आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा१९व्या शतकापर्यंत सागरी वाहतूकीवर ब्रिटिश कंपन्यांनी कब्जा केला होता. १८६० ते १९२५ या काळात १०२ भारतीय शिपिंग कंपन्या दिवाळखोर झाल्या होत्या. १९१९ मध्ये सेठ वालचंद हिराचंद दोशी यांनी आपली शिपिंग कंपनी सुरू केली. जहाजाचा पहिला प्रवास लंडनचा असावा, अशी वालचंद यांची इच्छा होती मात्र ब्रिटिश कंपन्यांनी एजंट्सला धमकावुन प्रवासी आणि कार्गोची बुकिंग करू दिली नाही तेव्हा वालचंद यांनी वर्तमानपत्रात जाहिरात देऊन प्रवाशांची बुकिंग केली. यूरोपात विक्रीसाठी स्वत: १००० टन सिमेंट आणि ५०० टन लोखंड घेतलेे. शेवटी ५ एप्रिल १९१९ रोजी एसएस लॉयल्टी नावाचे जहाज भारतावरुन इंग्लंडसाठी निघाले.
या ऐतिहासिक प्रवासात वालचंद यांच्या व्यतिरिक्त काश्मिरचे महाराजा हरि सिंह, कपूरथलाचे महाराज जगतजीत सिंह, क्रिकेटर प्रिन्स दुलीपसिंहसह अनेक प्रसिद्ध हस्ती उपस्थित होते. हा ऐतिहासिक दिवस आता देशात राष्ट्रीय समुद्र दिवस म्हणून साजरा केला जातो. वालचंद दोशी यांनी देशाचा पहिला शिपिंग कारखाना, पहिला एअरक्राफ्ट कारखाना आणि पहिला आधुनिक कार कारखान्याची पायाभरणी केली. म्हणूनच त्यांना आधुनिक भारतीय वाहतुकीचे जनक म्हटले जाते. वालचंद यांनी स्वातंत्र्याच्या लढाईत काँग्रेस आणि महात्मा गांधी यांची साथ दिली. १९३० मध्ये तत्कालीन बॉम्बेच्या व्यापारिक संघटनांनी वालचंदांच्या अध्यक्षतेत महात्मा गांधींच्या सुटकेचा प्रस्ताव मंजूर झाला. वालचंद दोशी यांनी पहिली राष्ट्रीय वृत्तसंस्था, फ्री प्रेस ऑफ इंडिया उघडण्यासही मदत केली.
संस्मरणीय : पहिली बँक, जी आजही सेवेत देशातील सर्वात जुनी बँक ‘बँक ऑफ मद्रास’ची स्थापना १ जुलै १८४३ रोजी ईस्ट इंडिया कंपनीने केली होती. हीच बँक इंपिरिअल बँक ऑफ इंडिया बनली आणि आता स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नावाने आेळखली जाते.
७५ वर्षांतील कामगिरी {१००१ मध्ये सूरतमध्ये डायमंड इंडस्ट्री सुरू झाली होती. भारत सध्या तयार हिऱ्यांचा सर्वात मोठा निर्यातदार आहे. {१८७५मध्ये बीएसईची स्थापना झाली होती. आता भारतात जगातील पाचवे सर्वात मोठे शेअर बाजार आहे. {१८२० मध्ये भारतात चहाची शेती सुरू झाली होती. आज भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा चहा उत्पादक देश आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.