आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सरकारी बँकांना खासगी क्षेत्राकडे सोपवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचारी आजपासून दोन दिवसांच्या देशव्यापी संपावर असणार आहेत. या संपामुळे बँकांचे 10 लाख कर्मचारी 15 आणि 16 मार्च रोजी कामावर येणार नाहीत. त्यामुळे बँकांच्या कामांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. या संपामुळे ठेवी आणि पैसे काढणे, चेक क्लिअरन्स आणि कर्ज स्वीकृती यासारख्या सेवांवर परिणाम होऊ शकतो. मात्र एटीएम सेवा सुरू राहणार आहेत.
बँकांच्या संपाविषयी सांगायचे तर या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जाहीर केले होते की, दोन सरकारी बँका आणि विमा कंपनीचे यावर्षी खासगीकरण करण्यात येईल. सरकारच्या या निर्णयाविरोधात 9 राज्य बँकांच्या संघटना, युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनने सोमवारी आणि मंगळवारी संपाची घोषणा केली आहे.
भारतीय स्टेट बँक (एसबीआय) यांच्यासह अनेक सरकारी बँकांनी आपल्या ग्राहकांना माहिती दिली आहे की, संप झाल्यास त्यांच्या सामान्य कामकाजावर शाखा आणि कार्यालयांमध्ये परिणाम होऊ शकतो. बँकांच्या माहितीनुसार बँक शाखा आणि कार्यालये सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जात आहेत. अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटनेचे (एआयबीईए) सरचिटणीस सी.एच. वेंकटाचलम यांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिरिक्त मुख्य कामगार आयुक्तांसोबत 4, 9 आणि 10 मार्च रोजी आयोजित बैठका अनिर्णीत राहिल्याने संप होईल.
देशातील प्रमुख खासगी बँका खुल्या राहतील
सर्वसामान्यांसाठी या संपामुळे अडचणी येऊ शकतात. कारण या संपापूर्वी 13 आणि 14 मार्च रोजी देखील बँका बंद होत्या. मात्र या संपाच्या काळात एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक आणि इंडसइंड बँक यासह खासगी क्षेत्रातील बँका सुरु आहेत.
UFBU मध्ये सहभागी 9 संघटना
यूएफबीयूच्या सदस्यांमध्ये ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (एआयबीईए), ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कन्फेडरेशन (एआयबीओसी), नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ बँक एम्प्लॉईज (एनसीबीई), ऑल इंडिया बँक ऑफिसर असोसिएशन (एआयबीओए) आणि बँक एम्प्लॉईज कन्फेडरेशन ऑफ इंडिया (बीईसीआय) इत्यादींचा समावेश आहे. इंडियन नॅशनल बँक एम्प्लॉईज फेडरेशन (आयएनबीईएफ), इंडियन नॅशनल बँक ऑफिसर कॉंग्रेस (आयएनबीओसी), नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक वर्कर्स (एनओबीडब्ल्यू) आणि नेशन ऑर्गनायझेशन ऑफ बँक ऑफिसर (एनओबीओ) या संपात सहभागी आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.