आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराव्होडाफोन-आयडिया(VI) चे शेअर्स गुरुवारी 15.38% वाढून 16.50 रुपयांवर बंद झाले. गेल्या 5 महिन्यांत या शेअरने तिप्पट परतावा दिला आहे. कंपनीच्या शेअरमध्ये झालेली वाढ ही अलीकडेच दूरसंचार क्षेत्रासाठी उचललेल्या पावलांचा परिणाम आहे.
गेल्या महिन्यात VI चे शेअर्स 60% पेक्षा जास्त वाढले आहेत. 10 नोव्हेंबर 2021 रोजी शेअरची किंमत 10.32 रुपये होती. गेल्या एका वर्षाबद्दल बोलायचे तर VI ने 67% परतावा दिला आहे. 10 डिसेंबर 2020 रोजी शेअरची किंमत 9.85 रुपये होती.
5 महिन्यांत 265% परतावा
5 ऑगस्ट 2021 रोजी शेअरची किंमत 4.55 रुपये होती. हा शेअरचा एक वर्षातील नीचांक आहे. आज शेअर्स 16.50 रुपयांवर बंद झाला. या स्तरावरून स्टॉकच्या परतावा कॅलक्युलेट केला तर, VI ने 265% परतावा दिला आहे. म्हणजेच, जर तुम्ही ऑगस्टमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर ती आजच्या तुलनेत तीन पटीने वाढून 3,65900 झाली असती.
VI च्या स्टॉकमध्ये वाढ होण्याची तीन कारणे
VI सह Airtel आणि Jio च्या बँक गॅरंटी जारी करण्यासंबंधीच्या बातम्या समोर आल्यानंतर गेल्या 6-7 दिवसांत कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी उसळी आली आहे. या कंपन्यांनी परवाना शुल्क आणि स्पेक्ट्रम वापर शुल्कासाठी दूरसंचार विभागाकडे बँक गॅरंटी जमा केली होती.
व्होडाफोन आयडियाचा ARPU सर्वात कमी
टेलिकॉम कंपन्यांनी आधीच हे स्पष्ट केले आहे की प्रति यूजर सरासरी महसूल (ARPU) वाढवण्यासाठी प्लॅनच्या किंमती वाढवणे आवश्यक आहे. VI ला त्याची सर्वात जास्त गरज आहे. सध्या Vodafone-Idea चे ARPU रु 109 आहे, जे सर्व कंपन्यांमध्ये सर्वात कमी आहे. भारती एअरटेलचा ARPU रुपये 153 आणि रिलायंस जिओचा 143.6 रुपये आहे.
बाँड-धारकांना 6,000 कोटी रुपये द्यावे लागतील
बिझनेस स्टँडर्डच्या अहवालानुसार, कंपनी निधी उभारण्यात यशस्वी झाली आहे आणि रोखेधारकांना वेळेवर थकित व्याज अदा करेल. कंपनीला 13 डिसेंबर ते पुढील वर्षी मार्च या कालावधीत 6,000 कोटी रुपये रोखेधारकांना द्यावे लागणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.