आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Business
 • Vegetable Fruit During Coronavirus Treatment | Diet Chart Updates; Breakfast Lunch Dinner For Covid 19 Patients; News And Live Updates

चांगले आरोग्य पडत आहे महाग:कोरोनाकाळात लिंबू, संत्री, सफरचंदासह निवडक फळे-भाज्यांच्या किंमतीत 2 ते 4 पटीने वाढ

मुंबई2 महिन्यांपूर्वीलेखक: दिग्विजय सिंह
 • कॉपी लिंक
 • राजधानी दिल्लीत 50 रुपये नारळाची किंमती 120 आहे

देशात कोरोना महामारीचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. दरम्यान, लोक स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी व्यायाम, संतुलित आहारासह फळे आणि भाज्यांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. यामुळे लिंबू, संत्री, सफरचंद चिकू, किवीसह निवडक फळे-भाज्यांचे भाव गगनाला भिडले असून यांच्या किंमतीत 2 ते 4 पटीने वाढ झाली आहे. त्यामुळे एकीकडे कोरोनाची भीती आणि दुसरीकडे फळे-भाज्यांचे वाढते भाव यामुळे सर्वसामान्य माणसांच्या खिशाला कात्री बसत आहे.

कोरोनाकाळात लोक स्वत:ला निरोगी ठेवण्याकरीता फळे आणि भाज्यांचे मोठ्या प्रमाणावर वापर करत आहे. कारण प्रतिकारशक्ती टिकवण्यासाठी लोक कितीही महाग फळे आणि भाज्यां विकत घेत आहे. चला तर जाणून घेऊया कोरोनाकाळात निवडक फळे आणि भाज्यांचे भाव कधी व का वाढले?

राजधानी दिल्लीत 50 रुपये नारळाची किंमती 120 आहे
राष्ट्रीय राजधानी दिल्ली आणि एनआरसीमध्ये राहत असलेले नागरीक आणि दुकानदारांच्या संवादामधून हे समोर आले की, कोरोनाकाळात रसाळ फळे आणि भाज्यांच्या मागणीत मोठी वाढ झाली. त्यामुळे भावांतदेखील वाढ झाल्याचे दिसून आले . कारण राजधानी दिल्लीत 50 रुपये नारळाची किंमती 120 रुपये झाली आहे.

 • उन्हाळ्यात नारळाच्या पाण्याच्या मागणीत वाढ झाली असून कोरोनामुळे त्याचे भाव जवळजवळ दुप्पट झाले आहे. दिल्ली एनसीआरमध्ये एका नारळाची किंमत 90-120 रुपये आहे.
 • शरीरात व्हिटॅमिन सीची मात्रा टिकवण्यासाठी लोक लिंबूंचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. त्यामुळे 60-80 रुपये किलोचा लिंबू 200 रुपये किलोपर्यंत विकला जात आहे. म्हणजेच एक लिंबू 10-15 रुपयात मिळत आहे.
 • 15-20 रुपयात मिळणार्‍या किवी फळाची किंमत प्रति नग 60 रुपयांवर गेली आहे.
 • चिकू प्रति किलो 40-50 रुपये असायचा आता त्यांची किंमत 250 रुपये किलोपर्यंत पोहोचली आहे.
 • सफरचंदांची किंमतही 100 रुपयांवरून 200 रुपयांवर गेली आहे.
 • केळीची किंमतही 40 प्रति डझनवरुन 70 रुपयांपर्यंत पोचली आहे.

दुप्पट मागणीमुळे रसाळ फळाच्या किंमती महागल्या
दिल्लीच्या आझादपूर मंडीचे अध्यक्ष आदिल अहमद खान यांचे म्हणणे आहे की, कोरोनामुळे लावलेल्या लॉकडाऊनचा बाजारावर फारसा परिणाम झाला नाही. फळे आणि भाज्यांची आवक आणि बाह्य हालचाल सामान्य आहे. कारण घाऊक बाजारात (होलसेल मार्केट) फळे आणि भाज्यांच्या किंमती समान असतात.

मौसंबी आणि लिंबासारख्या रसदार फळांव्यतिरिक्त नारळाच्या किंमतीत वाढ झाली आहे. कारण कोविडमुळे लोकांची मागणी वाढली होती. त्यामुळे या फळांच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...