आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशातील बेरोजगारीचा दर डिसेंबर-2022 मध्ये 8.30 टक्के इतका वाढला आहे. 16 महिन्यांतील हा सर्वाधिक उच्चांक ठरला आहे. यापूर्वी ऑगस्ट 2021 मध्ये बेरोजगारीचा दर 8.32% होता. डिसेंबर 2021 मध्ये तो 7.91 टक्क्यावर आणि नोव्हेंबर-22 मध्ये 8% होता. बेरोजगारीच्या प्रमाणात दिवसेंदिवस होत असलेली वाढ ही प्रामुख्याने शहरी भागातील बेरोजगारी वाढल्यामुळे झाली आहे.
शहरी भागात बेरोजगारीचे प्रमाण सर्वाधिक
डिसेंबरमध्ये शहरी भागातील बेरोजगारीचे प्रमाण 10.09% वर पोहोचले आहे. नोव्हेंबरमध्ये तो 8.96% होता. दुसरीकडे ग्रामीण भागातील बेरोजगारीचे प्रमाण किरकोळ घटले आहे. नोव्हेंबरमध्ये 7.55% च्या तुलनेत डिसेंबरमध्ये ते 7.44% होते. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) चे व्यवस्थापकीय संचालक महेश व्यास यांनी सांगितले की, बेरोजगारीच्या दरात झालेली वाढ भविष्यात दिसते तितकी वाईट नाही. गेल्या काही महिन्यांमध्ये कामगार सहभाग दरात वाढ झालेली आहे. डिसेंबरमध्ये ते 40.48% पर्यंत वाढले. जे 12 महिन्यांतील सर्वाधिक आहे.
जुलै-सप्टेंबरमध्ये बेरोजगारी दर 7.2% वर आला
सर्वात महत्त्वाची बाब सांगितली पाहीजे. ती म्हणजे रोजगाराचे प्रमाण डिसेंबरमध्ये 37.1% पर्यंत वाढले. जे जानेवारी 2022 नंतरचा सर्वाधिक उच्चांक राहीलेला आहे. महागाई आटोक्यात आणणे आणि लाखो तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण करणे, हे नव्या वर्षातील सरकार समोरील सर्वात मोठे आव्हान असणार आहे. NSO ने नोव्हेंबरमध्ये जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, जुलै ते सप्टेंबरमध्ये बेरोजगारीचा दर 7.2% वर आला आहे. तर त्यामागील एप्रिल ते जून या तिमाहीत तो 7.6% च्या पातळीवर होता.
बेरोजगारीचा दर कसा ठरवला जातो?
डिसेंबरमध्ये बेरोजगारीचा दर 7.6% इतका आहे की काम करण्यास इच्छुक असलेल्या प्रत्येक 1000 कामगारांपैकी 76 कामगारांना काम मिळाले नाही. CMIE दर महिन्याला 15 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण करते आणि त्यांच्या रोजगाराच्या स्थितीची माहिती घेते. यानंतर, प्राप्त झालेल्या निकालांवरून एक अहवाल तयार केला जातो.
बेरोजगारीचा दर अर्थव्यवस्थेचे आरोग्य दर्शवतो
CMIE च्या मते, बेरोजगारीचा दर भारतीय अर्थव्यवस्थेचे आरोग्य अचूकपणे प्रतिबिंबित करतो, कारण ते देशाच्या एकूण लोकसंख्येतील बेरोजगारांची संख्या सांगते. थिंक टँक आशावादी आहे की रब्बी पिकांच्या पेरणीत तेजी येईल. याचा अर्थ चालू आर्थिक वर्षात कृषी क्षेत्र पुन्हा एकदा चमकदार कामगिरी करेल. त्यामुळे स्थलांतरित मजूर शेतात परततील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.