आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Business
 • Union Finance Minister Nirmala Sitharaman Press Conference On Economic Relief Measures; News And Updates

आर्थिक पॅकेजचा बूस्टर डोस:केंद्र सरकारकडून 6.29 लाख कोटी रुपयांचा आणखी एक दिलासा; सीतारमण यांच्या पेटाऱ्यात सर्वांसाठी काही ना काही

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
 • कॉपी लिंक
 • उद्योजक ते शेतकरी सर्वांचीच काळजी

कोरोनामुळे बेहाल अर्थव्यवस्थेसाठी केंद्र सरकारने दुसऱ्या आर्थिक मदत पॅकेजची घोषणा केली आहे. ६ लाख २८,९९३ कोटींच्या या पॅकेजमध्ये गतवर्षी जाहीर पॅकेजमधील अनेक योजनांची व्याप्ती वाढवली आहे. तसेच काही नव्या घोषणाही केल्या आहेत. आरोग्य क्षेत्राला सर्वाधिक मदत, तर बऱ्याच काळापासून मंदीत असलेल्या पर्यटन क्षेत्रालाही बूस्टर डोस दिला आहे. तसेच छोटे कर्जधारक, एमएसएमई यांनाही दिलासा दिला आहे.

इमर्जन्सी क्रेडिट लाइन गॅरंटी योजनेचीही व्याप्ती वाढवली आहे. गतवर्षी सुरू केलेल्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेला नोव्हेंबर, २०२१ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. दुसरीकडे, आत्मनिर्भर भारत रोजगार योजनाही वाढवली आहे. डीएपी व खतांवरील अनुदान वाढवण्याबाबत यापूर्वीही घोषणा करण्यात आली होती. त्यासाठी सोमवारी निधीची घोषणा केली आहे.

उद्योजक ते शेतकरी सर्वांचीच काळजी

 • क्रेडिट गॅरंटी स्कीममध्ये सूक्ष्म वित्त संस्थांकडून लघुउद्योजकांना १.२५ लाखांपर्यंतचे कर्ज.
 • आत्मनिर्भर भारत रोजगार योजना ३१ मार्च २०२२ पर्यंत.
 • शेतकऱ्यांना १४,७७५ कोटींची अतिरिक्त सबसिडी.
 • पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना नोव्हेंबर २०२१ पर्यंत.
 • ईसीएलजीएसमध्ये या वेळी १.५ लाख कोटी अतिरिक्त.
 • गावांत ब्रॉडबँडच्या भारतनेट योजनेसाठी १९,०४१ कोटी.
 • लार्ज स्केल इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंगमध्ये वाढवली पीएलआयची कालमर्यादा.

सीतारमण यांच्या पेटाऱ्यात सर्वांसाठी काही ना काही
तिसऱ्या लाटेशी लढण्याची तयारी
आरोग्य क्षेत्रासाठी २३,३२० कोटींच्या नव्या योजनेची घोषणा केली. तीत केंद्राचा वाटा १५ हजार कोटींचा असेल. उर्वरित वाटा राज्यांचा. सर्वाधिक भर अल्पकालीन आपत्कालीन तयारी, पेडियाट्रिक बेड्स, ऑक्सिजन पुरवठ्यावर.

क्रेडिट गॅरंटी योजनेत आरोग्यावर फोकस
कोरोना प्रभावित क्षेत्रासाठी १.१ लाख कोटींची कर्ज हमी योजना दिली आहे. त्यात ५० हजार कोटींचे कर्ज आरोग्य क्षेत्रासाठी असेल. त्याअंतर्गत १०० कोटींपर्यंतचे कर्ज घेतले जाऊ शकते. व्याज ७.९५% पेक्षा जास्त नसेल. तथापि, ही सुविधा ८ मेट्रो शहरांत नसेल. उर्वरित क्षेत्रांसाठी योजनेत ६० हजार कोटी ठेवण्यात आले आहेत. त्यांच्यासाठी व्याजाचे कॅपिंग ८.२५ % आहे.

पर्यटन क्षेत्राला पहिला दिलासा
परवानाधारक टूरिस्ट गाइड १ लाख व ट्रॅव्हल एजन्सी १० लाखांपर्यंतचे कर्ज सरकारी हमीवर घेऊ शकतात. प्रक्रिया शुल्कही नसेल. त्याचबरोबर ३१ मार्च २०२२ पर्यंत पहिल्या ५ लाख विदेशी पर्यटकांना व्हिसा मोफत मिळेल. एका पर्यटकाला एक वेळ लाभ मिळेल. विदेशी पर्यटकांना सूट मिळताच ही योजना लागू होईल.

आर्थिक मदत पॅकेजमध्ये १.४० लाख कोटींच्या फक्त ४ नव्या घोषणा...बाकी बजेट जुन्याच घोषणांचे

 • 4,88,193 कोटींचे बजेट या आर्थिक पॅकेजमध्ये जुन्या योजनांची कालमर्यादा किंवा व्याप्ती वाढवण्यावर खर्च होईल.
 • ट्रॅव्हल एजन्सी व टूरिस्ट गाइडला कर्जाची घोषणा नवी आहे, पण वेगळे बजेट नाही. हे कर्ज हमी योजनेअंतर्गत दिले जाईल.
 • अर्थमंत्र्यांनी सोमवारी सुमारे ६.२९ लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. पण त्यात फक्त चारच नव्या घोषणा आहेत.

नवी योजना एकूण बजेट
कर्ज हमी योजना 1.10 लाख कोटी
सार्व. आरोग्य योजना 23,200 कोटी
क्रेडिट गॅरंटी स्कीम 7500 कोटी
पर्यटकांना मोफत व्हिसा 100 कोटी

सर्वात महत्त्वाच्या दोन घोषणा

 • नोंदणीकृत ट्रॅव्हल संस्थांना १० लाख व गाइडला १ लाखापर्यंत कर्ज, पहिल्या ५ लाख पर्यटकांना माेफत व्हिसा
 • कर्ज हमी योजनेत आरोग्य क्षेत्रासाठी ५० हजार कोटी, आरोग्य पायाभूत सुविधांसाठी वेगळे २३ हजार कोटी

बातम्या आणखी आहेत...