आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Those Traveling In AC Coaches Should Check Out The New List; Will You Get A Sheet blanket On The Trip?

कामाची बातमी:एसी कोचमधून प्रवास करणाऱ्यांनी नवी यादी पाहावी; प्रवासात चादर-ब्लँकेट मिळणार का?

नवी दिल्ली12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रेल्वेने प्रवास करणाऱ्यांनी कृपया लक्ष्य द्या...

उन्हाळ्यात लोकांना सुट्टीवर जाण्यास आवडते. कोविडनंतर एसी कोचमधून प्रवास करणाऱ्यांनाही अनेक प्रकारचे टेन्शन आले आहे. उदाहरणार्थ, बेडरोलची सुविधा उपलब्ध होईल की नाही? शेवटच्या क्षणी प्रवास रद्द झाल्यास तिकीट दुसऱ्याच्या नावावर करता येईल का? असा गोंधळ दूर करण्यासाठी संपूर्ण बातमी वाचा.

चला बेडरोलपासून सुरुवात करूयात

कोविड-19 दरम्यान एसी कोचमध्ये बंद करण्यात आलेल्या बेड रोलची सुविधा अजूनही सर्व गाड्यांमध्ये पूर्ववत करण्यात आलेली नाही. त्यामुळे ट्रेनमध्ये बेडरोल उपलब्ध होतील की नाही, असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. अशा लोकांना सांगा की, अनेक गाड्यांमध्ये ही सुविधा पुन्हा उपलब्ध झाली आहे.

1296 एसी कोचमध्ये ब्लँकेट-शीट उपलब्ध असेल

अशा गाड्यांची यादी बरीच मोठी आहे. त्यामुळे ज्या गाड्यांमध्ये चादर-ब्लँकेट (तागाची) सुविधा सुरू करण्यात आली आहे त्यांच्या लिंक खाली दिल्या आहेत. लिंकवर क्लिक करून तुम्ही ज्या ट्रेनमध्ये आरक्षण आहे, त्या ट्रेनमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे की नाही हे तुम्ही तपासू शकता.

इथे क्लिक करा

https://contents.irctc.co.in/en/LINEN.html

प्रश्न: बेडरोलसाठी प्रवाशांकडून ट्रेनमध्ये जादा पैसे आकारले जातील का?

उत्तरः भोपाळ रेल्वे विभागाचे जनसंपर्क अधिकारी सुभेदार सिंह म्हणतात, 'भोपाळच्या जवळपास सर्वच गाड्यांमध्ये पुन्हा बेडरोल सुविधा सुरू केली जात आहे. यासाठी प्रवाशांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क घेतले जाणार नाही.

त्याच वेळी, रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी असेही म्हणतात की प्रवाशांना उर्वरित गाड्यांमध्ये अतिरिक्त पैसे देण्याची गरज नाही, कारण एसी बर्थच्या आरक्षण तिकिटात बेडरेल शुल्क आधीच जोडले गेले आहे.

आता आरक्षणाबद्दल बोलूया

बहुतेक लोक स्टेशन काउंटरवर तिकीट बुक करण्याऐवजी ऑनलाइन आरक्षण करणे पसंत करतात. अशा लोकांना सांगा की, रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुक करण्याच्या नियमात बदल केला आहे. त्यामुळे तिकीट आरक्षणापूर्वी नवीन नियम जाणून घ्या.

काय आहे रेल्वेचा नवा नियम?

नवीन नियमानुसार आता एका यूजर आयडीवरुन जास्त तिकीट बुक करता येतील. जर तुमचा रेल्वे आयडी आधार कार्डशी लिंक असेल तर तुम्हाला अधिक फायदा होईल.

तपशीलवार समजून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती वाचा आणि इतरांना देखील शेअर करा...

तुम्हाला तिकीट मिळाले. बुकिंग कन्फर्म झाले, पण शेवटच्या क्षणी काही मिटिंग किंवा कामामुळे तुमचा जाण्याचा प्लान रद्द झाला, मग तिकिटाचे पैसे गेले? नाही, नवीन नियमानुसार तुम्ही तुमचे तिकीट जवळच्या नातेवाईकाला देऊ शकता.

