आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोरोना विषाणू संसर्गामुळे फेब्रुवारीपासून जगभरातील शेअर बाजारांत मोठी घसरण राहिली. लॉकडाऊनमधील शिथिलतेनंतर बाजारांनी पुन्हा वेग पकडला आहे. मार्चच्या नीचांकी स्तरावरून भारतासह जगभरातील शेअर बाजार ३० टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहेत. शेअर बाजारांचा प्रकोप अद्यापही कायम आहे. तज्ज्ञांच्या मते, जागतिक शेअर बाजारांमध्ये सध्या भले चांगली तेजी असली तरी आगामी काळात गुंतवणूकदारांना झटका देऊ शकतात. अमेरिकी इक्विटी बाजारात बुडबुड्याचे वातावरण आहे. भारतीय इक्विटी बाजार सध्या जागतिक स्तरावर महागड्या बाजारांत आहेत. अशा स्थितीत आगामी काळात गुंतवणूकदारांना सतर्क राहण्याची गरज आहे.
एसएमसी ग्लोबलचे एमडी डी.के. अग्रवाल म्हणाले, सध्या जो अमेरिकी बाजार वाढत आहे, तो एका आशेवर वाढत आहे. आशा आहे की, लस येईल आणि कोरोना नष्ट होईल. यानंतर सर्व योग्य होईल. लोकांना असे वाटते की, ५-६ महिन्यांत लस येईल. या सर्वांत एक महिना गेल्यास स्थिती स्फोटक बनू शकते. बाजाराची तेजी एका आशेवर कायम आहे. यामध्ये मूलभूत काही नाही. अग्रवाल म्हणाले, सर्वात प्रमुख कारण हे की, अर्थव्यवस्थेत आलेला पैसा थेट बाजारात गेला. बाजारात सध्या असे काही फंडामेंटल नाही, ज्यामुळे पैसा टाकला जावा. कोणत्याही बाजारात पैसा जास्त येतो तेव्हा तो बुडबुडाच असतो. ज्याप्रमाणे २००८ मध्ये आम्ही पाहिले की, भरपूर पैसा आला आणि त्याला कोणताही आधार नव्हता. संपूर्ण जगाची वित्तीय प्रणाली ठप्प झाली. या वेळीही ही स्थिती आहे.
के.आर. चौकसीचे एमडी देवेन चौकसी म्हणाले, ही योग्य बाब आहे की, अमेरिकी बाजार सध्या बुडबुड्यात आहे. हे पुढेही राहील. मात्र, बुडबुडा कधी फूटेल, याबाबत काही सांगता येत नाही. ते म्हणाले, तिथे निवडणूक आहे, त्यामुळे डिसेंबरपर्यंत बाजारांत सर्वकाही ठिक-ठाक राहील.
अमेरिकी निवडणुकीपर्यंत योग्य स्थितीची आशा
आनंद राठी सेक्युरिटीजचे नरेंद्र सोळंकी म्हणाले, अनेक बाजारांत लिक्विडिटी खूप आहे. अमेरिकी बाजारांतही ही स्थिती आहे. मात्र, तिथे निवडणूक आहे, त्यामुळे घसरणीची शक्यता कमी आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी असे पाहू नये की, बाजार तेजीत आहे की घसरणीत आहे. सध्या त्यांना शेअर्समध्ये लाभ झाला तर विकले पाहिजेत. त्यांनी कमी भावात काहींची खरेदी करावी.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.