आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलासा:बेरोजगारी 6 महिन्यांत सर्वात कमी, दमदार पावसामुळे ग्रामीण भागांत वाढलेल्या कामांमुळे दिसत आहे परिणाम

नवी दिल्ली12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बेरोजगारी वाढण्याचा दर गेल्या ६ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर (६.८० टक्के) आला आहे. जूनमध्ये देशात ७.८० टक्के बेरोजगारी वाढली होती. यंदा पाऊस चांगला झाल्याचा हा परिणाम आहे. यामुळे ग्रामीण भागात शेतीची कामे वेगाने वाढली आहेत. खासगी संशोधन संस्था ‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’च्या (सीएमआयआय) आकडेवारीनुसार, जुलैमध्ये ग्रामीण भागात बेरोजगारी ६.१४ टक्क्यांनी वाढली. या तुलनेत जूनमध्ये ८.०३ टक्के वाढली होती. तथापि, शहरी भागात बेरोजगारी दर ७.३० टक्क्यांवरून ८.२१ टक्के झाला आहे. वस्तुत: २९ जुलैपर्यंतच्या स्थितीनुसार देशात सरासरीपेक्षा ९ टक्के अधिक पाऊस झाल्याने ग्रामीण भागात रोजगार वाढला आहे. सोमवारी प्रसिद्ध झालेल्या अहवालात म्हटले आहे की, देशात बेरोजगारी कमी होणे तत्काळ दिलासा देणारी बाब ठरू शकते.

छत्तीसगड : बेरोजगारी १% ने कमी, हरियाणात सर्वाधिक २७ टक्के सीएमआयआयच्या आकडेवारीनुसार, जुलैमध्ये छत्तीसगडमध्ये बेरोजगारी दर १ टक्क्यापेक्षाही कमी राहिला. शेजारी राज्य मध्य प्रदेशातही बेरोजगारी दर फक्त २ टक्के नोंदवला गेला. मजेशीर बाब म्हणजे बेरोजगारी दर कमी होण्यात उत्तर प्रदेशने महाराष्ट्राला मागे टाकले आहे. दुसरीकडे झारखंड, बिहार, राजस्थान, हरियाणात बेरोजगारी दर अधिक आहे. हरियाणात २६.९% या उच्चांकी पातळीवर आहे. महाराष्ट्र, हरियाणा औद्योगिक राज्ये आहेत.

बातम्या आणखी आहेत...