आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • Up To 25 Per Cent Work Started In Factories In States Like Delhi, Punjab, Haryana, Himachal And Rajasthan

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रिकव्हरीची तयारी:दिल्ली, पंजाब, हरियाणा, हिमाचल, राजस्थानसारख्या राज्यांतील कारखान्यांत २५ टक्क्यांपर्यंत काम सुरू

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • टाळेबंदीसह अन्य कारणांमुळे उद्योगांच्या उत्पादन खर्चात 22% पर्यंत वाढ

कोरोना संकटात केंद्र सरकार देशात ठप्प पडलेले आर्थिक उत्पादन नव्याने सुरू करण्याच्या प्रयत्नात आहे. याचा परिणाम म्हणून दिल्ली, हरियाणा, पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, झारखंड, गुजरात, महाराष्ट्रातील काही भागांत उद्योगांत १०-२५% उत्पादन सुरू झाले आहे. असे असले तरी स्थलांतरित कामगारांनी घरपरती केल्याने उद्योगांना पूर्ण क्षमतेने काम सुरू करणे सध्या शक्य नाही. मात्र, जसजशी कामगारांची उपलब्धता वाढेल, उत्पादनात वेग येईल, अशी आशा उद्योग जगतातील जाणकारांना आहे. पंजाबच्या लुधियानातील २० हजार कोटी रुपयांच्या होजियरी उद्योगात २०% काम सुरू झाले आहे. येथे २० ते २५ युनिटमध्ये आपला व्यवसाय बदलत फेस मास्क आणि पीपीई किट तयार करत आहेत. हरियाणात ११६, ७०० एमएसएमई आहेत. यापैकी ५५,९३५ नी उत्पादन सुरू करण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री मनोरहलाल खट्टर यांनी राज्यात ३४,३७५  उद्योगास परवानगी दिल्याचे सांगितले.

गुजरातच्या ५० हजार उद्योगांत काम सुरू

औद्योगिक सूत्रांनुसार, गुजरातमध्ये लहान-मोठे ४.५ ते ५ लाख उद्योग आहेत. यापैकी आतापर्यंत १०% म्हणजे सुमारे ४५ ते ५० हजार उद्योगांनी काम करणे सुरू केले आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने स्थलांतरित कामगारांना घरपरतीस मंजुरी दिली आहे. यामुळे गुजरातहून ३ ते ४ लाख कामगार घरी पोहोचले आहेत. गुजरातमध्ये जेवढ्या उद्योगांत उत्पादन सुरू झाले, त्यापैकी ८०-८५% मध्ये एका शिफ्टमध्ये काम होत आहे. जोवर वाहतूक सुरू होत नाही, तोवर पूर्ण क्षमता अशक्य आहे.

आतापर्यंत ज्या उद्योग-कंपन्यांमध्ये काम सुरू झाले त्यांचा उत्पादन खर्च २२% पर्यंत वाढला आहे. कामगारांची येण्या-जाण्याची व्यवस्था,  परिसर नियमित निर्जंतुकीकरण करणे आणि प्लँट पूर्ण क्षमतेने न चालवणे यामुळे उद्योगांच्या उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. - अजित शहा, सचिव, फेडरेशन ऑफ इंडियन असोसिएशन, अहमदाबाद

राजस्थान १०% प्लँटमध्ये काम सुरू

राजस्थानमध्ये सुमारे २.५ लाख लहान-मोठ्या उद्योगांत आतापर्यंत १०,००० युनिटमध्ये उत्पादन सुरू झाले आहे. असे असले तरी दिवसेंदिवस उत्पादन सुरू करणाऱ्या युनिटची संख्या वाढत आहे. मात्र, राज्यातील ५ टक्के उद्योग सुरू झाले आहेत. राज्यात शेतकरी कल्याण शुल्काच्या रूपात कमोडिटी व्यवसायावर २% कर लावल्याने आटा, डाळ व तेल उद्योगांनी सहा महिन्यांपासून काम बंद केले होते. वाहतूक खर्च आणि कोरोना संसर्ग रोखण्याच्या उपायात उद्योगांचा खर्च २-३% वाढला आहे.

राजस्थानच्या २१० हून अधिक मोठ्या उद्योगांत काम सुरू झाले आहे. यामध्ये अदानी विल्मर, कांडा ऑइल मिल, रुची सोया आदी आहेत. मात्र, यात एक शिफ्ट होत आहे. निंबाहेडा वगळता सर्व सिमेंट प्लँटमध्ये काम होत आहे. - डॉ. सुबोध अग्रवाल, अतिरिक्त मुख्य सचिव(उद्योग), राजस्थान

हिमाचल, झारखंड ३३% क्षमतेने प्लँट सुरू करण्याची तयारी

हिमाचल प्रदेशातील  बत्ती-नालागडमध्ये ३०,००० कोटींच्या औषधी कंपन्यांतही ५०% पेक्षा जास्त उत्पादन सुरू झाले आहे. गेल्या काही आठवड्यात बत्ती क्षेत्रातून शेकडो ट्रक औषधी देशाच्या विविध भागांत पाठवली आहे. येथे उत्पादन वाढण्यासोबत पुरवठ्याचा वेगही वाढला आहे. याच पद्धतीने झारखंडमध्ये जमशेदपूर येथील टाटा स्टील आणि टाटा मोटर्सच्या प्लँटमध्ये अनुक्रम ९०,००० आणि २७,००० लोक कार्यरत आहेत. बोकरो येथील सेलच्या स्टील प्लँटमध्ये २१,००० कामगार आहेत. यापैकी ३३% म्हणजे ७ हजारांना बोलावले  आहे.

एमएसएसई क्षेत्र १.२० कोटींना देते रोजगार

- सीआयआयनुसार, देशभरात ६.३४ कोटी सूक्ष्म, लघू आणि मध्यम आकाराचे उद्योग(एमएसएमई) काम करत आहेत.

- हे मॅन्युफॅक्चरिंग जीडीपीत ६.११% सेवा उत्पादनांत जीडीपीत २४.६३% आणि देशाच्या मॅन्युफॅक्चरिंग आऊटपुटमध्ये ३३.४% योगदान देते.

- हे क्षेत्र १.२० कोटी लोकांना रोजगार देते. निर्यातीत ४५% योगदान देते.

- हे क्षेत्र वार्षिक १०% वेगाने वाढत आहे.

बातम्या आणखी आहेत...