आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होम लोनविषयी महत्त्वाचे:गृह कर्ज नाकारले जाण्याची सर्वात महत्वाची कारणे घ्या समजून

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कर्जदाते तुमचा गृह कर्जाचा अर्ज नाकारण्याची काही महत्वाची कारणे

गृह कर्ज तुमच्या मालकीच्या मालमत्तेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठीची एक सुविधा आहे- ती जरी सहाय्यक असली तरी, त्यात सखोल संशोधनाचा आंतर्भाव असतो. तुमच्या गृह कर्जाच्या अर्जावर परिणाम करणा-या महत्वाच्या घटकांबद्दल आणि तुमच्या पात्रतेत तुम्ही कशाप्रकारे सुधारणा करु शकता याबद्दल माहिती मिळवणे महत्वाचे आहे.

बाजारपेठेतला प्रत्येक कर्जदाता त्याचे स्वत:चे पात्रता निकष ठरवतो, जे त्याला अर्जदाराच्या परतावा क्षमतेचे मूल्यांकन करण्याची मुभा देतात. या बाबतीत झालेले कोणतेही दुर्लक्ष गृह कर्ज फेटाळण्यात परिणामित होऊ शकते. त्यामुळे अर्ज करण्याआधी तुम्ही कर्जदात्याच्या पात्रता निकषांना तपासणे महत्वाचे आहे, ज्यामुळे तुमच्या मंजूरीच्या शक्यता वाढतात.

अर्ज करण्याआधी व्यक्तीने तपासायला हवा असा सर्वप्रथम घटक म्हणजे पात्रता. कर्जाची रक्कम आणि अर्ज करतेवेळी तुम्ही निवडत असलेला कालावधी तुमचा मासिक हप्ता किंवा ईएमआय ठरवतात आणि नंतर, कर्जदात्याला कर्जाची परतफेड करण्याच्या तुमच्या क्षमतेचे परिक्षण करु देतात. Home Loan Eligibility Calculator, तुमच्या पात्रतेला तपासण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे, त्यामुळे अपेक्षित कर्जदाराला त्यांच्या कर्जाच्या अपेक्षित रकमेसाठी पात्र बनण्याच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या प्रत्येक बाबीचे अचूकपणे आकलन करता येते.

काही कारणांमुळे कर्जदाते कर्जाचे अर्ज फेटाळतात. चला तर आपण तुम्ही अर्ज करण्याआधी गृह कर्जाला फेटाळण्याच्या या काही महत्वाच्या कारणांची सूची पाहूया, ज्यामुळे तुम्हाला आणखीन चांगली तयारी करता येईल आणि या गुंतागुंतींमधून सहजपणे बाहेर पडता येईल.

कर्जदाते तुमचा गृह कर्जाचा अर्ज नाकारण्याची काही महत्वाची कारणे
तुम्हाला गृहकर्ज देणा-या कर्जदात्याला तुमच्या गृह कर्जाचा अर्ज फेटाळण्याचा अधिकार आहे आणि तुमच्या बोलीला धोक्यात आणणारी ही ७ महत्वाची कारणे आहेत. वाचून अधिक माहिती जाणून घ्या

1. अपूर्ण दस्तऐवजीकरण
अर्जात तुम्ही दिलेल्या सर्व माहितीला संबंधित दस्तऐवजांचे समर्थन असणे आवश्यक आहे. आणखीन सोप्या शब्दांमध्ये सांगायचे झाल्यास, तुम्हाला पॅन कार्ड, आधार कार्ड, सुविधा बिल, वेतनाच्या पावत्या (वेतनधारक अर्जदारांसाठी) किंवा नफा व तोटा विवरणे (स्वयं-रोजगार असलेल्या अर्जदारांसाठी), बॅंक खात्याची विवरणे, आयटीआर तसेच मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे इतर दस्तऐवजांसोबत सादर करावी लागतील.
जर तुम्ही तुमचा रोजगार किंवा उत्पन्न सिध्द करु शकला नाहीत, तर कदाचित कर्जदाता तुमचा अर्ज नामंजूर करु शकतो. या व्यतिरिक्त, प्रश्न असलेली मालमत्ता कोणत्याही कायदेशीर वादामधून मुक्त असणे तसेच तिचे कायदेशीर व तांत्रिक सत्यापन होणे आवश्यक आहे.

2. तडजोड न झालेली शुल्के
तुमचा क्रेडिट इतिहास आणि स्कोर तुमच्या गृहकर्जाच्या अर्जामध्ये अतिशय महत्वाची भूमिका पार पाडतात आणि कर्जदाते मंजूरीचा विचार करण्याआधी या दोन्ही आकड्यांची तपासणी करतात. क्रेडिट इन्फोर्मेशन ब्यूरो इंडिया लिमिटेड (सिबिल) तुमचा सिबिल स्कोर देते जो तुमची क्रेडिटसाठी असलेली पात्रता दर्शवतो. जर तुमची देय थकबाकी असतील किंवा शुल्कांचा समझोता व्हायचा असेल, तर तुम्ही नवीन गृह कर्ज घेण्यासाठी कदाचित कमी पात्र सिध्द होऊ शकता. थोडक्यात सांगायचे झाल्यास, तुमचा क्रेडिट तपशील तुम्ही विश्वासार्ह गृह कर्ज अर्जदार आहात का याचे निर्देशन करतो. नकार टाळण्यासाठी, तुम्ही आधीच्या परतावा वचनांसाठी देखील जवाबदार असणे आवश्यक आहे.

