आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टाटाची Nexon EV Max लाँच:एकदा चार्ज केल्यावर 437 किमी पर्यंत धावणार, अनेक नवे फीचर्सही

मुंबई5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • Tata's Nexon EV Max launch: will run up to 437 km on a single charge, with many new features

टाटा मोटर्सने आज Nexon EV Max इलेक्ट्रिक कार लाँच केली. ही कार एकदा चार्ज केल्यावर 437 किमीपर्यंती धावण्यास सक्षम आहे. हीची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 17.74 लाख रुपये निश्चित करण्यता आली आहे.

56 मिनिटांत 80% चार्ज

नेक्सॉन ईव्ही मॅक्समध्येही जलद चार्जिंगची सुविधा उपलब्ध असेल. 7.2kW AC फास्ट चार्जरसह, ती नियमित वेळेत 6.5 तासांमध्ये पूर्णपणे चार्ज केली जाऊ शकते. व्यावसायिकरित्या वापरल्या जाणार्‍या 50kW DC चार्जरसह, ती केवळ 56 मिनिटांत 80% पर्यंत चार्ज होईल.

मोठा बॅटरी पॅक, अधिक स्पीड-पॉवर

Nexon EV Max मध्ये शक्तिशाली 40.5kWh लिथियम-आयन बॅटरी पॅक मिळते. सध्याच्या Tata Nexon EV पेक्षा ही 33% जास्त बॅटरी क्षमता आहे.

टॉप स्पीड 140 किमी प्रतितास

हे वाहन जास्तीत जास्त 143 पीएस पॉवर जनरेट करते. याशिवाय, यात तुम्हाला 250 Nm इन्स्टंट टॉर्क मिळतो. ही कार अवघ्या 9 सेकंदात 0-100 किमीचा वेग पकडते. त्याच वेळी, या ईव्हीची टॉप-स्पीड देखील 140 किमी प्रतितास असेल.

काय असेल कारची किंमत?

कंपनीने ही कार XZ+ आणि XZ+ Lux या दोन प्रकारात सादर केली आहे. त्याच वेळी, यामध्ये दोन चार्जिंग पर्याय उपलब्ध असतील. या ईव्हीची एक्स-शोरूम किंमत 17.74 लाख रुपयांपासून सुरू होईल आणि 19.24 लाख रुपयांपर्यंत जाईल.

अनेक खास फीचर्स मिळतील

वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, यात 30 नवीन वैशिष्ट्ये आहेत, ज्यात लेदररेट व्हेंटिलेटेड सीट, ज्वेलरी कंट्रोल नॉब, वायरलेस चार्जिंग, ऑटो डिमिंग IRVM, स्मार्ट वॉच इंटीग्रेशन आणि एअर प्युरिफायर यांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...