आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Want An 'electric Car'? : Hyundai's 8 New Electric Cars; The Company Plans To Launch A Luxury EV By 2030 | Marathi News

'इलेक्ट्रिक कार' घ्यायची आहे का?:Hyundai च्या 8 नवीन इलेक्ट्रिक कार; 2030 पर्यंत लक्झरी EV लाँच करण्याची कंपनीची योजना

नवी दिल्‍ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्व ऑटोमोबाईल कंपन्यांना ईव्ही सेगमेंटमध्ये त्यांची पकड मजबूत करायची आहे. यासाठी काही कंपन्यांनी इलेक्ट्रिक वाहने लाँच केली आहेत. तर काही येत्या काही दिवसात अशा कार लाँच करण्याच्या तयारीत आहेत. Hyundai Motors ची कोना ईव्ही आधीच बाजारात उपलब्ध आहे. त्यातच कंपनी 2030 पर्यंत 8 नवीन EV लाँच करणार आहे. या सर्व EV लक्झरी असतील. आता आमचे सर्व लक्ष इलेक्ट्रिक कारवर असल्याचेही कंपनीने म्हटले आहे.

Hyundai 2025 मध्ये इंटर्नल कम्बशन (IC) इंजिन कार लाँच करणार आहे. ही कंपनीची या सेगमेंटमध्ये अखेरची कार असेल. याच वर्षी कंपनी आपली इलेक्ट्रिक कार लाँच करणार आहे. 2030 पर्यंत, कंपनी 17 नवीन मॉडेल लाँच करेल, त्यापैकी 8 पूर्णपणे लक्झरी इलेक्ट्रिक कार असतील. या गाड्या 'कॉमन प्लॅटफॉर्म'वर बांधल्या जातील.

जेनेसिस प्रकल्पामध्ये तयार होतील सर्व ईव्ही
जेनेसिसची मूळ कंपनी Hyundai Motors 'कॉमन मॉडुलर प्लेटफॉर्म' वर त्यांच्या Ioniq इलेक्ट्रिक कार विकसित करत आहे, ज्याचा वापर Ioniq 5 आणि Ioniq 6 सारख्या इलेक्ट्रिक कारमध्ये वापर होतो. जेनेसिस एक समान नवीन प्लॅटफॉर्म देखील विकसित करेल जे कंपनीच्या सर्व कारमध्ये समान असेल.

भारतात लाँच करण्याची योजना नाही

पुढीत काळात लाँच होणाऱ्या 17 कारपैकी 11 ह्युंदाई बॅजच्या इलेक्ट्रिक कार असतील आणि 6 कार जेनेसिस ब्रँड अंतर्गत विकसित केल्या जातील. Hyundai Ioniq 6 या वर्षाच्या अखेरीस जागतिक बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध होईल, तर Ioniq 7 चे लॉन्च 2024 मध्ये होणार आहे. Hyundai आणि जेनेसिस यांची भारतात त्यांच्या इलेक्ट्रिक कार लाँच करण्याची कोणतीही योजना नाही.

जेनेसिस लक्झरी कार कंपन्यांशी स्पर्धा

जेनेसिस जागतिक बाजारपेठेत 5 मॉडेल्स विक्री करते. जेनेसिसच्या लक्झरी कारमध्ये G70, G80, G90 सलून, GV70 आणि GV80 SUV यांचा समावेश आहे. GV70 हे कंपनीचे सर्वात नवीन मॉडेल आहे, जे GV80 SUV चे लोव्हर व्हेरिएंट म्हणून दाखल करण्यात आले आहे. जेनेसिस GV70 SUV ची आंतरराष्ट्रीय बाजारात ऑडी Q5, BMW X3 आणि मर्सडीज GLC सोबत स्पर्धा आहे.

Hyundai ची मायक्रो SUV Casper होणार लाँच

Hyundai देखील सातत्याने आपल्या नवीन कार जागतिक बाजारपेठेत लाँच करत आहे. अलीकडेच, कंपनीने दक्षिण कोरियामध्ये आपली नवीन मायक्रो एसयूव्ही कॅस्पर लाँच केली आहे. 2022 च्या अखेरीस कोरियन बाजारात मायक्रो एसयूव्ही कॅस्पर लाँच करण्याची तयारी सुरू आहे. Hyundai Casper ची किंमत जाहीर होण्याआधीच प्री-बुकिंग सुरू झाली आहे.

Hyundai Casper K1 प्लॅटफॉर्मवर आधारित आहे, जो Hyundai i10 साठी वापरला गेला होता. कॅस्पर कोना आणि व्हेन्यू एसयूव्हीपेक्षा लहान आहे. या कारची लांबी 3,600mm आहे, ज्यामुळे ती तिच्या सेगमेंटमधील सुझुकी इग्निस आणि Renault Kwid सारख्या कारच्या बरोबरीची आहे.

बातम्या आणखी आहेत...