3. वर्तमान बाध्यता
जर तुमच्यावर वर्तमान कर्जे असतील, तर कर्जदाता त्या देयांना पूर्ण करण्यासाठी लागणारी रक्कम तुमच्या उत्पन्नामधून वजा करण्यामार्फत गणन करतो. जर तुम्ही तुमच्या वर्तमान देयांसह एखाद्या विशिष्ट कालावधीमध्ये कर्जाची परतफेड करु शकत नाही असा कर्जदात्याने अंदाज काढला तर तो नवीन कर्जासाठी मंजूरी नाकारु शकतो.

तुमच्या वर्तमान दायित्वांच्या संदर्भामध्ये तुमच्या परताव्याच्या क्षमतेचे अधिक चांगले परिक्षण करण्यासाठी कर्जदाता एफओआयआर किंवा फिक्स्ड ऑब्लिगेशन टू इन्कम रेशो नावाचा निर्देशक वापरतात. तुमचा एफओआयआर जेवढा कमी तेवढी तुमची नवीन कर्ज घेण्याची क्षमता जास्त असते. आजमितीला, बहुतांश कर्जदाते ६०-८०% एफओआयआरसह अर्ज स्वीकारतात, तरी देखील हा आकडा प्रत्येक कर्जदात्यानुसार वेगवेगळा असू शकतो.

4. कामाचा किमान अनुभव
अनुभवाची कमतरता तुमच्या कर्जाच्या अर्जावर नकारात्मकपणे परिणाम करु शकते, कारण उत्पन्नाचा स्थिर स्त्रोत तुमच्या पात्रतेवर परिणाम करणारा सर्वात महत्वपूर्ण घटक आहे. बहुतांश कर्जदार सार्वजनिक किंवा खाजगी किंवा बहुराष्ट्रीय संस्थेत किमान ३ वर्षाचा कामाचा अनुभव असणारे अर्ज स्वीकारतात.

5. तुमचे वय

अर्जदाराचे वय देखील त्यांच्या कर्जदात्यांसाठी निर्णायक बाब असते. निवृत्तीच्या जवळ आलेल्या कर्जदारांना अपेक्षित home loan,कालावधी मिळणे तसे कठीण जाते, कारण ते कदाचित सहमत झालेल्या कालावधीमध्ये कर्जाच्या रकमेची परतफेड करु शकणार नाहीत असे कर्जदात्यांना वाटू शकते.

असे अर्ज बरेचदा फेटाळले जातात किंवा त्यांना उच्च ईएमआय असलेली कमी कालावधीची गृह कर्जे दिली जातात. कमी वयाच्या अर्जदारांना गृह कर्जासाठी मंजूरी मिळण्याच्या शक्यता जास्त असतात, कारण ते जास्त वर्षे कार्यरत राहू शकतात. जास्त वयाच्या अर्जदारांच्या स्थितीत कमी वयाच्या सहकर्जदारासोबत अर्ज करुन ते मंजूरीच्या शक्यता वाढवू शकतात.

6. गृह कर्जासाठीचा तुमचा सिबिल स्कोर
कर्जदाते तुमच्या सिबिल स्कोरला तुमच्या अर्जाला मंजूर करण्याचा निर्णय घेण्याआधी विचारात घेतात. आम्ही अशी शिफारस करु की, तुम्ही तुमचा स्कोर ७५०हून जास्त किंवा किमान ७२५ झाला की कर्जाचा अर्ज करावा. ७२५ पेक्षा कमी स्कोर नामंजूरीत किंवा अपेक्षित नसलेल्या कर्ज कालावधीत परिणामित होऊ शकतो.

7. आधीचे गृह कर्ज अर्ज
तुमच्या क्रेडिट नोंदी देखील तुमच्या आधीच्या गृह कर्ज अर्जांची –मंजूर केलेल्या आणि नामंजूर केलेल्या दोन्ही अर्जांची सूची दाखवतात. यामुळे तुमच्या अपेक्षित कर्जदात्यांना तुमच्या क्रेडिट प्रदर्शनाचे मूल्यांकन करण्याची आणि तुम्ही चूक न करणारे बॅंकेबल कर्जदार आहात हे पाहण्याची संधी मिळते. जर तुम्हाला आधी नकार मिळाला असेल तर, तुमचा गृह कर्जाचा अर्ज आणखीन परिक्षणाच्या अधीन होईल. अशाप्रकारे साहजिकपणे तुम्ही तुमच्या प्रोफाइलला सुधारण्यासाठी प्रयत्न करायला हवा, जेव्हा मंजूरीच्या शक्यता सर्वात जास्त असतील केवळ तेव्हाच अर्ज करा.

आजच गृह कर्ज घ्या
आता तुम्हाला तुमच्या गृह कर्जाच्या अर्जाला फेटाळण्यासाठी कारणीभूत ठरणारी काही महत्वाची कारणे माहित आहेत, त्यामुळे तुम्ही त्यांना सहजपणे टाळून सर्व बॉक्सवर टिक येईल असा अर्ज करु शकता. घर खरेदी करण्याबद्दल जर कोणी गंभीरपणे निधी गोळा करण्याचा विचार करत असेल तर आवश्यक ती खबरदारी घेऊन त्यांनी स्वत:ला क्रेडिटसाठी पात्र कर्जदार सिध्द करणे आवश्यक आहे.

कर्ज देणारे कर्जदाता निधींना तत्काळ वितरीत करण्यासह low interest home loan देतात- आपले स्वप्नातले घर खरेदी करण्याचा विचार करणा-या व्यक्तींसाठी हा एक आदर्श वित्त विकल्प आहे. आजमितीला, वेतनधारक आणि व्यावसायिक अर्जदार ६.७०% प्रति वर्ष एवढ्या कमी व्याज दराने गृह कर्जांचा लाभ घेऊ शकतात.

बातम्या आणखी आहेत...