आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • Vodafone Idea Loses Rs 73,878 Crore In 2019 20 Due To AGR Arrears, Biggest Loss For Any Company In The Country

विक्रमी तोटा:एजीआरची थकबाकी दिल्यामुळे व्होडाफोन आयडियाला 2019-20 आर्थिक वर्षात 73,878 कोटी रुपयांचा तोटा, देशातील कोणत्याही कंपनीचे सर्वात मोठे नुकसान

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कंपनीला 2018-19 आर्थिक वर्षात 14,603 कोटी रुपयांचे नुकसान झाले होते
  • एजीआर थकबाकी म्हणून कंपनीला 51,400 कोटी रुपये देणे बाकी आहे
Advertisement
Advertisement

देशातील तिसरी मोठी टेलिकॉम कंपनी व्होडाफोन आयडियाला आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये तब्बल 73 हजार 878 कोटींचा तोटा झाला आहे. देशातील कोणत्याही कंपनीचे हे आतापर्यंतचे सर्वाधिक नुकसान आहे. आर्थिक वर्ष 2018-19 दरम्यान हा तोटा 14 हजार 603.9 कोटी रुपये होता. एजीआर थकबाकी दिल्यामुळे कंपनीला हा तोटा झाला आहे. कंपनीचवर 51,400 कोटी रुपयांची एजीआर थकबाकी बाकी आहे.

मार्च तिमाहीत 11,643 कोटी रुपयांचे नुकसान 

कंपनीने एजीआर थकबाकीचा रोडमॅप सांगून तो भरण्याचे सुप्रीम कोर्टाने कंपनीला आदेश दिले होते. दरम्यान ही रक्कम दिल्यानंतर आमची कामे सुरूच राहतील, याबद्दलही शंका असल्याचे कंपनीने म्हटले आहे. व्होडाफोन आयडिया (व्हीआयएल) ने सांगितले की, मार्च तिमाहीत त्यांचा निव्वळ तोटा 11,643.5 कोटी रुपये राहिला. जो मागील तिमाहीत 4,881.9 कोटी रुपये होता.

ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत 6,439 कोटी रुपयांचे नुकसान झाले होते

कंपनीला ऑक्टोबर-डिसेंबर 2019 तिमाहीत 6,438.7 कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. कंपनीने सांगितले की, मार्च 2020 तिमाहीत ऑपरेशनमधून मिळणारा महसूल 11,754.2 कोटी रुपये होता. दुसरीकडे, या निकालानंतर कंपनीचा शेअर बीएसई वर 3 टक्क्यांनी खाली येऊन 10.28 रुपयांवर व्यापार करत होता. 

4G डेटा डाउनलोड शर्यतीत कायम आहेत

व्होडाफोन आयडियाचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रवींदर कोलिजन म्हणाले की वेगवान नेटवर्क एकत्रिकरण तसेच 4 जी कव्हरेज आणि क्षमता वाढविण्यावर लक्ष केंद्रित केल्याने ग्राहकांशी आमचा अनुभव सुधारला आहे. अशा प्रकारे आम्ही बरीच राज्ये, महानगरांमध्ये आणि मोठ्या शहरांमध्ये 4G डेटा डाउनलोडच्या शर्यतीत टिकून आहोत. आम्ही आमचे संपूर्ण ओपेक्स विलीनीकरण ध्येय गाठले आहे. ते म्हणाले की एजीआर प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाची पुढील सुनावणी जुलैच्या तिसर्‍या आठवड्यात होणार आहे. दरम्यान, आम्ही उद्योगासाठी व्यापक मदत पॅकेज मिळावे यासाठी सरकारबरोबर सक्रियपणे सहभाग घेत आहोत.

कंपनीवर एकूण 87,650 कोटींचे कर्ज 

31 मार्च 2020 रोजी एकूण कर्ज (लीज देयता वगळता) 1,15,000 कोटी रुपये होते, त्यात 87,650 कोटी रुपयांच्या सरकारी स्पेक्ट्रम पेमेंटमधील विलंबाचा समावेश होता. "नेटवर्क एकत्रीकरण पूर्ण होण्याच्या अंतिम टप्प्यात आहे, परंतु कोरोनामुळे देशव्यापी लॉकडाऊनमुळे यावर परिणाम झाला आहे. कंपनीने म्हटले की, आजपर्यंत आम्ही एकूण जिल्ह्यांतील 92 टक्के नेटवर्क एकीकरण पूर्ण केले आहे.  तथापि, कंपनीच्या प्रत्येक ग्राहकावरील सरासरी कमाई 121 रुपयांवर गेली आहे. डिसेंबरमध्ये ही 109 रुपये होती. 

Advertisement
0