आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चर्चेतील व्यक्तिमत्त्व - ईशा अंबानी:शिक्षिका व्हायचे होते, पियानोवादक व फुटबॉलप्रेमीही आहेत ईशा अंबानी

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुकेश अंबानी यांनी मुलगी ईशाला रिलायन्स रिटेल व्हेंचरची संचालक केले. कंपनीचे बाजारमूल्य ४.४० लाख कोटी रुपये आहे. जन्म : २३ आॅक्टोबर १९९१, मुंबई शिक्षण : एमबीए, स्टॅनफोर्ड ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेस, अमेरिका कुटुंब : पती आनंद पिरॅमल मालमत्ता : ७९६ कोटी रुपये विविध मीडिया रिपोर्ट््सनुसार

जगातील ११ वे सर्वात श्रीमंत मुकेश अंबानी यांची एकुलती एक मुलगी ईशा अंबानीची नुकतीच रिलायन्स रिटेल व्हेंचर्सच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुकेश अंबानींच्या या घोषणेपासून ईशा चर्चेत आहेत. अलीकडेच फेसबुकने जिओमध्ये सुमारे ४५ हजार कोटींची गुंतवणूक करून ९.९९ टक्के शेअर्स खरेदी करण्याचा करार केला आहे. या करारामागे जिओच्या बोर्ड सदस्य ईशा अंबानींचा मोठा वाटा आहे. २०२१ मध्ये अमेरिकेतील स्मिथसोनियन नॅशनल म्युझियम ऑफ एशियन आर्टने ईशा यांची बोर्डावर विश्वस्त म्हणून नियुक्ती केली आहे. १७ सदस्यीय मंडळामध्ये सदस्य म्हणून अमेरिकेचे मुख्य न्यायाधीश, उपाध्यक्ष, अमेरिकन सिनेट सदस्य असतात. ईशा रिलायन्स रिटेलच्या संचालक झाल्या असल्या तरी एक वेळ अशी होती की त्यांना शिक्षिका व्हायचे होते. ईशा एक ट्रेंड पियानोवादक आहेत. त्यांना फुटबॉल खूप आवडतो. शालेय जीवनात त्या फुटबॉल संघात होत्या. माजी मिस वर्ल्ड आणि बॉलीवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणी त्यांच्या मैत्रिणी आहेत. ईशा यांचे खासगी सोशल मीडिया अकाउंट आहे. ईशा गरीब मुलींच्या शिक्षणासाठीही काम करतात.

करिअर : मॅकेन्झी अँड कंपनीमध्ये काम केले, जिओ ४ जी, AJIO अॅप लाँच केले एमबीए पूर्ण केल्यानंतर २०१४ मध्ये त्यांनी अमेरिकेतील मॅकेन्झी अँड कंपनी व्यवस्थापन सल्लागार फर्ममध्ये काही काळ व्यवसाय विश्लेषक म्हणून काम केले. यानंतर २०१४ मध्येच रिलायन्स रिटेल आणि जिओच्या संचालक मंडळात त्यांचा समावेश करण्यात आला. मुकेश अंबानी यांच्या मते, रिलायन्स जिओ लाँच करण्याची कल्पना ईशा यांची होती. २०१६ मध्ये ईशाने मल्टिब्रँड AJIO अॅप लाँच केले. रिलायन्स फाइंडेशनचा डिजिटल शिक्षण कार्यक्रम सुरू करण्याचे श्रेयही त्यांनाच जाते.

प्रारंभिक जीवन आयव्हीएफद्वारे जन्म, भावांची महिला बॉस मुकेश आणि नीता अंबानी यांच्या घरी ईशा व त्यांचा जुळा भाऊ आकाश यांचा जन्म आयव्हीएफ तंत्रज्ञानाद्वारे झाला. ईशा बालपणात टॉम बॉय स्टाइलमध्ये राहत असत. चार भावांमध्ये (अनिल अंबानींच्या मुलांसह) कुटुंबात ईशा ही एकमेव मुलगी होती, त्यामुळे ती अशी होती. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल, मुंबई येथे झाले. यानंतर त्या उच्च शिक्षणासाठी अमेरिकेतील येल विद्यापीठात गेल्या. येथून त्यांनी मानसशास्त्रात पदवी संपादन केली. यानंतर त्यांनी अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेसमधून एमबीए केले. २०१८ मध्ये त्यांनी पिरॅमल ग्रुपचे अजय आणि स्वाती पिरॅमल यांचा मुलगा आनंद पिरॅमल यांच्याशी लग्न केले. लग्नात सासरच्यांनी सुमारे ४५० कोटी रुपयांचा बंगला भेट दिला होता. ‘गुलिटा’ असे या बंगल्याचे नाव आहे. त्यांचे भाऊ आकाश यांनी लग्नात सांगितले होते की, ईशा घरात आम्हा भावांची बॉस आहे.

रंजक : री-स्टाइल करून जुने कपडे घालायला आवडते -ईशा यांनी रिलायन्स आर्ट फाउंडेशनचीही स्थापना केली आहे. -त्यांच्या सासू स्वाती पिरॅमल या शास्त्रज्ञ आणि उद्योगपती आहेत. -वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी त्यांचे नाव फोर्ब्जच्या टॉप-१० अब्जाधीश वारसांच्या यादीत समाविष्ट झाले. -प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या एमएम स्टाइल या ब्रँडमध्ये त्यांची ४० टक्के भागीदारी आहे. - स्टॅनफोर्डमध्ये शिकत असताना ईशा लहान मुलांना शिकवत असत. -२०१५ मध्ये फेमिना मासिकाच्या मुखपृष्ठावर. -२०२० मध्ये ईशा यांचा फॉर्च्यूनच्या ४० वर्षांखालील ४० श्रेणीतील जगातील उदयोन्मुख लीडर्समध्ये समावेश करण्यात आला होता. - २०१८ मधील त्यांचे लग्न हे जगातील सर्वात महागडे असल्याचे म्हटले जात आहे. यासाठी सुमारे ७०० कोटी रुपये खर्च झाल्याचे सांगण्यात येते.

बातम्या आणखी आहेत...