आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Vehicle Scrappage Policy Benefits; PM Narendra Modi Launch Old Car New Vehicle Policy At Gujarat Investor Summit Today; News And Live Updates

स्क्रॅपेज पॉलिसी लॉन्च:फिटनेस टेस्टमध्ये फेल झाल्यास भंगारात जाणार कार; कशी फिट ठेवता येईल तुमची कार? तज्ज्ञांकडून जाणून घ्या

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गाडी स्क्रॅप केल्यावर मिळतील अनेक फायदे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज गुजरातमध्ये होत असलेल्या गुंतवणूकदारांच्या शिखर परिषदेत हजेरी लावली. दरम्यान, त्यांनी या परिषदेत राष्ट्रीय ऑटोमोबाईल स्क्रॅपेज पॉलिसी (NASP) सुरु केली आहे. या पॉलिसीची घोषणा केंद्र सरकारने या वर्षीच्या बजेटमध्ये केली होती. मोदी पुढे म्हणाले की, आता कोणत्याही गाडीचे स्क्रॅपिंग हे वयाच्या आधारावर होणार नाही. गाडी फिटनेस चाचणीत पात्र झाली नाही तर या गाडीला स्क्रॅप करता येईल. भलेही त्यांचे वय 15 वर्षांपेक्षा कमी असेल. गुंतवणूकदार यामध्ये 10 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करत असल्याचे मोदींनी यावेळी सांगितले.

गाडी स्क्रॅप केल्यावर मिळतील अनेक फायदे
मोदी म्हणाले की, जर तुम्ही जूनी कार स्क्रॅप करत असाल तर तुम्हाला याचे प्रमाणपत्र दिले जाईल. हे प्रमाणपत्र नवीन वाहन खरेदी करताना दाखवल्यास रेजिस्ट्रेशनचे पैसे द्यावे लागणार नाहीत. रोड टॅक्समध्ये सुद्धा सवलत मिळेल. त्यासोबतच अपघात आणि जून्या वाहनांमधील प्रदूषण कमी होणार आहे.

स्क्रॅपेज पॉलिसी काय आहे?
या धोरणानुसार, व्यावसायिक वाहनांना 15 वर्षांनंतर आणि खाजगी वाहनांना 20 वर्षांनंतर रद्द केले जाईल. परंतु, नवीन नियमानुसार जर तुमचे वाहन अनफिट असेल तर त्याला स्क्रॅप केले जाईल. यामुळे कार मालकांना केवळ रोख रक्कमच मिळणार नाही, तर सरकारकडून नवीन कार खरेदीवर अनुदानही मिळणार आहे.

कार स्क्रॅप करण्यायोग्य आहे की नाही हे कसे पाहावे?
नवीन नियमानुसार, कार मालकाला वेळोवेळी स्वयंचलित फिटनेस सेंटर किंवा नोंदणीकृत वाहन स्क्रॅपिंग सुविधा (आरव्हीएसएफ) ला भेट देऊन त्याची कार तपासावी लागेल. येथे त्याची फिटनेस टेस्ट इंजिन, ट्रान्समिशन, बॉडी यासारख्या गोष्टींच्या आधारे केली जाईल. दरम्यान, तुमच्या फिटनेस चाचणीवरुन वाहन स्क्रॅप करायचे की नाही कळेल. यासाठी कार मालकाचा विमा, नोंदणी प्रमाणपत्र, पॅन कार्ड, आधार कार्ड अशी आवश्यक कागदपत्रेही दाखवावी लागतील. जर तुमची कार स्क्रॅप केली असेल तर तुम्हाला काही पैसेही मिळणार आहे.

स्क्रॅपेज पॉलिसीमध्ये वाहनाचे फिटनेस कसे ठरवले जाईल?
कार फिटनेसचे मापदंड काय असेल याबाबत यूट्यूबर ऑटो तज्ञ अमित खरे (आस्क कारगुरू) सांगतात की, हे धोरण युरोपियन देशांनुसार तयार केले जात आहे. दरम्यान, त्या देशांमध्ये लागू होणारे समान नियम येथेदेखील लागू केले जाऊ शकतात. यामध्ये, वाहनाच्या इंजिनद्वारे किती प्रदूषण पसरवले जात आहे, वाहनाचे किती नुकसान झाले आहे, त्याचे गिअरबॉक्स आणि ट्रान्समिशन कसे आहे या आधारावर वाहनाचे फिटनेसची तपासणी केली जाणार आहे.

कार स्क्रॅप करून मालकाला काय फायदा होणार?
कार मालकांनी त्यांची कार योग्य वेळी स्क्रॅप केली तर त्यांना नवीन कार खरेदी करताना दिलासा दिला जाईल. जर कार स्क्रॅपचे त्यांच्याजवळ प्रमाणपत्र असेल तर नवीन गाडीवर ग्राहकाला 5%अतिरिक्त सूट मिळेल. ही सवलत मासिक किंवा सण हंगामात मिळणाऱ्या सवलतीपेक्षा वेगळी असणार आहे. नवीन वैयक्तिक वाहन खरेदीवर रस्ता करात 25% सूट मिळणार असून आदी सूट दिली जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...