आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घोषणा:फॉक्सवॅगन व्हर्टसला 5- स्टार सुरक्षा रेटिंग मिळाल्याची घोषणा

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

फॉक्सवॅगन पॅसेंजर कार्सइंडियाने नवीनतम आणि अधिक कठोर ग्लोबल एनसीएपी चाचणी प्रोटोकॉल अंतर्गत व्हर्टसने ५ स्टार क्रॅश चाचणीत यश मिळाल्याची घोषणा केली. कारलाइनला हे सुरक्षा रेटिंग कारमधील प्रौढ आणि लहान मुले दोघांच्याही सुरक्षिततेसाठी मिळाले आहे. जीएनसीएपीच्या अद्यायावत क्रॅश चाचणी प्रोटोकॉल अंतर्गत प्रौढ आणि लहान मुलांसाठी पूर्ण ५-स्टार सुरक्षा रेटिंग मिळवणाऱ्या भारतातील काही कारांपैकी फॉक्सव्हॅगन व्हर्टस आता एक बनली आहे. ब्रँडची उत्कृष्ट निर्मिती गुणवत्ता, सुरक्षा आणि ड्राइव्ह करण्यास चांगला अनुभव राहिला आहे. फॉक्सव्हॅगन व्हर्टसच्या क्रॅश चाचाणीचा निकाल सर्वोत्तम आला आहे. सेडानसाठी नवीनतम प्रशंसा आहेत, त्यांनी २०२२-२३ मध्ये विविध प्रतिष्ठित भारतीय ऑटोमोटिव्ह प्रकाशनांमधून १२ हून अधिक पुरस्कार जिंकले आहेत.