची कमतरता कंपन्यांच्या नफ्यावर दबाव टाकत असताना दुसरीकडे, चालक भत्ता आणि कॅश सबसिडीमुळेही कंपन्यांसमोर अडचणी येत आहेत. उबेर मार्केट स्थानिक ऑपरेटर्सकडे सोपवले जावे ही पण एक शक्यता आहे. मात्र भविष्यातील शक्यता पाहता प्रमुख स्थानिक कंपनीत इक्विटी हिस्सेदारी स्वत:जवळ ठेवण्याचा पर्याय आहे. उबेर इंडियाच्या प्रवक्त्या रुचिका तोमर म्हणाल्या की, भारतीय बाजारपेठेतून बाहेर पडण्याचा आम्ही विचार केला नाही. आम्ही भरती करत आहोत. उबेरमध्ये मे महिन्यात बंगळुरू आणि हैदराबाद इंजिनिअरिंग सेंटरमध्ये ५०० टेक कर्मचाऱ्यांना सामावून घेण्याची घोषणा केली आहे.
जानेवारी २०२० मध्ये फूड डिलिव्हरी व्यवसाय विकला
२०१९ मध्ये आयपीओ आल्यानंतर उबेरच्या शेअरमध्ये वाढ झाली. नफ्यात राहण्यासाठी जानेवारी २०२० मध्ये उबेरने भारतातील फूड डिलिव्हरी व्यवसाय झोमॅटोला विकला आहे. त्या बदल्यात कंपनीला स्थानिक स्टार्टअपमध्ये ९.९९% हिस्सेदारी मिळाली. सॅन फ्रान्सिस्कोची कंपनी उबेरने भारतात २०१३ मध्ये आपली कॅब सेवा सुरू केली होती. उबेर देशात सुमारे १०० शहरांत कॅब-राइड सेवा देते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.