आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Vivo V25 5G Launch I Latest News And Update I Battery Performance & Full Specifications 

'विवो V 25' स्मार्टफोन दोन प्रकारात लॉंच:किंमत 27,999 पासून सुरू; 64MP नाईट व्हिजन ट्रिपल रिअर कॅमेऱ्याचा समावेश

नवी दिल्ली11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विवो कंपनीच्या वतीने दिवाळीच्या आधी 'Vivo V25' 5G स्मार्टफोनचे दोन प्रकारांमध्ये लॉंचिग केले आहे. 8GB रॅम वेरिएंटची किंमत 27,999 रुपये आणि 12GB रॅम वेरिएंटची किंमत 31,999 रुपये असणार आहे. हा फोन दोन वेगवेगळ्या रंगाच्या पर्यांयासह लॉंच करण्यात आला आहे.

50MP फ्रंट आणि ट्रिपल रियर कॅमेरा

MediaTek Dimensity 900 प्रोसेसर 8 GB प्रकारात उपलब्ध असेल. 4500 mAh लिथियम आयन बॅटरीसह, मोबाइल सर्फिंग ब्लू आणि एलिगंट ब्लॅक रंगांमध्ये उपलब्ध आहे. 64MP, 8MP आणि 2MP ट्रिपल रिअर कॅमेरा आणि 50MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध असेल. 128GB इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनची किंमत 27,999 रुपये आहे.

256GB स्टोरेज व्हेरिएंट 4 हजारांनी महागले
12GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेल्या या वेरिएंटची किंमत 31,999 रुपये आहे. 50MP फ्रंट कॅमेरासह 64MP नाईट व्हिजन, 8MP आणि 2MP ट्रिपल रिअर कॅमेरे उपलब्ध असतील. 4500mAh बॅटरी असलेल्या स्मार्टफोनला 6.44 इंच फुल एचडी + डिस्प्ले मिळेल. हा मोबाईल MediaTek Dimension 900 प्रोसेसरवर काम करेल. त्यातील बहुतांश वैशिष्ट्ये 8GB व्हेरियंट प्रमाणेच आहेत.

बॉक्समध्ये काय आहे
ड्युअल सिम स्मार्टफोनमध्ये हायब्रिड कार्ड स्लॉट नाही. हँडसेटमध्ये यूएसबी पॉवर अ‌ॅडाप्टर, युएसबी केबल, सिम इजेक्टर, फोन कव्हर आणि बॉक्समध्ये स्क्रीन गार्ड असेल. वापरकर्ते 6.44 इंच फुल एचडी + AMOLED डिस्प्लेमध्ये 2K व्हिडिओ पाहू शकतील. अद्ययावत Android 12 सह, मोबाइल ऑक्टा-कोर प्रोसेसरवर काम करेल.

बातम्या आणखी आहेत...