आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फॉक्सवॅगन पॅसेंजर कार्स:फॉक्सवॅगन कंपनीने भारतामध्ये ताइगुनची पहिली वर्धापन दिन आवृत्ती केली लाँच

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

फॉक्सवॅगन पॅसेंजर कार्स इंडियाने पहिल्या वर्धापन दिन आवृत्तीची सुरुवात करत ताइगुनच्या यशस्वी ‘वन इयर’ची घोषणा केली आहे. सुरुवातीच्या एका वर्षात ताइगुनने २०२१-२०२२ ची सर्वाधिक सन्मानित एसयूव्हीडब्ल्यू होण्यासाठी रँकमध्ये वेगाने वाढ केली आहे.

ताइगुनला ४०,००० पेक्षा अधिक ग्राहकांच्या ऑर्डर्स मिळाल्या आहेत. अनेक आव्हाने असतानाही ब्रँडने या ऑर्डर्सपैकी २२,०० पेक्षा जास्त फॉक्सवॅगन ताइगुनचे यशस्वीपणे वितरण केले आहे. भारतात एक वर्ष झाल्याबद्दल फॉक्सवॅगन दिवाळीनिमित्त पहिली वर्धापनदिन आवृत्ती सादर करत आहे. बोल्ड, डायनॅमिक आणि जर्मनी निर्मिती ताइगुन स्पेशल एडिशन १.० टीएसआय एमटी अँड एटीवर उपलब्ध डायनॅमिक लाइनवर ती सादर केली आहे.

बातम्या आणखी आहेत...