आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Business
 • Union Finance Minister Nirmala Sitharaman Press Conference On Economic Relief Measures

केंद्राकडून आणखी एक पॅकेज:कोरोना प्रभावित उद्योग, व्यवसायांना मदतीसाठी 6,28,993 कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा; आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेला मुदतवाढ

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
 • कॉपी लिंक

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी कोरोना काळात वाइट प्रभाव पडलेल्या उद्योग आणि व्यवसायांना चालना देण्यासाठी आणखी एक आर्थिक पॅकेज घोषित केले. यात नवीन योजनांचा समावेश करण्यात आला आहे. तर काही योजना जुन्याच आहेत. अर्थमंत्र्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना एकूण 6,28,993 कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. या पत्रकार परिषदेत कोण-कोणत्या घोषणा झाल्या हे सविस्तर जाणून घेऊ...

1- आर्थिक मदत

 • कोरोना काळात वाइट प्रभाव पडलेल्या क्षेत्राला चालना देण्यासाठी 1.1 लाख कोटींच्या गॅरंटीड स्कीम
 • आरोग्य विभागासाठी 50 हजार कोटींची घोषणा
 • इतर क्षेत्रांसाठी 60 हजार कोटी रुपये
 • आरोग्य विभागासाठी कर्जावर 7.95% पेक्षा अधिक वार्षिक व्याज नाही
 • इतर क्षेत्रांना कर्जावर व्याज दर 8.25% पेक्षा जास्त नाही

2- ECLGS

 • ECLGS अर्थात एमरजन्सी क्रेडिट लाइन गॅरंटीड स्कीम मध्ये 1.5 लाख कोटी रुपये अतिरिक्त
 • ECLGS 1.0, 2.0, 3.0 मध्ये आता 2.69 लाख कोटींचे वितरण
 • सर्वप्रथम यात 3 लाख कोटींची घोषणा करण्यात आली होती
 • आता या स्कीममध्ये 4.5 लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे
 • आतापर्यंत सामिल करण्यात आलेल्या सर्व सेक्टर्सला मिळेल लाभ

3- क्रेडिट गॅरंटी स्कीम

 • छोटे व्यापारी, व्यावसायिक, मायक्रो फायनान्स इंस्टिट्युटकडून 1.25 लाख पर्यंत कर्ज घेऊ शकतील
 • यावर बँक एमसीएलआरवर कमाल 2% जोडून व्याज लावू शकेल
 • यातून कर्जाची मुदत 3 वर्षांपर्यंत राहील आणि गॅरंटी सरकारची राहील
 • याचे मुख्य कारण कर्ज वाटप करणे राहील
 • 89 दिवसांच्या आतील डिफॉल्टर आणि सर्व प्रकारचे कर्जदार यासाठी पात्र ठरतील
 • याचा लाभ जवळपास 25 लाख लोकांना मिळेल
 • जवळपैस 7500 कोटी रुपयांची तरतूद राहील, 31 मार्च 2022 पर्यंत लाभ मिळेल

4- 11 नोंदणीकृत टूरिस्ट गाइड / ट्रॅव्हल टूरिझ्म स्टेकहोल्डर्सला मदत

 • कोरोनामुळे प्रभावित झालेल्या नोंदणीकृत टूरिस्ट गाइड आणि टूरिझ्म स्टेकहोल्डर्सला वित्तीय मदत केली जाईल
 • यामध्ये परवानाधारक गाइडला 1 लाख रुपये आणि टूरिस्ट एजन्सीला 10 लाख रुपयांचे कर्ज दिले जाईल
 • यावर 100% गॅरंटी राहील. कुठलीही प्रोसेसिंग फी लागणार नाही

5- पहिले 5 लाख परदेशी टूरिस्ट व्हीसा मोफत

 • ही योजना 31 मार्च 2022 पर्यंत लागू राहील
 • यामध्ये 100 कोटी रुपयांपर्यंतची मदत दिली जाईल
 • एका टूरिस्टला केवळ एकदाच लाभ घेता येईल
 • परदेशी टूरिस्ट व्हीसा परवानगी मिळताच लाभ घेता येईल
 • 2019 मध्ये जवळपास 1.93 कोटी परदेशी टूरिस्ट भारतात आले होते

6- आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेचा विस्तार

 • ही योजना गतवर्षी ऑक्टोबरमध्ये करण्यात आली होती
 • यामध्ये आता 31 मार्च 2022 पर्यंत वाढ करण्यात आली
 • यामध्ये जवळपास 21.42 लाख लाभार्थ्यांना 902 कोटी रुपयांची मदत करण्यात आली
 • या योजनेत 15 हजार पेक्षा कमी वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांच्या आणि कंपन्यांचे पीएफ सरकार भरणार आहे
 • सरकारने या स्कीममध्ये 22,810 कोटी रुपये खर्च करण्याचे लक्ष्य ठेवले. याचा लाभ 58.50 लोकांना मिळेल
 • सरकार कर्मचारी-कंपन्यांचा प्रत्येकी 12-12% पीएफ भरत आहे

7- कृषी सबसिडी

 • शेतकऱ्यांना 14,775 कोटी रुपयांची अतिरिक्त सवलत देण्यात आली, यामध्ये 9125 कोटींची सबसिडी डीएपीवर दिली आहे
 • 5650 कोटी रुपयांची सबसिडी एनपीके च्या आधारे दिली
 • रब्बी हंगाम 2020-21 मध्ये 432.48 लाख मॅट्रिक टन गहूची खरेदी करण्यात आली
 • आतापर्यंत शेतकऱ्यांना 85,413 कोटी रुपये थेट देण्यात आले

8- पंतप्रधान दरिद्र कल्याण अन्न योजना

 • कोरोनाने प्रभावित झालेल्या गरीबांच्या मदतीसाठी 26 मार्च 2020 रोजी ही योजना घोषित करण्यात आली
 • सुरुवातीला याचा लाभ एप्रिल ते जून 2020 पर्यंत मिळाला
 • यानंतर ती नोव्हेंबर 2020 पर्यंत वाढवण्यात आली
 • 2020-21 मध्ये या स्कीममध्ये 1,33,972 कोटी रुपये खर्च झाले
 • मई 2021 मध्ये ही योजना पुन्हा घोषित करण्यात आली
 • यामध्ये 80 कोटी गरीबांना 5 किलो अन्न नोंव्हेंबर 2021 पर्यंत मोफत दिले जाणार आहे
 • या योजनासाठी करदात्यांचे 93,869 कोटी रुपये खर्च होतील
 • गतवर्षी आणि यावर्षी मिळून योजनेत 2,27,841 कोटींचा खर्च येईल

विशेष म्हणजे, कृषी सबसिडी आणि प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना या जुन्याच आहेत.

बातम्या आणखी आहेत...