आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • UPI Transactions Doubled In 4 Years; Banks, NBFCs, Fintech Companies Get No Revenue | Marathi News

कॅशलेस अर्थव्यवस्था:यूपीआय व्यवहार 4 वर्षांत दुप्पट; पण बँकांच्या शुल्क उत्पन्नात 1/3 ने घट, फिनटेक कंपन्यांनाही उत्पन्न मिळेना

दिल्‍ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

यूपीआयमुळे देशात कॅशलेस अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आणि डिजिटल व्यवहार अत्यंत सुलभ झाले. त्यामुळे गेल्या चार वर्षांत मूल्य स्वरूपात रिटेल डिजिटल पेमेंटमध्ये यूपीआयचा वाटा दुप्पट झाला आहे. परंतु बँक, एनबीएफसी आणि फिनटेक कंपन्यांचे उत्पन्न जवळपास एक तृतीयांशने घटले आहे. यूपीआय व्यवहारातून काेणतेही उत्पन्न मिळत नाही.

वास्तविक माेफत आणि सहज सेवेमुळे युनिफाइड पेमेंट इंटरफेसचा (यूपीआई) उपयाेग दरवर्षी वेगाने वाढत आहे. २०२१-२२ आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊमाहीत व्यक्ती ते व्यापारी व्यवहारात यूपीआयचा वाटा ४२% झाला.ताे २०२०-२१ आर्थिक वर्षात २८ टक्के हाेता. परिस्थिती अशी आहे की, फेब्रुवारीमध्ये मूल्यानुसार एकूण किरकोळ डिजिटल पेमेंटपैकी सुमारे ८०% यूपीआय प्लॅटफॉर्मद्वारे झाले. यामध्ये आयएमपीएस, एनईएफटी सारख्या पद्धतींद्वारे नेट-बँकिंगद्वारे व्यवहारांचा समावेश नाही. विश्लेषकांच्या मते यूपीआय व्यवहार वाढल्यामुळे बँकांचे शुल्क उत्पन्न कमी झाले आहे. उदाहरणार्थ, चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत, रिटेल कार्ड फीच्या माध्यमातून अॅक्सिस बँकेचे एकूण शुल्क उत्पन्न चार वर्षांपूर्वीच्या २.५ % वरून १.९ % पर्यंत घसरले.

“पेमेंट प्रोसेसिंग व्यवसायातील वाढत्या स्पर्धेच्या दरम्यान यूपीआयद्वारे व्यवहारांमध्ये वाढ झाल्यामुळे संपूर्ण इकाेसिस्टिममधील पेमेंट शुल्काचे उत्पन्न कमी होत असल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजचने म्हटले आहे

यूपीआय व्यवहारांत ४ वर्षांत ८१ % वाढ व्यवहार पद्धत 2018-19 2019-20 2020-21 2021-22 यूपीआय 38% 56% 73% 81% डेबिट कार्ड 26% 19% 12% 07% क्रेडिट कार्ड 26% 19% 11% 09% प्री-पेड साधने 09% 06% 04% 03% (२०२१-२२ ची आकडेवारी फेब्रुवारीपर्यंत, स्रोत: मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस)

डिजिटल व्यवहारांना चालना, २०१९ पासून यूपीआय ​​व्यवहार मोफत
देशातील डिजिटल पेमेंट प्रणालीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने २०१९ मध्ये यूपीआय व्यवहारांसाठी व्यापारी सवलत दर (यूडीआर) शून्यावर आणला होता. यापूर्वी, प्रत्येक डिजिटल व्यवहारासाठी, व्यापाऱ्यांना पेमेंट सेवा प्रदात्याला एमडीआर भरावा लागत होता.

एमडीआर पेमेंट पूलमध्ये बँकांचा वाटा मोठा, तोटाही जास्त
एमडीआर पेमेंट पूलमध्ये बँकांचा सर्वाधिक वाटा असतो. कारण बहुतेक कार्ड बँकांकडून जारी केले जातात. बँका व्यापाऱ्यांकडून कार्ड आधारित पेमेंट आणि इतर डिजिटल व्यवहारांसाठी शुल्क आकारू शकतात, परंतु यूपीआय पेमेंटसाठी शुल्क आकारू शकत नाहीत.

बातम्या आणखी आहेत...