आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातिसरी मोठी टेलिकॉम ऑपरेटर असलेली व्होडाफोन-आयडिया (व्हीआय) कठीण काळातून जात आहे. कंपनीचे वापरकर्ते सलग कमी होत चालले आहेत आणि तोटा वाढत चालला आहे. अशा स्थितीत कंपनीचा कारभार सुरू ठेवण्याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एकेकाळी देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी असलेल्या व्हीआयने जुलै-सप्टेंबर या तिमाहीत जवळपास सहा दशलक्ष वापरकर्ते गमावले. यामुळे गेल्या तिमाहीतही त्याचे ३४ लाख वापरकर्ते कमी झाले. टेलिकॉम क्षेत्राच्या ताज्या आकड्यानुसार, व्होडाफोन-आयडियाचे युजर बेस कमी होऊन २३.४४ कोटी राहिले.
जिओने सप्टेंबर तिमाहीत ७.७ दशलक्ष वापरकर्ते जोडले, एअरटेलने ५ लाखांपेक्षा कमी ग्राहक जोडले कंपनी आय उत्पन्न/युजर युजर वाढले/घटले जिअो 3% 177.2 42.8 77 लाख एअरटेल 4% 190 36.4 4.9 लाख वीआय 2% 131 23.44 60 लाख (कमाई रुपयात, युजर कोटीत)
जून-ऑगस्टमध्ये भारती एअरटेलचा मार्केट शेअर स्थिर राहिला, जिओचा वाढला महिना जिओ एअरटेल वीआय जून 36.00% 31.63% 22.37% जुलै 36.23% 31.66% 22.22% ऑगस्ट 36.48% 31.66% 22.03% (स्रोत: भारतीय दूरसंचार विनियामक प्राधिकरण)
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.