आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवी दिल्ली:बेरोजगारी दरात 1.5% वाढ, 16 लाख नोकऱ्या महिनाभरात गेल्या, सीएमआयई या खासगी संस्थेची आकडेवारी

नवी दिल्ली24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात अलीकडेच जीडीपी विकास दर आणि जीएसटी वसुलीचे विक्रमी आकडे आले. तथापि, यादरम्यानच ऑगस्टमध्ये बेरोजगारी दर वाढल्याची चिंताजनक बातमीही आली आहे. देशात बेरोजगारीच्या आकड्यांवर नजर ठेवणाऱ्या सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (सीएमआयई) या खासगी संस्थेच्या ताज्या आकड्यांनुसार राष्ट्रीय बेरोजगारी दर ऑगस्टमध्ये १.३७% नी वाढून ८.३२% झाला. तो जुलैत ६.९५% होता.

ऑगस्टमध्ये शहरी बेरोजगारीचा दर १.५% च्या वाढीसह ९.७८% वर पोहोचला, तर ग्रामीण बेरोजगारीचा दर १.३% वाढीसह ७.६४% झाला. देशात कार्यरत लोकांची संख्या ऑगस्टमध्ये ३९.७७ कोटी राहिली, ती जुलैमध्ये ३९.९३ कोटी होती. देशात एक महिन्यात जवळपास १६ लाख लोक बेरोजगार झाले. त्यात सर्वात मोठी संख्या ग्रामीण भागांतील राहिली. तथापि, त्यामागील मुख्य कारण खरीप हंगामात कमी पेरणी होणे हेही सांगितले जात आहे.

राज्यांत बेरोजगारी दर
सिक्कीममध्ये ०,
हरियाणात सर्वात जास्त ३५.७%
हरियाणा 35.7%
राजस्थान 26.7%
झारखंड 16.0%
बिहार 13.6%
दिल्ली 11.6%
यूपी 7.0%
पंजाब 6.0%
महाराष्ट्र 4.4%
मप्र 3.5%
गुजरात 1.6%

बातम्या आणखी आहेत...