आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Vietnamese Company Eyeing 77 Lakh Crore Electric Car Market; A Big Challenge For Tesla | Marathi News

व्यापार:77 लाख कोटींच्या इलेक्ट्रिक कार बाजारावर व्हिएतनामी कंपनीची नजर; टेस्लाला मोठे आव्हान

वियतनाम6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तरी व्हिएतनामच्या लाल नदीच्या डेल्टा क्षेत्रात आंबा आणि खजुराच्या झाडांमध्ये इलेक्ट्रिक कारचा जगातील सर्वात मोठा प्रकल्प लांबवरून दिसून येतो. बंदर असलेले शहर हैपांगच्या बाहेर ८७८ एकरवर पसरलेल्या विनफास्ट कंपनीच्या कारखान्यात सुमारे चार किमी लांबीच्या असेंब्ली लाइनमधून प्रत्येक कार जाते. तेथे १२५० रोबोटिकच्या मदतीने कारला विविध प्रकारचे भाग जोडले जातात. जर्मन, जपान, स्वीडन येथील मशीनद्वारे बहुतांश काम आपोआप होते. कारखान्याची क्षमता वर्षाला दोन लाख ५० हजार करण्याची आहे.

विनफास्टचे सीईओ लू थुई म्हणतात, “सुरुवातीला सगळे म्हणायचे की दोन वर्षांत कार बनवणे अशक्य आहे. पण आम्ही २१ महिन्यांत तीन मॉडेल लॉन्च केले आहेत. विनफास्ट इलेक्ट्रिक कारच्या बाजारात चिनी, यूएस आणि युरोपियन ऑटो निर्मात्यांसमोर एक कठीण आव्हान देऊ शकते. २०२१मध्ये जागतिक ईव्ही बाजाराची किंमत १४.६५ लाख कोटी रुपये होती. २०२८ पर्यंत ते दरवर्षी २४.५% वाढून ७७.६१ लाख कोटी रुपये होण्याची अपेक्षा आहे. विनफास्टचे लक्ष्य अमेरिका, युरोपमधील ऑटो मार्केटवर आहे. यशस्वी होण्यासाठी टेस्लाला मागे टाकावे लागेल. हे सोपे नाही. सध्या, जागतिक ईव्ही बाजारपेठेत चीनचा वाटा जवळपास निम्मा आहे. तरीही एकाही चिनी कंपनीने अमेरिकेत जाण्याचा प्रयत्न केलेला नाही.

आज ५९ लाख कोटी रुपये मूल्य असलेल्या टेस्लाच्या मागे अमेरिकन उद्योग उभा आहे. त्यामुळे व्हिएतनामी कंपनी मोठी स्पर्धक कशी बनू शकते हा प्रश्न आहे. विनफास्टची मूळ विनग्रुप कंपनी व्हिएतनाममधील सर्वात श्रीमंत व्यक्ती फाम न्हाट युआंग यांच्या मालकीची आहे. कंपनीचे मूल्य १.९३ लाख कोटी रुपये आहे. शिक्षण, बांधकाम, पर्यटन रिसॉर्ट‌्स आणि शॉपिंग मॉल्सच्या व्यवसायातही विनग्रुपचा सहभाग आहे. जून २०१८मध्ये विनफास्टने हनोईच्या बाहेर जनरल मोटर्सचा कारखाना विकत घेतला. लायसेन्सवर जीएम, बीएमडब्ल्यू आणि शेवरलेट कार बनवायला सुरुवात केली.

विनफास्टला अमेरिकन सरकारकडून पूर्ण पाठिंबा मिळत आहे. अध्यक्ष जो बायडेन यांनी अमेरिकेतील विनफास्टच्या गुंतवणुकीवर ट्विट केले. “माझ्या आर्थिक धोरणाच्या प्रभावीतेचे हे एक नवीन उदाहरण आहे.” ट्विट केल्यानंतर काही दिवसांत विनफास्टला यूएस ग्राहकांकडून १०,००० ऑर्डर प्राप्त झाल्या आहेत. थुई म्हणतात की, आम्ही गमतीने म्हणतो अध्यक्ष बायडेन हे आमचे सर्वोत्तम सेल्समन आहेत. त्यांना आम्हाला कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत. यूएस सरकारकडून आम्हाला मिळालेला पाठिंबा पाहून आम्ही आश्चर्यचकित झालो.

सर्वात मोठा इलेक्ट्रिक कार निर्माता बनण्याचे स्वप्न
िवनफास्ट ऑगस्टपासून पूर्णपणे इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन सुरू करेल. कंपनी अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना येथे ३२,००० कोटी रुपये खर्चून कारखाना उभारत आहे. युरोपमध्ये प्लांट उभारण्याची त्यांची योजना आहे. अमेरिकेतील २ हजार एकरावर तयार होणाऱ्या कारखान्यात २०२४ पर्यंत कारचे उत्पादन सुरू होईल. विनफास्टची महत्त्वाकांक्षा ५ ते १० वर्षांत जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक कार निर्माता बनण्याची आहे,असे थुई म्हणतात. १४ जुलै रोजी विनफास्ट कॅलिफोर्नियामध्ये त्याचे शोरूम उघडले. त्याचे मुख्य स्टोअर सांता मोनिका येथे आहे. यूएस मार्केटसाठी त्याची पहिली दाेन मॉडेल एसयूव्ही आहे. अमेरिकन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनी १० वर्षांची वॉरंटी देईल. बॅटरीचे आयुष्य ७०%ने कमी झाल्यानंतर मोफत नवीन बॅटरी दिली जाईल.

बातम्या आणखी आहेत...