आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अंबानींच्या पावलावर टाटांचे पाऊल:टाटांच्या सुपर अॅपमध्ये 1.80 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करू शकते वॉलमार्ट

नवी दिल्ली7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अंबानींच्या पावलावर टाटांचे पाऊल, निधी संकलनासाठी अनेक गुंतवणूकदारांशी चर्चा सुरू
  • सर्वात मोठा व्यवहार! : 4.42 लाख कोटी रुपये होऊ शकते सुपर अॅपचे मूल्यांकन

रिटेल बाजारावरील आपली पकड घट करत आपले स्थान भक्कम करण्यासाठी आता टाटा समूहानेदेखील रिलायन्स समूहाचे मुकेश अंबानी यांच्या पावलावर पाऊल टाकले आहे. मिठापासून साॅफ्टवेअरपर्यंत उलाढाल करणारा टाटा समूह ‘सुपर अॅप’आणण्याची तयारी करीत आहे. एवढेच नाही तर यामध्ये वाॅलमार्ट ही अमेरिकेतील हाेलसेल कंपनी १.८ लाख काेटी रुपयांची गुंतवणूक करून माेठा हिस्सा खरेदी करू शकते. या सुपर अॅपसाठी निधी संकलन करण्याच्या उद्देशाने टाटा समूह अनेक संभाव्य गुंतवणूकदारांशी चर्चा करत आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुपर अॅपमधील हिस्सा मिळवण्यासाठी वाॅलमार्ट इंकबराेबर टाटाच्या वाटाघाटी सुरू आहेत आणि वाॅलमार्ट १.४ ते १.८ लाख काेटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकते. जर टाटा समूह आणि वाॅलमार्ट यांच्यात भागीदारी झाली तर ताे देशातल्या रिटेल क्षेेत्रातील सर्वात माेठा व्यवहार ठरणार आहे.

वाॅलमार्टने मे २०१८ मध्ये फ्लिपकार्ट या ई-काॅमर्स कंपनीचा ६६ % भांडवली हिस्सा खरेदी केला हाेता. हा व्यवहार जवळपास १.१८ लाख काेटी रुपयांत झाला हाेता. व या भागीदारीनंतर टाटा समूह व वाॅलमार्ट एका संयुक्त सहकार्यातून सुपर अॅप बाजारात आणू शकते. टाटा समूह, फ्लिपकार्टच्या ई-काॅमर्स व्यवसायाला यातून फायदा हाेऊ शकेल. या माध्यमातून टाटा व फ्लिपकार्ट उत्पादने ग्राहकांना एकाच मंचावर उपलब्ध हाेतील. वाॅलमार्टने या व्यवहारासाठी गाेल्डमन सॅक्सला इन्व्हेस्टमेंट बँकरच्या स्वरूपात नियुक्त केले आहे.

डिसेंबरपर्यंत लाँच हाेऊ शकते सुपर अॅप

टाटा समूहाच्या या सुपर अॅपचे डिसेंबरपर्यंत लाँचिंग हाेऊ शकते. देशातील वाढता ई-काॅमर्स व्यवसाय लक्षात घेऊन कंपनीने हा निर्णय घेतला आहे. या अॅपवर खाण्यापिण्याच्या वस्तूंव्यतिरिक्त फॅशन, लाइफस्टाइल आणि बिल पेमेंटची सुविधाही मिळेल. याशिवाय टाटा समूहाचे टाटा क्लिक, स्टार क्विक आणि क्रोमाची ई-काॅमर्स उत्पादनेही या मंचावर उपलब्ध हाेतील. टाटा समुहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी एका परदेशी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत केली हाेती टाटाच्या सुपर अॅपची घाेषणा

या कारणांमुळे शक्य हाेऊ शकताे माेठा व्यवहार

वाॅलमार्टची प्रतिस्पर्धी अॅमेझाॅन कंपनी ई-काॅमर्समध्ये फ्लिपकार्टला आव्हान देत आहे. अॅमेझाॅनने रिलायन्सशी हातमिळवणी केली तर तिला ऑफलाइन रिटेलमध्येही जागा मिळू शकेल. अ‍ॅमेझॉन-रिलायन्ससोबत एकत्र येण्याची शक्यता असल्याने वॉलमार्टसाठी भारतीय ब्रँडला साेबत घेणे किरकोळ व्यवसायासाठी अधिक चांगले ठरू शकेल. टाटा कंपनीची ऑफलाइन रिटेलमध्ये सध्या बाजारपेठेत मजबूत पकड आहे. कंपनीकडे तनिष्क, टायटन, वेस्टसाइड आणि क्रोमा अशा यशस्वी रिटेल चेन आहेत. वॉलमार्टला याचा फायदा होऊ शकतो.

दीर्घकालीन शक्यतांमुळे एकत्र येऊ शकतात कंपन्या

भारतातील आपल्या व्यावसायिक महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने एखाद्या माेठ्या रणनीतीअंतर्गत वाॅलमार्ट येथील एका नामवंत ब्रँडबराेबर सहकार्य करत आहे. या संभाव्य व्यवहारातून हेच संकेत मिळत आहेत. कारण सर्वसामान्य व्यवसायासाठी त्यांच्याकडे फ्लिपकार्टसारखा मंच अगाेदरपासूनच उपलब्ध आहे. त्यासाठी वाॅलमार्टला टाटामध्ये इतकी माेठी गुंतवणूक करण्याची गरज नाही. दीर्घकालीन शक्यता लक्षात घेऊनही फ्लिपकार्ट टाटाच्या मंचामध्ये विलीन होईल, अशीही संभाव्यता आहे. अन्य वृत्तांप्रमाणे जर अॅमेझॉन आणि रिलायन्स एकत्र आले तर वॉलमार्टला मोठ्या समूहाबराेबर भागीदारी करण्याची गरज भासू शकते. - हिमांशु नय्यर, लीड अॅनॅलिस्ट, यस सिक्युरिटीज

बातम्या आणखी आहेत...