आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • Video Streaming Was Expected To Increase During The Corona Period; News And Live Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:कोरोना काळात व्हिडिओ स्ट्रीमिंग वाढण्याची होती शक्यता, मात्र जानेवारी-मार्चमध्ये 30% कमी ग्राहक जोडू शकले नेटफ्लिक्स

न्यूयॉर्क20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अन्य प्रोव्हायडरनेही सारखाच कंटेंट देणे सुरू केल्याने मूळ प्रोग्रामची मागणी घटली

स्ट्रीमिंग उद्योगात नेटफ्लिक्सच्या एकाधिकारशाहीला अनेक स्पर्धकांकडून आव्हान मिळत आहे. या स्ट्रीमिंग सेवेने २०२१ च्या पहिल्या तिमाहीत ६० लाख नवीन ग्राहक जोडल्याचा अंदाज होता. मात्र, ते ३०% कमी ४० लाख नवीन ग्राहक जोडू शकले. गेल्या वर्षी या अवधीत कंपनीने विक्रमी १.५७ कोटी ग्राहक आपल्यासोबत जोडले होते. सध्या स्ट्रीमिंग ज्याला सर्वसामान्य भाषेत ओटीटी प्लॅटफॉर्मला संबोधले जाते त्यात जगात नेटफ्लिक्सचा दबदबा कायम आहे. मार्चअखेरपर्यंत त्यांच्याकडे जगभरात २० कोटी ७६ लाखांपेक्षा जास्त पेड सब्सक्रायबर होते. यामध्ये ६.७ कोटी अमेरिकेतील आहेत. मात्र, याचा मुख्य प्रतिस्पर्धी डिस्ने प्लस, एचबीओ मॅक्स, एचबीओ मॅक्स, पॅरामाउंट प्लस आणि अॅपल टीव्ही प्लससोबत अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ आणि हुलूने याच्या ग्राहकांचा ख्ूप मोठा हिस्सा हिरावला आहे.

नेटफ्लिक्स मूळ कार्यक्रमाच्या जागतिक मागणीच्या तुलनेत तुलनात्मकदृष्ट्या घसरण आली आहे. कारण, अन्य प्रोव्हायडरनेही याच पद्धतीने कंटेंट सादर करणे सुरू केले आहे. डेटा फर्म पॅरटनुसार, मागणीत नेटफ्लिक्सच्या शेअरमध्ये २०१९ च्या तुलनेत १५ टक्क्यांपेक्षा जास्त घसरण आली आहे. याची झलक या पहिल्या तिमाहीत दिसली आहे. कंपनीला सध्याच्या तिमाहीत दहा लाख नवे ग्राहक जोडण्याची शक्यता दिसत आहे. उत्पन्नातील घसरणीच्या घोषणेनंतर नेटफ्लिक्सच्या शेअर्समध्ये जवळपास सुमारे १०% घट आली. नेटफ्लिक्सने ऑक्टोबरमध्ये आपले दर वाढवले होते. त्यांचा स्टँडर्ड प्लॅन दरमहा १४ डॉलर (१०५५ रु.) आहे. प्रीमियम रेट्स २ डॉलर वाढून दरमहा १८ डॉलर झाला आहे. कंपनी पासवर्ड शेअरिंगवर लगाम लावण्याचा प्रयत्न करत आहे.

मोठ्या स्पर्धेनंतरही 54 हजार कोटी रुपयांचे उत्पन्न
स्पर्धेतही आपल्या इतिहासातील सर्वात चांगल्या आर्थिक स्थितीत नेटफ्लिक्सने पहिल्या तिमाहीत ५४ हजार कोटींच्या उत्पन्नात १२ हजार कोटींचा नफा कमावला. हा गुंतवणूकदारांच्या अपेक्षेपेक्षा जास्त आहे. कंपनीने ३७ हजार कोटी रुपयांचे शेअर बायबॅकची योजना आखली आहे. नेटफ्लिक्सचे को-सीईओ रीड हॅस्टिंगच्या म्हणण्यानुसार, स्पर्धा नेहमी असते. आम्ही १३ वर्षांपासून अॅमेझॉन प्राइमसोबत स्पर्धा करत आहोत. हुलूशी १४ वर्षांपासून आमची स्पर्धा आहे. त्यामुळे ही कोणती नवी बाब नाही.

बातम्या आणखी आहेत...