आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहापारेषण कंपनीत महिला जिद्दीने व सचोटीने काम करत आहेत हे कौतुकास्पद आहे. सक्षमीकरणासाठी महिलांनी आपल्या हक्क आणि अधिकाराचा वापर केला पाहिजे, असे आवाहन महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांनी केले. जागतिक महिला दिनानिमित्त महापारेषणच्या वतीने प्रकाशगड येथे नृत्याध्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी महापारेषणचे संचालक (प्रकल्प) नसीर कादरी, संचालक, सुगत गमरे, कार्यकारी संचालक, रोहिदास मस्के, मुख्य महाव्यवस्थापक, सुधीर वानखेडे, मुख्य अभियंता सुनील शेरेकर, जुईली वाघ, भूषण बल्लाळ, महाव्यवस्थापक (मा. सं. मनुष्यबळ नियोजन) राजू गायकवाड, मंगेश शिंदे, नितीन कांबळे, अभय रोही, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी भरत पाटील, मुख्य विधी सल्लागार डॉ. कीर्ती कुळकर्णी उपस्थित होते. दिनेश वाघमारे म्हणाले, महापारेषणमध्ये महिलांचे प्रमाण सुमारे ४० टक्के आहे ही अभिनंदनाची बाब आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोड बिलाच्या माध्यमांतून महिलांना त्यांचे हक्क मिळवून दिले. नोकरीत महिलांना प्रसूती रजा व विधवांना त्यांचे अधिकार मिळवून दिले. अदिती व प्रसाद आजरेकर आणि सहकारी यांचा कथ्थक नृत्य केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.