आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउत्तरप्रदेशात प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्याचे टेंडर अदानी ट्रान्समिशनला मिळाले होते. परंतू उत्तरप्रदेश सरकारने अदानी समूहाला नुकताच जोरदार धक्का दिला आहे. मध्यांचल विद्युत वितरण निगमने 5,454 कोटींची निविदा रद्द केली आहे. या निविदेची 48 ते 65% किंमत जास्त होती.
हिंडेनबर्गच्या अहवालामुळे अदानींचे शेअर्स कोसळले
हिंडेनबर्गच्या अहवालामुळे एकीकडे अदानी समूहाचे शेअर्स सातत्याने घसरत आहे. तर दुसरीकडे आता उत्तर प्रदेश सरकारनेही अदानी समूहाला जोरदार दणका दिला. अदानी ट्रान्समिशनला मिळालेली प्रीपेड स्मार्ट मीटरची निविदा रद्द करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात 2.5 कोटी प्रीपेड स्मार्ट मीटर बसण्याच्या निविदेची किंमत 25 हजार कोटी होती. दरम्यान, ही निवीदा तांत्रिका कारणांमुळे रद्द झाल्याचे सांगितले जात आहे.
मध्यांचल वितरण निगमने निविदा केली रद्द
मध्यांचल विद्युत वितरण निगमने निविदा रद्द केली आहे. फक्त मध्यांचल विद्युत वितरण निगमची 5,454 कोटींची निविदा होती. निविदेची अंदाजे किंमत सुमारे 48 ते 65% जास्त असल्याने सुरूवातीपासूनच विरोध होत होता. मीटरची किंमत सुमारे 9 ते 10 हजार रुपये होती. तर अंदाजे किंमत प्रति मीटर 6 हजार होती.
GMR, इंटेली स्मार्टला मिळणार होते कार्यारंभाचे आदेश
यात मेसर्स अदानी पॉवर ट्रान्समिशन व्यक्तिरिक्त, जीएमआर आणि इंटेली स्मार्ट कंपनीने टेंडरचा दुसरा भाग जिंकला होता. त्या कंपनीला कार्यारंभाचे आदेश दिले जाणार होते. राज्य ग्राहक परिषदेने महागडे मीटर लावण्याचे सांगितले होते. तर परिषदेने नियाम आयोगात याचिकाही दाखल केली होती. तसेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे ही तक्रार केली होती.
आरोपानंतर अधीक्षक अभियंतांनी निविदा रद्द केली
सर्व आरोपांदरम्यान मध्यांचल विद्युत वितरण निगमचे अधीक्षक अभियंता वित्त अशोक कुमार यांनी अदानी समूहाची निविदा रद्द केली. तांत्रिक कारणामुळे निविदा रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले. राज्य वीज ग्राहक परिषदेने निविदा रद्द करण्याचे समर्थन केले. महागड्या निविदांद्वारे ग्राहकांवर अतिरिक्त बोजा पडणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
हे ही वाचा
जगातील श्रीमंताच्या क्रमवारीत होते गौतम अदानी : वाचा कोण श्रीमंत, कोण झाले गरीब
हिंडेनबर्गच्या अहवालामुळे अदानी समूहाच्या शेअर्सला जोरदार धक्का बसला. शेअर्सच्या घसरणीमुळे अदानी समूहाच्या मार्केट कॅपमध्ये मोठी घसरण झाली. त्यामुळे जगातील श्रीमंतांच्या यादीतील क्रमवारीत पहिल्या तीन लोकांत असणारे अदानी थेट 17 व्या स्थानावर फेकले गेले. यानिमित्ताने आता श्रीमंताच्या क्रमवारीत कोण किती श्रीमंत झाले आणि कोण गरीब झाले याची संपूर्ण कहाणी जाणून घेऊया. - येथे वाचा संपूर्ण बातमी
अदानी समूहच नाही, 36 कंपन्यांत LICची गुंतवणूक:6 महिन्यांत एलआयसीच्या मूल्यात 58% घसरण
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी (लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) अर्थात एलआयसीने अदानी समूहासोबत अन्य 36 कंपन्यांमध्ये गुतंवणूक केली आहे. हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाचे शेअर्स सातत्याने घसरत आहे. त्यामुळे एलआयसी कंपनीला देखील फटका बसत आहे. - येथे वाचा संपूर्ण बातमी
मुकेश अंबानी बनले भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती:गौतम अदानींना टाकले मागे, फोर्ब्सचा अहवाल
रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांना श्रीमंताच्या यादीत मागे टाकले आहे. 84.3 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह मुकेश अंबानी जगातील सर्वात श्रीमंत भारतीय बनले आहेत. फोर्ब्सच्या रिअल-टाइम अब्जाधीशांच्या यादीत त्यांचा समावेश झाला आहे. - येथे वाचा संपूर्ण बातमी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.