आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंदीची भीती:अमेरिकेत फेड दरवाढीने मंदीचीही वाढली भीती, सेन्सेक्स 1,046 आणि निफ्टी 332 अंकांनी कोसळला

मुंबई12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकी फेडरल रिझर्व्हने महागाई रोखण्यासाठी व्याजदर ०.७५% वाढवल्यानंतर मंदीच्या भीतीने जगभरातील शेअर बाजार कोसळले. भारतीय बाजारात पाचव्या दिवशीही घसरण राहिली. सेन्सेक्स १०४५.६० अंक घसरून ५१,४९५.७९ आणि निफ्टी ३३१.५५ अंक कोसळून १५,३६०.६० वर बंद झाला. याआधी सेन्सेक्स गेल्या वर्षी २ जूनला ५१,८४९.४८ वर बंद झाला होता. निफ्टी २८ मे २०२१ रोजी १५,४३५.६५ वर बंद झाला होता. अमेरिकेत या वर्षी मेमध्ये महागाई दर ८.६% नोंदला होता.

जगभरातील बाजारांची स्थिती
अमेरिकी बाजारात झाली होती वाढ

डाऊ जोन्स +1.00%
नॅसडॅक +2.50%
एसअँडपी +1.46%
आशियाई बाजार
शांघाय कम्पोझिट (चीन) -0.61%
निक्केई (जपान) +0.40%
हेंगसेंग (हाँगकाँग) -2.17%
युरोपीय बाजार
एफटीएसई (लंडन) -2.38%
डॅक्स (जर्मनी) -2.81%
कॅक (फ्रान्स) -2.25%

बातम्या आणखी आहेत...