आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • Unlock 3.0 The Air Transport, Tourism Sector, Various Sports Activities And Schools Should Be Reopened

अनलॉक 3.0:आर्थिक नुकसान रोखण्यासाठी हवाई वाहतूक क्षेत्र, पर्यटन क्षेत्र, विविध क्रीडा उपक्रम आणि शाळा पुन्हा सुरू करण्यात याव्यात

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चित्रपटगृह, हॉटेल, रेस्तराँ आणि शाळांसाठी तयार केले एसओपी

अनलॉक-१नंतर आता अनलॉक २.० जुलैमध्ये संपणार आहे. अर्थव्यवस्था हळूहळू रुळावर येत आहे. मात्र, अद्यापही हवाई वाहतूक, पर्यटन, चित्रपट आणि शैक्षणिक क्षेत्राला दिलासा मिळाला नाही. उद्योग संघटन फिक्कीने १ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या अॅनलॉक ३.० मध्ये ही क्षेत्रे सुरू करण्यासाठी सरकारकडे शिफारशी केल्या आहेत. यासोबत त्यांनी एक मार्गदर्शक तत्त्वही जारी केले.

उद्योग तज्ञांशी केलेल्या चर्चेनंतर फिक्कीने केलेल्या शिफारशीत म्हटले की, या क्षेत्रांवर लावलेले निर्बंध सुलभ करण्याची ही वेळ आहे. फिक्कीच्या या मार्गदर्शक तत्त्वात सरकार कोराेना नियंत्रणात आणत शाळा सुरू करण्याचा निर्णय घेऊ शकते. फिक्कीने शाळांसाठी शिफारशी केल्या आहेत.

शाळा : स्टेशनरी आणि पुस्तकांची शेअरिंग नको
- शाळा कार्यक्रम व प्रार्थना स्थगित केली पाहिजे. दर २ तासांनी हात धुणे सक्तीचे केले पाहिजे.
- शिक्षकांनी पारदर्शक पीपीई किट वापरावे, यात हावभाव समजतील.
- स्टेशनरी, नोट्स, पुस्तकांची शेअरिंग रोखावी. वॉशरूमची निगराणी व्हावी.
- जे विद्यार्थी शाळेत येऊ इच्छित नाहीत, त्यांच्यासाठी वर्गातील रेकॉडिंग पोर्टलवर अपलोड केले जावे.

हॉस्पिटॅलिटी: ५० चौ.फूट प्रतिव्यक्तीवर उपस्थिती
- ५० टक्के बैठक क्षमतेच्या हॉटेल, रेस्तराँ आणि भोजनालयांच्या उपयोगास परवानगी मिळायला हवी.
- लग्न, कार्यक्रम आदींसाठी हॉटेलच्या क्षमतेत ५० टक्क्यांपर्यंत परवानगी मिळाली पाहिजे.
- बँक्वेट हॉलमध्ये ५० चौ.फूट प्रतिव्यक्तीच्या आधारावर सामूहिक भोजन कार्यक्रमास परवानगी मिळायला हवी.

चित्रपट: दोन आसनांत एक मीटर अंतर
- चित्रपटगृहात आसनांमध्ये एक मीटरचे अंतर असावे. ऑनलाइ बुकिंग आणि कॉन्टॅक्टलेस फूड सेवा असावी.
- चित्रपटगृहांना कोराेनाच्या हिशेबाने प्रत्येक शोआधी स्वच्छता, वॉशरूमध्येही फिजिकल डिस्टन्सिंग पाळले जावे.
- पडद्यावर वारंवार प्रेक्षकांनी काय करायचे आहे आणि काय नाही याबाबत माहिती दिली जावी.

कमी शारीरिक संपर्काचे खेळ पूर्णपणे सुरू करण्याची शिफारस
फिक्कीनुसार, संसर्गाच्या प्रसारात समाविष्ट जोखमीच्या आधारावर खेळाची विविध श्रेणींत विभागणी केली जावी. चित्रपट, रॅकेट गेम(बॅडमिंटन आणि टेनिस), ऑल ट्रॅक अँड फील्ड इव्हेंट्स(रनिंग, शॉट पुट, जेवलिन आदी), क्रिकेट, तिरंदाजी, आदीत शारीरिक संपर्क नसतो. त्यामुळे यामध्ये जोखीम नाही. फुटबॉल, व्हॉलीबॉल, हँडबॉल आणि हॉकीमध्ये मर्यादीत संपर्क. हे कमी जाेखमीचे खेळ आहेत. असे खेळ सुरू केले पाहिजेत.