माझे तिकीट कुटुंबातील सदस्यांना हस्तांतरित करण्याचे नियम काय आहेत?

  • हे आई, वडील, भाऊ, बहीण, मुलगा, मुलगी, पती आणि पत्नी यांच्या नावावर हस्तांतरित केले जाऊ शकते.
  • ट्रेन सुटण्याच्या 24 तास आधी प्रवाशाला विनंती करावी लागते.
  • त्यानंतर तिकिटातून प्रवाशाचे नाव कट केले जाते आणि ज्या सदस्याच्या नावावर तिकीट हस्तांतरित केले जात आहे, त्याचे नाव टाकले जाते.

तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली तर तुम्ही ती इतरांसोबत शेअर करायलाच हवी...

तुम्ही झोपत असाल तर TTE तिकीट तपासण्यासाठी तुम्हाला उठवू शकत नाही

असे अनेकदा घडते की, तुम्ही ट्रेनमध्ये झोपल्यानंतर, टीटीई तिकीट तपासण्यासाठी येतात आणि तुम्हाला उठवतात आणि तिकीट तपासतात, परंतु आता ते हे करू शकत नाहीत. नवीन नियमानुसार, जर तुम्ही सकाळपासून ट्रेनच्या प्रवासात असाल तर रात्री 10 नंतर TTE तुम्हाला झोपेतून उठवू शकत नाही आणि आयडी आणि तिकीट तपासू शकत नाही.

तिकीट तपासण्याचा नियम

  • टीटीई सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत तिकीट तपासू शकतात.
  • सकाळपासून प्रवास करणाऱ्यांना टीटीई रात्री त्रास देऊ शकत नाही.
  • तथापि, जे प्रवाशी रात्री 10 नंतर ट्रेनमध्ये चढतात, टीटीई त्यांचे तिकीट आणि आयडी तपासू शकतात.

आता जाणून घ्या काय आहे टूस्टॉप नियम

जर एखादा प्रवासी ट्रेनमध्ये प्रवास करत असेल आणि त्याच्या सीटवर पोहोचला नसेल, तर ट्रेनच्या पुढील दोन स्टॉपपर्यंत TTE तुमची सीट दुसऱ्या प्रवाशाला देऊ शकत नाही. म्हणजेच, जेव्हा प्रवासी त्याच्या बोर्डिंग स्टेशनच्या पुढील दोन स्थानकांपर्यंत त्याच्या सीटवर पोहोचत नाही, तेव्हा टीटीई असे गृहीत धरेल की, आरक्षित सीट असलेल्या प्रवाशाने ट्रेन पकडली नाही. त्यामुळे तिसऱ्या स्थानकानंतर ती सीट इतरांना देता येईल.

हे ही महत्त्वाचे

आम्ही ट्रेनमध्ये आमची सीट का निवडू शकत नाही?

ट्रेनमध्ये आरक्षणाची वेगळी पद्धत आहे. ट्रेनमध्ये सुरक्षितता ही मोठी जबाबदारी असते. या कारणास्तव, रेल्वेने आपले बुकिंग सॉफ्टवेअर अशा प्रकारे तयार केले आहे की प्रत्येक बोगीमध्ये सामानाचा भार वितरीत केला जाऊ शकतो.

असा विचार करा-

ट्रेनमध्ये S1 ते S10 क्रमांकाचे स्लीपर कोच असतात आणि प्रत्येक डब्यात 72-72 जागा असतात. जेव्हा कोणीतरी त्या ट्रेनमध्ये प्रथमच तिकीट बुक करेल तेव्हा हे सॉफ्टवेअर मधल्या डब्यात जागा देईल - कोच S5 प्रमाणे, सीट क्रमांक 30-40 मिळेल. सॉफ्टवेअर प्रथम सीट खाली बुक करते जेणेकरून गुरुत्वाकर्षण केंद्र कमी असेल.

ट्रेनमधील सीट्स, मधल्या सीट्सपासून (36) सुरू होऊन गेटजवळच्या सीट्सपासून म्हणजे 1-2 किंवा 71-72 खालच्या सीट्सपासून वरच्या सीट्सपर्यंत भरल्या जातात. तिकीट शेवटचे बुक केल्यावर वरची सीट दिली जाते.

बातम्या आणखी आहेत...