आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • UPI Transactions Worth Rs 12.11 Lakh Crore In October, Record Number Of Transactions Last Month 730 Crore

डिजिटल क्रांती:ऑक्टोबरमध्ये झाले 12.11 लाख कोटी रुपयांचे यूपीआय व्यवहार, गेल्या महिन्यात व्यवहारांची संख्या विक्रमी 730 कोटी

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील आघाडीच्या डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म युनिफाइड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) द्वारे होणारे व्यवहार सातत्याने वाढत आहेत. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार, गेल्या महिन्यात यूपीआयद्वारे ७३० कोटी व्यवहार झाले. रुपयांमध्ये त्यांचा आकडा १२.११ लाख कोटी रुपये आहे. चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत युपीआयच्या माध्यमातून सुमारे ७५ लाख कोटी रुपयांचे ४४३२ कोटी व्यवहार झाले आहेत. २१-२२ या आर्थिक वर्षात युपीआयमधून ८४ लाख कोटी रुपयांचे ४६०० कोटी व्यवहार झाले.

१०० कोटी आकडा गाठण्यासाठी लागली ३ वर्षे युपीआय प्लॅटफॉर्म २०१६ मध्ये लाँच झाले होते. ऑक्टोबर २०१९ मध्ये, म्हणजे ३ वर्षांनंतर, दरमहा १०० कोटी व्यवहारांचा आकडा गाठला. पण २०० कोटींचा आकडा गाठायला पुढचे १० महिने लागले, पण महिनाभरानंतरच ३०० कोटींचा आकडा गाठला. या वर्षी जुलैमध्ये युपीआय व्यवहारांनी ६०० कोटींचा आकडा पार केला.

व्यवहारात डिजिटल भागीदारी 40% क्रेडिट सुईसनुसार, फेब्रुवारी २०२० मध्ये, ७२% लोक रोख व्यवहार करत होते तर २८% लोक डिजिटल व्यवहार करत होते. या वर्षी जूनमध्ये हे प्रमाण ६०:४० झाले, देशातील ४०% व्यवहार डिजिटल होत आहेत.

बातम्या आणखी आहेत...