आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • UPI Payment By Credit Card Latest News, Know How To Link Credit Card With UPI,  Punjab National, Union Bank Of India And Indian Bank Launched The Facility,

आता क्रेडिट कार्डनेही करता येणार UPI पेमेंट:​तीन बॅंकानी ही सुविधा सुरू केली; जाणून घ्या- UPI शी क्रेडिट कार्ड कसे लिंक करायचे

नवी दिल्ली7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आता तुमचे क्रेडिट कार्ड देखील युपीआयशी लिंक केले जाऊ शकते. त्यामुळे व्यवहार अधिक सुलभ होणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी ग्लोबल फिनटेक फेस्टिव्हलमध्ये UPI नेटवर्कवर रुपे क्रेडिट कार्ड लाँच केले.

आत्तापर्यंत फक्त डेबिट कार्ड आणि खाती UPI नेटवर्कशी जोडली जात होती. आता पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया आणि इंडियन बँक या तीन बॅंकांनी त्यांचे क्रेडिट कार्ड ही युपीआयशी लिंक करण्याची सुविधा सुरू केली आहे.

इंटरचेंज शुल्क भरावे लागणार
पंजाब नॅशनल बँकेचे एमडी आणि सीईओ अतुल कुमार गोयल यांनी म्हटले आहे की, UPI शी क्रेडिट कार्ड लिंक करून UPI ​​पेमेंट करण्यासाठी कोणतेही MDR आकारले जाणार नाही. तथापि, आता इंटरचेंज शुल्क आकारले जाणार आहे. ही शुल्क किती असेल याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.

UPI लाइट केले लॉंच

आरबीआयने UPI Lite सेवा देखील सुरू केली आहे. हे कमी मुल्याच्या व्यवहारांसाठी असेल जे ऑन-डिव्हाइस वॉलेटच्या मदतीने कार्य करणार आहे. UPI Lite च्या मदतीने ग्राहक इंटरनेटशिवाय पेमेंट करू शकतील. UPI Lite सह 200 रुपयांपर्यंत इंटरनेटशिवाय ट्रान्सफर केले जाऊ शकते. याशिवाय भारत बिल पेमेंट सिस्टम अंतर्गत क्रॉस बॉर्डर व्यवहाराची सुविधाही सुरू करण्यात आली आहे.

गुगल पे द्वारे क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे पेमेंट करण्याची प्रक्रिया
तुम्हाला प्रथम UPI अ‌ॅपमध्ये कार्ड लिंक करावे लागेल. Google Pay वेबसाइटनुसार, वापरकर्ते अ‌ॅपवरून बँकांचे डेबिट आणि क्रेडिट कार्ड जोडू शकतात, जर ते व्हिसा आणि मास्टरकार्ड पेमेंट गेटवेवर ऑपरेट करतात.
ऑगस्टमध्ये UPI द्वारे 10.63 लाख कोटींचा व्यवहार झाला

NPCI द्वारे UPI पेमेंटच्या आकडेवारीनुसार, ऑगस्टमध्ये देशात UPI द्वारे एकूण 10.72 लाख रुपयांचे व्यवहार झाले आहेत. जुलै महिन्याच्या तुलनेत हा आकडा जास्त आहे. जुलैमध्ये यूपीआयच्या माध्यमातून एकूण 10.63 लाख कोटींचे व्यवहार झाले. ऑगस्टमध्ये 2022 मध्ये, एकूण 657 कोटी, म्हणजे 6.57 अब्ज वेळा, UPI द्वारे पैशांचा व्यवहार झाला. त्याचवेळी जुलैमध्ये 628 कोटी म्हणजेच 6.28 अब्ज पट UPI पेमेंट करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...